काहीच्या काही कविता

येत जा देऊन थोडी कल्पना.... (तरीही गझलचं)

Submitted by लाजो on 15 June, 2012 - 09:34

येत जा देऊन थोडी कल्पना
त्रास तुझा इथे सार्‍या जना...

आग लावणे काम हे तुझे असे
बाफ पेटती इथे विना-कारणा...

नांव दुजे घेऊनी संचारसी
त्रस्त करणे हीच तुझी कामना...

बंड झाले, उपाय थकले या क्षणी
कोण करी आता तुझा सामना...

दुर्लक्ष जरी शस्त्र असे 'लाजो' म्हणे
तरिही मुश्किल 'दु'सदस्या रोकना :फिदी:....

म्हणुन...

येत जा देऊन थोडी कल्पना
आगबंब आणण्याची करू योजना.....

शब्दखुणा: 

अस्वस्थ

Submitted by कावळा on 14 June, 2012 - 11:27

खरंय तुझं...
अशक्य आहे आपलं जमणं.
आपण सोबत आहोत खरं....
पण रेल्वेरुळासारखे.....
समांतर....................
सोबत असूनही एकमेकांना कधीच न भेटणारे..
क्रॉसिंगवर भेटूनही न भेटल्यासारखं करुन थेट पळू लागणारे....

कशाला आणि का भेटायचं याची ओढंच उरली नाही आता...
दुनिया लाख सांगते,
इकडे जा...
तिकडे जा...
इकडे वळ..
तिकडे वळ...
ज्याला जिथे पाहिजे,तिथे वळू दे
आपण का वळा?

- कावळा

एका "पहिल्याची" दुसरी गोष्ट !!!

Submitted by भुंगा on 14 June, 2012 - 06:16

पहिला जॉब....... पहिला दिवस...
ऑफिसात पहिलं पाऊल...... पहिला प्रोजेक्ट...

पहिली कलिग..... पहिली नजरानजर.....
पहिलं हस्तांदोलन...... पहिलं स्माईल.....

पहिलं डेटा शेअरिंग....... पहिला फोन कॉल...
पहिला एसेमेस..... पहिलं चॅटिंग...

पहिली कॉफी..... पहिलं कटिंग....
पहिली साय आणि पहिलीच फुंकर.....

पहिली टूर...... पहिलं लाँग ड्राईव्ह....
पहिला चंद्र..... पहिल्या चांदण्यातल्या गप्पा...

पहिला किनारा.... पहिली वाळूतली जोडपावलं...
पहिला किल्ला आणि पहिलीच लाट.....

पहिला सूर्यास्त...... पहिलाच स्पर्श.....
पहिलं प्रपोजल.... पहिला होकार......

पहिली मिठी..... पहिलं चुंबन.....

पुरुष आणि डुक्कर..!!

Submitted by धुंद रवी on 13 June, 2012 - 02:53

माझ्यावरती रागावली की ती प्रेमाने मला डुक्कर म्हणते.

परवा दिवशी ती इतक्या लाडानी मला डुक्कर म्हणाली की
....................................पलिकडच्या चिखालातल एक डुक्कर लाजलं
आणि एका बाईकड़े बघून लाजला म्हणुन
....................................त्याच्या बाइकोशी त्याचं वाजलं

ती डुकरीण डुकराला म्हणाली
अरे लाज वाटते का तुला...? काल तर म्हणालास की माझ्या सोबत खुष आहेस
पण तू काही सुधारणार नाहीस
डुक्कर कसला.... .......................पुरुष आहेस !

तिनी त्याला पुरुष म्हणू दे किंवा हीनी मला डुक्कर
ही तर प्रेमाची हाक आहे.
पण माणुस व्हा नाहीतर डुक्कर

आयला तुझी अदा..... लय भारी

Submitted by kishorbpanchal on 11 June, 2012 - 13:19

आयला, तुझी अदा..... लय भारी

चोरुन बघतेस
खुद्कण हसतेस
मी बघताच मात्र
अजाण बणतेस
लय भारी

आयला, तुझी अदा..... लय भारी

केसांचा लटटु
गालांवरची खळी
जणू उमलली
नाजुकशी कळी
लय भारी

आयला, तुझी अदा..... लय भारी

- किशोर ब. पांचाळ

साखर

Submitted by वैशाली अ वर्तक on 11 June, 2012 - 06:14

साखर

साखर म्हणाली चहाला,
मारू नको फुकाच्या
तल्लफेच्या गप्पा.
जो पर्यंत माझे ,
तुझ्यात नाही समर्पण,
लज्जतेत,तुझ्या येत नाही रंगत.

हत्ती

Submitted by बेफ़िकीर on 7 June, 2012 - 03:09

हत्ती

हत्ती हत्ती

हत्ती काळा

हत्ती सोंडवाला

हत्ती

हत्ती हत्ती

हत्ती आहे का हत्ती?

मला वाटलं असेल हत्ती

हत्तीच नाहीये?

मग हत्ती तरी आहे का?

साधा हत्ती नाही?

हत्ती हत्ती

हत्ती होता ना?

हत्ती नव्हता?

हत्ती होता की

हत्ती

हत्ती हत्ती

हत्ती वेडा

हत्ती शहाणा

हत्ती हत्ती

हत्ती आणू का?

हत्ती नको आणू?

हत्ती आणतो की?

हत्ती हत्ती

हत्ती आला

हत्ती आधी नव्हता

हत्ती आत्ता आला

हत्ती हत्ती

हत्तीच हत्ती

================

मुतारीला वास नाही चांगला

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 7 June, 2012 - 01:37

बादलीभर धुणं.................

Submitted by MallinathK on 6 June, 2012 - 06:42

सौमित्रयांची क्षमा मागुन... Proud

पहिलंच लाटणं, पहिलाच मार,
पहिल्याच बायकोचा, पहिलाच वार..... Wink
पहिलाच खटका, पहिलंच भांडण
पहिलीच कुणकुण, पहिलीच भुणभुण

बादलीभर धुणं, भांडी अंगणभरुन,
घाबरले मन, धुनार हे कोणं... Sad

'...एम' चा गेम...

Submitted by लाजो on 6 June, 2012 - 04:31

कालपर्यंत होते तुझे माझ्यावर प्रेम
आवडायचे आपल्याला सगळे सेम टु सेम....
.

पण असं वाटतय आता विस्कटतोय आपला गेम
तुझ्या वागण्याचा हल्ली लागत नाहिये नेम...
.

महत्वाचं आहे का हे दिखावा आणि फेम
आपल्या जवळ असताना दोन अनमोल जेम...
.

संभाळत्येय मी तुला कशीबशी जेमतेम
सहन करता करता डोळ्यात पाणी केम...
.

वाटलं होतं थांबु जरा, सगळं होइल क्षेम
पण कारण दिलीस तु मला ती सगळी होती लेम....
.

मलाच वाटत्येय आता माझ्या हट्टावर शेम
माहित असुन सुद्धा की तुला मुश्किल करणं टेम...
.

आता मिच केलाय निश्चय, मिच बदलत्येय एम
मारून तुला डिच..........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता