कविता

कसं सांगू तुला?

Submitted by सुनिल जोग on 3 April, 2011 - 02:07

सहनही होत नाही
कसं सांगू तुला ?
उंची परफ्युम मधील
करपट्,अहंकाराचा दुर्गंध
आणि तुझी नजर मदांध
कसं सांगू तुला ?
मनातल्या मनात हरलेला तू
जितं मया,जितं मया
म्हणून बेहोश नाचण्याचा
अभिनय करतोस
तेव्हा...
तुझी कीव करु ?
की
तुला माफ करू ?
कसं सांगू तुला ?
तू अजाण बालक नाहियेस
की तुझ्यावर रागवावं
पण...
दुर्लक्ष करण्याइतका
मॅच्युअर्ड पण नाहियेस
कसं सांगू तुला ?
प्रत्येक पावलाला डगमतोस
तरीही उभे रहाण्याचा तुझा
खोटा अभिनय रोज पहाताना
मनात हसते मी
त्याचाही तुला राग येतो
मग...
तू चिडचिडतोस्,आदळआपट करतोस
मग...

गुलमोहर: 

जगण्यासाठी

Submitted by कल्पी on 2 April, 2011 - 09:30

सगळी निरवानिरव झाली
सांजसावल्या चढु लागल्या
भुकेचा पण भोंगा झाला
तिला काय कळत
घरातलं एक माणुस कमी झालेलं

सुटली ती मोकाट
जांभयावर जांभया
लाज वाटत होती मनाला
पण पोटाचे आतडे शांत बसायला तयार नव्हतेच
कावळे आले खोल गेलेल्या पोटात
आणी जाणीव झाली

जाणारं जातं
पण व्यवहार कुणाला सुटले आहेत
ते अव्याहत सुरुच राहणार ना
जगण्यासाठी
हाडामासाचे शरीर श्वास घेइल तेव्हा
शक्ती पुरायला नको

उठले मी ...........अश्रु गिळले आणी

बसले पानावर

नजरा दिसत होत्या गोतावळ्याच्या

काय बाई आहे
नवरा जाऊन काही तास झाले नाहीत आणी
गिळायला बसली

केवळ याच भावनेने
घास हातातला हातात राहील्या

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

'उध्वस्त'

Submitted by नादखुळा on 2 April, 2011 - 04:12

ओल्या जखमा,
शुष्क वाळवंट,
देह निजता
न उरली खंत

खेळ सावल्या,
दूर धावल्या,
थकली उन्हे,
शोधूनी अंत..

चुकल्या दिशा,
भेटूनी वळणे,
श्वास मोजण्या
संपली उसंत..

कोसळला भार,
उन्मळूनी मुळे,
पेलण्या दु:ख
जाहले 'उध्वस्त'

मिटले शिंपले,
सांडूनी मोतीया,
निशब्द ओठांना,
लागले रक्त..
लागले रक्त..

-न्नादखुळा

गुलमोहर: 

वाट..

Submitted by मी मुक्ता.. on 2 April, 2011 - 03:34

मला समजलीये
स्वप्नांच्या प्रदेशाला जाणारी वाट..
चंद्राशिवायच्या चांदण्यांनी भरलेल्या रात्रीत,
जेव्हा चांदण्या उतरलेल्या असतात क्षितिजावर
एका उडीत चांदण्यांवर पाय पडतील इतक्या जवळ..
आणि मग त्या चांदण्यांचे ठसे घेवुन जातील मला
स्वप्नाच्या प्रदेशात..
जवळच आहे..
स्पष्ट दिसतीये वाट..
तिथवरच तर चालायचय...
.
.
.
क्षितिजापर्यंत....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आज आठवे तुझ्या वेणा

Submitted by कल्पी on 1 April, 2011 - 11:02

आज आठवे तुझ्या वेणा
तु दिव्याच्या काजळीला
गालावरील तिट केले
उसने हासुन सदैव तु
संसाराचे गीत केले

पाणी देउन फ़ोडणीला
तेलाचे तवंग आले
सुग्रस तुझ्या रुचिरेला
मायेने अभंग केले

ऊनपावसाचे संगीत तुझे
चिंब होउनी गात होतीस
ओलेत्याची करुनी पैठणी
शोभा नावे करीत होतीस

चटनीची करुनी वाटणी
आजोळाला स्मरत होतीस
भरजरी तुझ्या बालपणाचे
किस्से आठवुन रडत होतीस

संकट आले कित्येक वेळा
तेरी टसमस झाली नाहीस
आई तुझ्या पायाशी
तुझी लेकरे फ़ुलत होती

गुलमोहर: 

ए़कटेपण

Submitted by मी सानिका on 1 April, 2011 - 06:36

मी सानिका,
कुणी लेखिका नाहि सहज सुचल्या कहि ओळि ......

ए़कटेपण

गुदमरुन जातो जिव जेव्हा
मज तुझि होते आठवण
तुझ्यासवेच्या मधुर क्षणांची
मनावर हळुवार पाखरण
तुझ्यासवेच्या आठवतो
तो प्रत्येक गोड क्षण
आणि खुदकन हसते
माझे ए़कटेपण.......माझे ए़कटेपण.

गुलमोहर: 

ए़कटेपण

Submitted by मी सानिका on 1 April, 2011 - 06:36

मी सानिका,
कुणी लेखिका नाहि सहज सुचल्या कहि ओळि ......

ए़कटेपण

गुदमरुन जातो जिव जेव्हा
मज तुझि होते आठवण
तुझ्यासवेच्या मधुर क्षणांची
मनावर हळुवार पाखरण
तुझ्यासवेच्या आठवतो
तो प्रत्येक गोड क्षण
आणि खुदकन हसते
माझे ए़कटेपण.......माझे ए़कटेपण.

गुलमोहर: 

चित्र

Submitted by UlhasBhide on 1 April, 2011 - 02:26

चित्र

आयुष्याच्या चित्रामध्ये
रंग भरावे प्रयत्न केला
चित्राला बेरंग करितसे
नियतीचा निर्घृण कुंचला

उभ्या आडव्या तिरप्या रेघा
नियतीने कोरडे ओढले
विचित्र जीवन-चित्र आगळे
निव्वळ रेघोट्यांचे जाळे

जाळ्यामध्ये रेघोट्यांच्या
पुन्हा पुन्हा ते चित्र शोधतो
गुरफटून त्या गुंत्यामध्ये
स्वत:लाच मी हरवुन बसतो

अंतरंग ना कळे जयांचे
त्या रंगांची हाव धरूनी
रंगाचा बेरंग होउनी
रंगहीनता उरे जीवनी

..... उल्हास भिडे (१-४-२०११)

गुलमोहर: 

धाक

Submitted by उमेश वैद्य on 31 March, 2011 - 11:32

धाक

’तिची’ मुलं बेताल झाली
वागु लागली कशीही....
कधी तिलाच ओरबाडत...
कधी तिनंच त्यांच्यासाठी निर्मीलेल्या
छान छान गोष्टींचा नाश करीत...
जिवघेणी भांडत....आपापसात....
तिच्याच पोटातून उर्जारसाचा............
उपसा करत अमर्याद.........
तो जाळून, तिनंच त्यांच्यासाठी तयार केलेली
मऊशार दुलई टराटरा फ़ाडत.....
आईची माया झुगारत.......
उन्मत्त, बेमुर्रवतखोर, हरामखोरी.....
चालूच....
’ती’ खिन्न झाली
तिन आपली व्यथा आपल्या मित्राला सांगीतली
आपल्या मुलांना कळू नये अशी ...त्याच्या पोटात खोलवर....
तिची ही कैफ़ियत त्यानं ऎकली मात्र
तो संतापला.... उसळला...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भाव मनीचा......

Submitted by atulgupte on 31 March, 2011 - 04:28

नको विचारूस, नकोच सांगूस गुपित राहू दे जरा
नकोच देऊस नाव नात्याला भाव हृदयातील खरा.

दगडास पूजिले, नवसही केले हाती रिकामाच घडा
माणूस म्हणुनी जगा जरा रे माणसातील देवच खरा.

मंदिरे बांधली दौलत वाहिली देवाच्या चरणासी
जीव भुकेल्या जर खाऊ घातले तोची धर्म खरा.

राधा चा अन मीरा चाही एकच तो सावळा
प्रीत असो वा भक्ती हृदयी प्रेम भाव तो खरा.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता