तुझ्या आठवणींच्या चेहर्यावरती;
आता वार्धक्याच्या खुणा दिसू लागल्यात;
रस्त्यावर बसणार्या भिकार्याच्या चेहर्याप्रमाणे.
धुसर आणी विरळ होत जाणार्या तुझ्याविषयी;
काही न वाटण्याच्या काळात नकळत;
वाटतात त्या काहीच न घडल्याप्रमाणे.
कधीतरी वाटत राहत काहीतरी चुकतंय;
खोल आत काहीतरी हातातून निसटतय;
देवार्यात मंद जळाणार्या नंदादीपाप्रमाणे.
मनावरची तुझ्या विचारांची जिवघेणी वलयं;
उदबत्तिच्या धुरासारखी हवेत विरुन जातायत;
सुगंधीत करुन माझ मन गाभार्याप्रमाणे.
नव्याने भेटलेला तुझा आकार आणी भुतकाळातला वकार;
या दोघांविषयी सारखंच प्रेम वाटू लागलयं;
भेट घ्यायची ओढ लागली
नकोच आता दुर जराही
भेट घ्यायची ओढ लागली ||१||
हिरव्या वाटा उंच तरूवर
प्रकाशाचे किरण त्यावर ||२||
ओळखीच्या त्या झाडे वेली
नेहमीची त्यांनी जादू केली ||३||
वायू परिचीत पानांस लागला
थरथर त्यांना देवूनी गेला ||४||
नजरेच्या टापूत आले समोर
शांत नितळ शितल सरोवर ||५||
हृदयाच्या कप्यात हुरहुर झाली
जुन्या स्मृतींची आठवण आली ||६||
विरह कसला असला नसता
नकोच ते दुर असणे आता ||७||
श्रम पुरले वेळही सरली
मी?
एक मासा.
नुकताच जन्मास आलेला
आताच पोहायला शिकलेला
खोल पाण्यास भीत नसलो जरी
अजुन शिरत नाही मी सहसा
मोठे मासेच नसतात तिथं फक्त
आप्-आपले काटे लावून बसतात
तिथं मासेमार ही !
पण,
राहवत नाही मला
खोल सागराचा मोह
आवरत नाही मला...
मग जातो तोल मनाचा
अन घेतो दीर्ध श्वास मी
मारतो मग एक मोठी उडी
आणि...
क्षणांत सर्वं कसं गार-गार, आणिक शांत
हरवून जातो मग त्या निळ्या पाण्यांत मी
सागर तळी,
मोती शिंपल्यात...
वाटत नाही मग काट्यांची भिती
अन मोठ्या माश्यांची ही
काटे नसतातच मुळी माझ्या साठी
मी छोटा आहे ना अजुन
जातो निघून दोन फासांच्या मधून
शिवाय, पकडून मला उपयोग तसा नाही
***हि कविता थोडी जुनी आहे. इथे देत आहे. ***
-- चंद्रा च्या कुशी खालून --
चांदण्यांस मिठी मारतांना
चंद्रास गोड का वाटत असेल?
त्यास आलिंगनात भरतांना
रात्रीस मोह का आवरत असेल?
दिवस उजाडुच नये कधी
वाटत तिला ही असेल
मोहक चंद्रा च्या पाशातुन सुटतांना
जीव तारकांचा का आवळत असेल?
चंद्रा च्या कुशी खालून
खेचून पदर अलगद पहाटे
उतरत आंथरुणातून रात्र जेंव्हा असेल
सुटलेल्या केसांमधुनी
लाज आवरत पदरा खालील
मन तिचे का बांवरत नसेल?
मधु-चंद्र काय असावे
चंद्रास का ते कळत असेल?
रोजच असते रात्र त्याचीच
मोह मिलना चे का उमगत असेल?
चांदण्यांस मिठी मारतांना
चंद्रास गोड का वाटत असेल?
तुकडे तुकडे
जगायचं ..
जुळवत राहायचं
मिळवत राहायचं
एक अखंड चित्र ..
जे कधीच मिळणार नाही ..
फक्त घुसत जातील
अणकुचीदार कोपरे
एकमेकांचे एकमेकांत
एकमेकांना
घायाळ करत ..
घुसत राहातील आत आत ..
कापत खोलवर !
सगळ्यांनीच जमवत राहायचं
एक समाधान
कोणी ना कोणी आपल्यामुळे
कापलं गेल्याचं,
अजूनही आपण कोणामुळे
घायाळ होत असल्याचं !
अजूनही काहीतरी नातं
असल्याचं एक विचित्र समाधान
जपत राहायचं ह्या जिवंत
घायाळ रक्ताच्या चिखलात
त्याच जखमांच्या बुडाशी !
जंगलातल्या झाडांवर
शेवाळ चढतं
तसं आजुबाजुच्या
टेकडयांवर
हे शहर
चढत आहे.
आणि
मेंदूला
करकचून टाकणारी
भांगेसारखी झिंग
शहराला चढलेली ..
आकाशालाही लाजवेल
इतकं चढत जाणार्या
अनावर विजिगीषु लालसांखाली
बुजत चाललेल्या
माणूसपणाचं थडगं आहे
हे शहर !
माझे आभाळ निखारे,
तुला वाटते चांदण,
माझ्या उदास दाराला,
लावू नकोस तोरण.
निमिषांचा खेळ पाठी,
तुझा स्पर्श या खांद्याला,
उन्मळून पडे सारे,
बांध फुटे आधाराला.
सवयीच्या सोसण्याला,
नको स्वप्नांचे चंदन,
राहुदे डोळ्यांच्या मागे,
मुके युगांचे रुदन.
- शशांक प्रतापवार
किती सवय असतेना आपल्याला
नाती जोडत जाण्याची
एका ओळीत चार ठिपके दिसले
की त्यात रेघ पाहण्याची
ठिपक्यांची रांगोळी, ठिपक्यांची चित्र
न जोडलेले ठिपके, किती विचित्र ?
कधी वाटतं, पुसाव्यात सगळ्या रेषा
पुन्हा करावेत ठिपके स्वतंत्र
पण स्वतंत्र ठिपक्यांमध्ये रंग भरता येत नाहीत,
असं मला उगा वाटतं
हातात घट्ट धरलेले हात आणि
ठिपके जोडण्याचा पुन्हा हट्ट
ओळीतले बगळे, ढगांचे आकार
असंबंधातुन होतं काहीसं साकार
एक अनामिक ओढ, एक वेडी उर्मी
जोडत जावे ठिपके पुन्हा एक आकार
खरचं का, ठिपक्यांच्या रांगोळी
सोपी असते म्हणुन शिकवलीस ?
की रंगाची आणि नात्यांची समज
अलगद होती रुजवलीस ?...
'कोलंबस'
मी माझीच कोलंबस......
आयुष्यभर माझ्याच मनाच्या शोधात...
कधी वाटे गवसले......
तर कधी माणसांच्या भाऊगर्दीत हरवले !
कधी गगनाला गवसणी घालणारे.....
तर कधी चिमटीतही न मावणारे !
मनाची मुळं, मनाच्या शाखा, मनाच्या पारंब्या......
मन म्हणजे महासागरातला हिमनगच् जणु !
कधी वाटे पुरेपुर उमगले.....
तर दुस-या क्षणी गहन अथांग !
त्या कोलंबसचा शोध झाला यशस्वी......
मला सतत आशा माझ्या यशाची !
प्रेम प्रेम म्हणतात खरं,
पण हे करायचं तरी कसं.....???
मग आठवतो व्हॅलेंटाइन डे
तसा हा विविध डेज् मधलाच एक
पण नव्या प्रेमींच्या आयुष्यात
ठरलेला एक अनोखा ब्रेक,
तरुणाईत पसरलेली ती गुलाबी लाट
अन् मुलामुलींच्या चेहर्यावर आलेला नविनच थाट,
मुलांमध्ये सुरु होते प्रपोझलचे
प्लॅनिंग आणि फिक्सिंग
तर मुलींमध्ये डेटिंगसाठीची
हॉट हॉट शॉपिंग,
सगळीकडे वातावरण फक्त सेलिब्रेशनचं
पण माझ्या मनात एकच प्रश्नं
प्रेम प्रेम म्हणतात खरं,
पण हे करायचं तरी कसं...???
सध्या ज्या हॉबीज अंगी असायला पाहिजेत खास
त्यासाठीही निघालेत आता कोचिंग क्लास,
पण प्रेमासाठी अद्याप तरी नाही कुठले क्लास