व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना

Submitted by पाषाणभेद on 5 April, 2011 - 14:26

व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना

मामा अहो मामा,
तुमच्या पोरीला काय समजवाना
फोन केला तर म्हनती,
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||धृ||

कालच आणला मोबाईल नवा
मार्केटमधी लई त्याची हवा
वाटतंय तिनं एकदा तो पहावा
पण तिची भेटच होत नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||१||

आता सगळं कसं सांगू तुमाला
मोबाईलचा हायटेक जमाना आला
तिला सारं काही समजते
रोजरोज एसऐमएस पाठवते
पर व्हायब्रेटर ही काही रिंगटोन नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||२||

मी म्हनलं आपण एकदा भेटूका?
मोबाईलचं टेकनीक समजून देवूका?
तुझ्या हातात माझा मोबाईल देतो
एकएक मेनूचा डेमो देतो
पन असली चेष्टा बरी नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०४/२०११

गुलमोहर: 

तेच ना! माझं तर ते सगळं झालं तरी लिहितोय! गुडान्ग गरम! गु'डॅ'न्ग नाही. Lol

(न्यू जर्सीला पोचलेले काय म्हणतात ते माहीत नाही. भारताची सीमा - ही सीमा म्हणजे भौगोलिक मर्यादा - हल्ली काही प्रतिसादांमुळे हे सांगावे लागत आहे - ओलांडलेली नाही. )

इन्डोनेशियाला बनते. लवंगेची असते. निकोटिनचे प्रमाणे कमी आणि उद्धटपणाचे अधिक! (जे दिसतच असेल म्हणा!) Lol

व्हायब्रेटर रिंगटोनचे काही फायदे असतात. त्यातला एकच या कवितेत दिसला.

-'बेफिकीर'!

मी इथे अमेरिकेत राहतो सध्या तरी, त्यामुळे मी उच्चार गुडँगगरमच करेन.

द एक्स्ट्रा मॅरिटल च्या पुढे अफेअर किंवा ह्या सारखं कुठलंही कॉमन नाऊनच वापरेन. एक्स्ट्रा मॅरिटलच्या पुढे प्रेमा कतलानी सारखं प्रॉपर नाऊन वापरणार नाही.