प्लान

Submitted by भूत on 16 March, 2012 - 04:29

जेवणाचा काय आहे प्लान मित्रा ?
लावुया का एक खंबा छान मित्रा ?

आण लिंबू , बर्फ ,सोडा ,डाळ, चिवडा
मी करवितो कोंबडा बलिदान मित्रा

डाळभाताची नको आता विनंती
कोंबडीशी बांधले संधान मित्रा < लिंगनिरपेक्षता >

रोज फुलते पापलेटाची जवानी
रोज येते सुरमईला न्हान मित्रा

मेजवानीचे कधीचे फिक्स होते
आणले नाहीस का सामान मित्रा?

मारली ना टांग त्याने याहि वेळी
काय त्याला वाटतो अभिमान मित्रा ?

शेवटाचा घास आता गिळ जरासा
घेवुया टपरीवरी चल पान मित्रा

शब्दखुणा: 

गंभीर समीक्षक , गामा पैलवान , युरी गागारीन , जामोप्या , उदयवन, झक्की , उकाका ...सर्वांन्ना जेवणाचे सप्रेम आमंत्रण ! Biggrin

Rofl

Proud

पंत

डाळभाताची नको आता विनंती
कोंबडीशी बांधले संधान आहे

हा शेर 'लिंगनिरपेक्षते' मुळे वगळला आहे काय? Rofl

Rofl

डाळभाताची नको आता विनंती
कोंबडीशी बांधले संधान मित्रा

असे करावे ही इणंती. Happy

______/\_____

( माझं नाव लिंगनिरपेक्ष यादीत का हो भौ Wink )

-------------------------------------
न धरी शस्त्र करी, आम्ही उद्याचे वारकरी

नर व मादी दोघांनाही ठार करून शिजवून मसाले गहलून बाजरीच्या भाकरीबरोबर भुरकत खाऊन लिंगनिरपेक्षता साध्य केली जाते हे परिसंवादाआधी नोंदवले असतेत तर गहजब माजला असता