तुझे सुखाचे गाव लागले.

Submitted by कमलेश पाटील on 17 April, 2011 - 12:55

त्या मोकळ्या वार्‍याने सभोवती;
तुझ्या क्षणांचे आकाश आणले,
अन् या दुखाच्या वाटेवरती;
तुझे सुखाचे गाव लागले.

कसे आता तुझ्यात जगणे;
असे अचानक रिते वाटणे,
हरवुन जाता डोळ्यांमध्ये,
अश्रूंना जरासे बांध घातले.

खोट्या सुखाचा उगाच झोका;
मनास वेड्या साद घालतो,
समजून जाता प्रमाद माझे ;
तुझे खुळे हे भास दाटले.

गुलमोहर: