गेss यता...........

Submitted by वैवकु on 17 March, 2012 - 05:09

गेss यता
(या शीर्षकास आक्षेप असणार्‍यान्नी घेssअता असे वाचावे !!)

उर्मी विझली कचरा जाळू
परत वीSSझवू पाणी गाळू

टाटा करतो खिडकीतुन मी
खालुन हात हलव तू बाळू

गझला कर तू मीही करतो
एक-दुज्यावर दोघे भाळू

(इतरांची निंदाच करूया
"प्रामाणिक प्रतिसाद" उगाळू )

नवा अ‍ॅक्ट होमोसेक्सिस्टी
लागू आहे का पडताळू

बेफिकीर मी कणखर हो तू
तखल्लुसांचा स्वभाव पाळू

...................उर्मी विझली कचरा जाळू
...................उर्मी विझली कचरा जाळू
_______________________________
खालचा शेर ज्याना समजेल त्यांच्यासाठी

घाबरतो तो घिठ्ठल अस्तो ....( ghiththal )
विठ्ठल=गोविंदू गोपाळू !!!
_______________________________

अवांतर :
उर्मी विझली कचरा जाळू =
पूर्वी कधीकाळी कुठेतरी चुकून वाचलेली अत्यंत टाकाउ ओळ ; तिचा वापर करून टाकाऊ पासून टिकाऊ करण्याचा प्रयत्नमात्र

टाटा करतो खिडकीतुन मी =
संदर्भ : "टाटा करायला ती खिडकीत येत नाही" (कारण तो येतोय ना!!.... मग माझी काय गरज -असे तिला वाटत असावे कदाचित.......म्हणून)

वीSSझवू= मूळ शब्द 'विझवू' मध्ये केवळ वृत्तासाठी केलेला किरकोळ बदल.

बाळू = 'ळ' ला 'ळ' लावण्यासाठी वापरलेले कॉमन मराठी माणसाचे तितकेच कॉमन नाव ..... तरी आक्षेप असणार्‍यान्नी काहीच्या काही डिस्क्लेमर क्र. १ वाचणे .

होमोसेक्सिस्टी =
मूळ संकल्पना शब्दसाधर्म्य='बेकलाइटी बेकलाइटी'...पिपात मेले ओल्या उंदिर... बा.सी. मर्ढेकर.

काहीच्या काही डिस्क्लेमर्स :
१) सादर रचनेत(अवंतरासगट ) असलेल्या कुठल्याही शब्दांचा आणि त्यांच्या अर्थांचा हयात +/ दिवंगत +/ भूमिगत कुठल्याही व्यक्तीशी काडीचाही संबंध नाही ; तसा जर कुणास जोडावासा वाटल्यास त्यास रचनाकार जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी
२) काहीच्या काही ...या प्रकारात ही रचना मोडत असल्याने यावरील प्रतिसाद (कितीही प्रामाणिक असले तरी) काहीच्या काही म्हणूनच ग्राह्य धरले जातील .
३) प्रस्तुत रचनेची चहाडी सदर संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाकडे करून भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकास बहाल केलेल्या (पर्यायाने रचनाकारासही) अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा विचार मनात येण्यापूर्वीच काढून टाकावा ही नम्र विनंती

जामोप्या............ ........आबा; (मुद्दाम अन्तर ठेवले आहे ) धन्यवाद !!

आबा : काहीही बोध न झाल्यास ( नुसते स्माइलीज देण्यापेक्षा) क्रुपया गझलेतील सध्या हयात असलेली लिव्हिन्ग लीजण्ड्स (मुख्यतः बेफिकीर गेलाबाजार कणखर ) याना थेट विचारणा करावी.............
गझलतन्त्र मुख्यतः तिचा आशय-विषय यान्ची त्यना जितकी जाण आहे तितकी पृथ्वीतलावर कोणासही नाही.
(ही रचना समजण्यासाठी प्रामुख्याने आशय आणि विषय त्याना मुद्दाम विचारावा )

जबराच Biggrin

टाटा करतो खिडकीतुन मी
खालुन हात हलव तू बाळू >>> Rofl

गझला कर तू मीही करतो
एक-दुज्यावर दोघे भाळू

>>>
Smiley

१) सादर रचनेत(अवंतरासगट ) असलेल्या कुठल्याही शब्दांचा आणि त्यांच्या अर्थांचा हयात +/ दिवंगत +/ भूमिगत कुठल्याही व्यक्तीशी काडीचाही संबंध नाही ; तसा जर कुणास जोडावासा वाटल्यास त्यास रचनाकार जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी

काहीच्या काही डिस्क्लेमर्स : आवडले बाँ आपल्याला!
Rofl
Biggrin
Rofl

घाबरतो तो घिठ्ठल अस्तो ....हे एक नवीनच ऐकले>>>>>>>>>>>>

अत्यन्त "प्रमाणिक प्रतिसाद" !!! (सन्दर्भ : शेर क्र. ४ ;प्रस्तुत रचना)
तरीही .....
का.का.डी.क्र. २ मुळे का.का.प्र.च !!
असो ..............

प्रामाणिकपणाचा पुरावा खलील प्रमाणे

बेफ़िकीर | 22 February, 2012 - 13:18
---------------------------------------------
डागोळ = डागाळलेला गोल या अर्थाने
---------------------------------------------->>

ही सोय चांगली आहे

घिठ्ठल म्हणजे घाबरलेला विठ्ठल असे म्हणता येईल

मी आधी ह्या कवितेचे शीर्षक "गे येता" असं वाचलं आणि एकदम घाबरलो.

>>> घिठ्ठल >>> हा शब्द माहीत नाही बुवा...

बहुतेक "घट्ट पिठलं" या दोन शब्दांचा आधी जोडशब्द होऊन आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन "घिठ्ठल" हा नवीन शब्द तयार झाला असावा (घट्ट पिठलं -> घट्ट पिठ्ठल -> घटपिठ्ठल -> घिठ्ठल")

पशाभौ!!
शेर क्र. ५.... ६ .....
अवान्तर क्र. १....२....३....५....
याबद्दल काही प्रतिसाद द्याल का ??

अच्छा ही गेयता होय?

तुम्ही कशातही लिहिलत तरी ते काकाक मध्ये असल्यासारखंच वाटल्यामुळे इकडे नीट लक्ष गेलं नाही

मन्दारराव (कोण्ताही गैर्समज करून घेणार नसाल तरच खालच्या ओळी वाचा ..........)

कारे दुरावा कारे अबोला ..........
अपराध माझा असा काय झाला...........
(का.का.डि.क्र.२ लागू!!)

वैभव वसंतराव कु... | 19 March, 2012 - 20:58 नवीन
मन्दारराव (कोण्ताही गैर्समज करून घेणार नसाल तरच खालच्या ओळी वाचा ..........)

कारे दुरावा कारे अबोला ..........
अपराध माझा असा काय झाला...........
(का.का.डि.क्र.२ लागू!!)

प्रसाद गोडबोले | 19 March, 2012 - 22:43 नवीन
वैभव ....मर्यादा सोडलीत>>>>>>

का हो? गावचे आहेत की काय? Proud

काकाक सोबत टीकाक असाही विभाग हवा

Lol

वैभव वसंतराव कुलकर्णी,

प्रतिसाद लिहिताना भाषा सांभाळून लिहा. कुणावरही वैयक्तिक भाषेत लिहिलेलं चालणार नाही.

अ‍ॅडमिनच्या कारवाईचे मनापासून स्वागत. कारण हे दुसर्‍यांदा ह्याच आय डी कडून झालेले आहे. बेफिकीर तक्रार करीत नाहीत म्हणून रान मोकळे झाल्यासारखे वागत आहे हा आय डी.

विपूतूनही फालतूपणा करायची ह्या आय डी ला सवय आहे. मुसक्या बांधल्याच पाहिजेत अशांच्या. तरी डोक्यात किती प्रकाश पडतो देवच जाणे.

admin | 20 March, 2012 - 11:59 नवीन
वैभव वसंतराव कुलकर्णी,
प्रतिसाद लिहिताना भाषा सांभाळून लिहा. कुणावरही वैयक्तिक भाषेत लिहिलेलं चालणार नाही.
.
.
.
.
विजय दिनकर पाटील | 20 March, 2012 - 13:01 नवीन
अ‍ॅडमिनच्या कारवाईचे मनापासून स्वागत. कारण हे दुसर्‍यांदा ह्याच आय डी कडून झालेले आहे. बेफिकीर तक्रार करीत नाहीत म्हणून रान मोकळे झाल्यासारखे वागत आहे हा आय डी.

विपूतूनही फालतूपणा करायची ह्या आय डी ला सवय आहे. मुसक्या बांधल्याच पाहिजेत अशांच्या. तरी डोक्यात किती प्रकाश पडतो देवच जाणे.

Sad

Sad

admin साहेब धन्यवाद .
मलाही तो प्रतिसाद दिल्यानंतर चुकल्यासारखे वाटले..........आपल्या कारवाईबद्दल आभारी
माझ्या काही कविताच या पूर्वी डिलीट झाल्या होत्या त्या 'बेफिकीर' आणि 'देवाजात' या होत , त्यात देवजात मध्ये काही आक्षेपार्ह नव्हते पण प्रतिसाद वाईट आले होते तेव्हा आपण पूर्ण कविताच डिलीट केली होतीत ती परत प्रकाशित होऊ शकेल का (नको असलेले प्रतिसाद वगळून)
माझ्या अनेक कवितांवर काही मंडळी जाणून बुजून सचेष्ट, आणि केवळ खिल्ली उडवणारे प्रतिसाद देतात (आपण तेही पाहावेत कृपया) म्हणून मीही असा वेड्यासारखा वागतो ...मला असे वागायचे नाहीय ....
adminसाहेब अशी काही सोय करता येईल का की ज्यात आपणास आपल्याच लेखनावर मिळालेले नको असणारे प्रतिसाद खोडून काढता येतील मला वाटतं विपूत अशी सोय आपण उपलब्ध करून दिलीच आहेत ....
ही सोय प्रतिसादातही मिळाल्यास माझ्या प्रमाणेच अनेक मायबोलीकारानां खूप मोठा दिलासा मिळेल यात शंका नाही

आपला कृपाभिलाषी
वैभव वसंतराव कुलकर्णी

>>adminसाहेब अशी काही सोय करता येईल का की ज्यात आपणास आपल्याच लेखनावर मिळालेले नको असणारे प्रतिसाद खोडून काढता येतील मला वाटतं विपूत अशी सोय आपण उपलब्ध करून दिलीच आहेत ....
ती सोय हवी असल्यास वैयत्तिक जालनिशीवर - ब्लॉगवर (blogspot, wordpress वगैरे) उपलब्ध आहे. मायबोलीवर तशी सोय नाही.