कविता

आय लव्ह यु ..

Submitted by कल्पी on 30 March, 2011 - 10:03

............
आय लव्ह यु
फोन आला त्याचा
मिटींगमध्ये आहे
उशीर होईल
आज
गड्बडीत का होईना
म्हणाला
आय लव्ह यु

पुन्हा फोन आला
आवाज नशीलाच होता
बाजुला खिदळण्य़ाचा आवाज आला
बोलला काय बोलला
ऐकुच आले नाही
बहुतेक
शेजारी कानात सांगत होता
आय लव्ह यु

पुन्हा पुन्हा तेच भास
पुन्हा तोच आवाजa
प्रेत्येक वेळेस
परकेपणा वाढत होता
परकेपणात ही
आपलेपणा दाखवायला
ढोंगी म्हणत होता
मला
"आय लव्ह यु"
कल्पी
02/11/2009

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

केंव्हातरी....

Submitted by rutuved on 29 March, 2011 - 09:10

केंव्हातरी न जाणो निसटुनी श्वास गेला,
हसता तुझ्यासवे अन तो हुंदका निघाला..

केंव्हातरी तुझी नि माझी,ती साद एक होती
ती आज ऐकली अन मी पोरका जहालो...

केंव्हातरी सभोवती ते रम्य बाग होते,
विरले जरी जमाने ते रंग साथ होते..

केंव्हातरी म्हणावे होते मनात ऐसे ,
होतो मुका कधी अन मग पारखा जहालो...

होत्या केंव्हातरीच्या त्या मोजक्या कहाण्या
तू भेटलीस अन त्या जागवून आलो...

ऋतुवेद

गुलमोहर: 

साखळीतल्या कुत्र्यावर -

Submitted by विदेश on 29 March, 2011 - 01:26

साखळीतल्या कुत्र्यावर -
ते खूपच माया करती ;
' माया ' नसल्या नात्यावरती
ते का डाफरती ?

त्यांच्या भ्रष्ट संपत्तीची
उधळण होते सगळीकडे !
माझी नजर मात्र वळते -
माझ्या गळक्या खिशाकडे ?

रस्त्यावरून जाताना ,
एक भिकारी दिसतो ;
उपहासाने माझ्याकडेच
पाहून का हसतो ?

धडपड माझी चालू आहे -
पतंग उडवण्यासाठी !
दोर राहू द्या - रीळहि साधे
नाही , सध्या हाती !

एकेकटा 'मी ' रस्त्यामध्ये
गर्दी करीत असतो !
गर्दीच्या खिजगणतीमध्ये
कुठेच 'मी ' का नसतो ?

गुलमोहर: 

बेताल

Submitted by नादखुळा on 29 March, 2011 - 00:30

माझं तुझ्यावर किती प्रेम आहे
माहित आहे तुला?
हा तुझा नेहमीचाच प्रश्न आहे
कि रेटा ?
हे तुला कळलंच नाहीये बहुदा..

तुला आठवत असेल कदाचित
कि प्रेमात पडल्यापासून
मला निभावणं जमलंच नाही
आणि जमणारही नाही..
पण तु मात्र,
काही गोष्टी सहजासहजी टाळून,
हवं तेवढं देत गेला आणि
मिळवतही गेलास..

माझ्या नशिबी असं
घुंगराचं जगणं आलंय,
त्याचं मला काहीच वाटत नाही..
पण..
मैफिल सजवायला
घुंगरू पुरेसे नसतात रे !

गुलमोहर: 

गंगेवरची मिसळ ...!!

Submitted by प्रकाश१११ on 28 March, 2011 - 20:34

गंगेवरची मिसळ खाताना
आता जराशी भीती वाटते
कोलेस्ट्रॉल वाढले आहे
कधी काहीपण होऊ शकेल असे डॉक्टर म्हणत होते [!!!]

गंगेवरची मिसळ मात्र खास लज्जतदार नि भन्नाट आहे
झणझणीत मिसळ नि तर्री लाजबाब आहे
ह्यां तिखट जाळ तर्रीने
जळजळ वाढेल असे डाक्टर म्हणताहेत
डॉक्टर, म्हणतात बंद करा असले खाणे
कधी काहीपण होऊ शकते
ही सक्त वॉर्निंग, आहे ...!!
.
गंगेवरची मस्त मिसळीची गाडी
सूर लावून उभी आहे
सकाळची वेळ ..
रेशमासारखी हवा ....
बाजूने वाहणारी गोदावरी
गुदगुल्या केल्यासारखी सूर्याची केशरी किरणे
गोदावरीवर थिरकत आहे
नि वाफाळलेली मिसळ....
त्यावरची तर्री ..,!

गुलमोहर: 

कधी सरणार हि सांज

Submitted by निनाव on 28 March, 2011 - 17:26

कधी सरणार हि सांज कधी निजणार मन आज
मंद सुलगते आहे ओल्या धुराखालची आग

वाहते आहे भरुन इतुके
मनी झरेच झाले आज

पाउल पुढे पडतांना
दिशा गुंतत आहेत आज

धुकेच धुके आहे समोर
न दिसते आहे काही आज

अशी हरविले आहे मी
न ओळखे आज मज कुठली वाट

न मावे पदरात माझ्या आज
एकटीच वाढे हि अंधारी रात्र

सरकते आठवणींचे थेंब अलगद
काजळ पुसते मी पसरणारे आज

कधी सरणार हि सांज कधी निजणार मन आज
मंद सुलगते आहे ओल्या धुराखालची आग

गुलमोहर: 

त्या दिव्याखाली..

Submitted by राफा on 28 March, 2011 - 15:04


माझ्या घरासमोरच..

त्या पांढुरक्या, क्षीण दिव्याखाली
संध्याकाळी जमतात
रोज तीच ती..

जवळजवळ विझत आलेली माणसं.

सुरकुतलेल्या हातांची,
भेगाळ चेह-यांची,
कृश, थरथरणा-या शरीरांची

अजूनही जिवंत असणारी.. ती माणसं.

सुकल्या, पराभूत तोंडांनी
आजूबाजूला वाढणा-या अंधाराकडे बघणारी,

कुठेतरी शून्यात नजर लावून
आयुष्याच्या चुकलेल्या गणिताची
पायरी न पायरी मूकपणे
पुन्हा पुन्हा तपासणारी,

रोज एकत्र जमून, एक शब्दही न बोलता
तशीच परत जाणारी..

ती माणसं..

त्यांचे गेले ते बहुतेक दिवस
कठीण. शुष्क.
खड्यांसारखे..
वेचून वेचून फेकून द्यावेसे..

गुलमोहर: 

चल गाऊया रुणुझुणु गाणी

Submitted by सांजसंध्या on 28 March, 2011 - 12:15

( विरहानंतर तिच्या भेटीची हुरहूर होताना तिच्याशिवार गेलेल्या काळाविषयी तिला काय सांगू असं काहीसं त्याचं वाटणं ... )

चल गाऊया रुणझुण गाणी
==============

डसतात जिवाला माझ्या
प्रेमाची रिमझिम गाणी
आठवती का गं तुजला
तुजसवे गायलो राणी.............|ध्रू|

मी उन्हात घामट वारा
तू सावलीतला निवारा
मी तहानलेला यात्री
डोळ्यांत तुझ्या का पाणी ........|१|

मी पक्षी भिरभिरणारा
शोधतो तुझी ती फांदी
मज पाहशील का गगनी
भिजलेल्या तव नयनांनी..........|२|

तो चंद्र कुठे पूनवेचा
ती भरती उधाणलेली
या आठवणींच्या लाटा
ती ओल जुनी अनवाणी............|३|

गुलमोहर: 

बोल मनाचे २

Submitted by धनेष नंबियार on 28 March, 2011 - 11:54

बोल मनाचे २
=========

स्वप्नांचे वेल जेव्हा मनाला वेढुन बसतात,
अस्तित्वाची नाळ स्वतःशी जोडुन ठेवतात.
स्वप्नातिल आयुष्यालाच खरे समजुन,
लोक मात्र भलत्याच विचारात फसतात.

----------------------------------------------०

आग्नी परी पोळत आहे
आज तुझ्या माझ्यातील दुरावा,
मन किती होरपळते यात
तुला अस्थीतुन मिळेल पुरावा.

----------------------------------------------०

सरड्याची उडी
कुंपना पर्यंतच असते,
पण ते कुंपनहि त्या जीवाला
खुप उंचीवर असते.

----------------------------------------------०

गडगडणार्‍या ढगांना
पाऊस हि भ्यालेले,
कदाचित म्हणूनच त्याचे प्रत्येक थेंब

गुलमोहर: 

केव्हापासून?

Submitted by हर्षल_चव्हाण on 28 March, 2011 - 10:26

खूप वाटतंहो....
अगदी चटका लावणारं लिहावं...
दुसर्‍या कुणालाही आपल्यासारखंच भाजतं का ते पहावं...
पण आपले भोग आपणच भोगायचे असं वाटून,
कविता विरते डोळ्यांतल्या अश्रूंत दाटून...
मग क्षणांत सारे दाह जातात शमून,
जीव जातो त्या चटक्यांच्या आठवणीत रमून...
अशीच येते कधीतरी माझ्या भेटीला, नि
फुंकर घालीत स्वतःलाच म्हणते,
"काय, बर्‍याच दिवसांत आठवण नाही काढलीस?
जगण्यासाठी ही नवीन वाट केव्हापासून निवडलीस?"
-----------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता