Submitted by निनाव on 17 April, 2011 - 07:45
वय धावते आहे तरी,
कधी वेळ थांबतेच
मग कितीही ठरविले लिहायचे नाही,
तरी पेन उचलले जाते
धडपडच सुरु होते माझ्या मनी मग
असंख्य लाटांची
आणि उतरते मग त्यातून
सावरत..
नाजुक कविता माझी ..
सुंदर मउ पायांनी ..
अलगद पाउले टाकत
उघडून दार मनाचे
बाहेर डोकावत
थांबते, थोडी लाजते
मग पुन्हा नजर उचलून बघते
माझ्या डोळ्यात
स्पर्शते मन माझे..
अन ऐकते
स्पंदन माझ्या हृदयातले
डोळे माझे निजतात
शब्द माझे पोहोचतात
भावनांच्या खोल समुद्रात
माझेच मला कळत नाही मग
भान वेळे चे उरत नाही मग
अन उतरते ती
हळुवार माझ्या विश्वात....
कविता माझी !
गुलमोहर:
शेअर करा
निनाव - सुंदर मउ पायांनी
निनाव -
सुंदर मउ पायांनी ..
अलगद पाउले टाकत
उघडून दार मनाचे
बाहेर डोकावत
थांबते, थोडी लाजते
सुंदर ..!!छान लिहिले आहेस .!!
जमली बोवा !
जमली बोवा !
धन्यवाद wiseman.
धन्यवाद wiseman.
छान... इथं करूणा भाकतेय तरी
छान...
इथं करूणा भाकतेय तरी कसलीच हालचाल नाही...
छान.. आवडली..
छान..
आवडली..
सांज सं . , निवडुंगः आभारी
सांज सं . , निवडुंगः आभारी आहे.
सांज सं: हालचाल न झालेलीच
सांज सं: हालचाल न झालेलीच बरी.