Submitted by किंकर on 5 April, 2011 - 19:33
आताशी तिची आठवण एक वेदना असते
ठणकायची थांबली कि, अजून दुखते
तिच्या येण्याकडे मी लावतो डोळे
कलती सांज सांडते, रंग आरक्त खुळे
राहते चित्र मनीचे, आजही अधुरे
अधुर्या चित्रातील, रंग होती गहिरे
एकेका फटकार्याने होईल चित्र रेखाटून
भरले जर रंग त्यात,तर तू पाहशील अवगुंठून
खरेतर ठरले होते,कॅनव्हासवर चित्र तुझेच असणार
रेखाटून होता रूपरेषा, रंगही मीच भरणार
आज पुन्हा मी उलगडून बसलोय कॅनव्हास
आसपास तिची नसता चाहूल, अनुभवतोय सहवास
उद्याच्या भरवशावर वाटले, आज आवरावा तो पसारा
पण मग उद्या पुन्हा वाट पाहणे नको म्हणून
मी आजच साकारतो, कॅनव्हासवर एक फटकारा
फटकाऱ्याने झाली बरसात, रंगांची त्या कॅनव्हासवर
वाट पाहत झुकलेला सूर्य , कोसळला थेट दर्यावर
गुलमोहर:
शेअर करा