Submitted by निनाव on 4 April, 2011 - 17:47
तुझ्या सावलीस लपता लपता
जात होतो गल्लीत अंधार जसा
कुठे होते ठाऊक तरी मला
भेटशील तिथं ही तु अशी
वेड्यावानी माझी वाट बघता
विखुरले काच असे आज खाली
असंख्य तुकड्यांमधे तारेच
ओठी लागायचे माझ्या कधी
नजर काढून माझी झाले रक्तरंजित
विघ्न जणु माझे घेता घेता
शोधत राहिले ते सारे त्याला त्या घरातच
हसु न आवरले मज पाहाता पाहाता
गुंतले होते मन कुणाचे किती बघत
जड होता तो कोपर्यात उभा
दाटुन होते मन त्याचे जाता जाता
राहिले रिकामेच ते घर त्याच्या गेल्यानं
न आलेच मृत्युही तिथे राहावयास कधी
एकटेपण आले मग असे काही
शेजार कुणी नसलेले
जगले काही काळ निनाव राहता
गुलमोहर:
शेअर करा
निनाव -छान विखुरले काच असे आज
निनाव -छान
विखुरले काच असे आज खाली
असंख्य तुकड्यांमधे तारेच
ओठी लागायचे माझ्या कधी
नजर काढून माझी झाले रक्तरंजित
आवडली. पु.ले..शु.