Submitted by कल्पी on 17 April, 2011 - 05:51
अडले पाऊल ऊंब-यातले
दोन डोरली मनी काळे
हात गळ्याशी येता येता
आठवती मज झुलती वाळॆ
उभी बाभळी त्या रानातील
ताठर कणा ,भक्कम पाठ
मला सांगते जगुन घेना
अजुन होउदे मन ताठ
मी शरमले मी वरमले
बाभळीस मी गुरु मानीले
हातातील ते औषध फ़ेकुन
घाव सोसण्या उभी राहीले
जगुन घेते जगुन बघते
आता मी पण बाभुळ होते
जखमा व्रण विसरुन सारे
पुन्हा सोसण्या सोशिक होते
कल्पी जोशी
१७/०४/२०११
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जखमा व्रण विसरुन सारे पुन्हा
जखमा व्रण विसरुन सारे
पुन्हा सोसण्या सोशिक होते
.... छान
(No subject)
आभार
आभार