मीही मनात गातो
तूही मनात गावे
काळीज जरी उडाले
तरीही सूरात गावे
मैफ़ल जीवनाची
अधुरी न राहू द्यावी
अश्रु तुझी कहाणी
तू ठेव ना उशाशी
येऊ नकोस मागे
सावली बणून वेडी
जा ना त्या किनारी
घेऊन जा ती होडी
अस्तित्व आज माझे
दिसले माझ्यात आज
नकोच रे आसवांचा
आता मला तो साज
यात्रा नभात भरली
चाहूल मला मिळाली
पक्षी बनून झाले
गाणी सूरात झाली
कल्पी जोशी
तूझ्या देही नवा
झुलव ना झुला
उजवून निवडूगा
संपव ना अबोला
स्पर्षून घे जून्या
गोंदव खुणा
नसावे स्पर्ष तरी
ऊसव पिंपळपाना
उधारी नको गं
ऊसवल्या विणेला
फ़ेडून टाक ना
तुझ्या शब्द वेणा
जशी तू तशी मी
मूळी भेद नाही
शब्दाविना गं
दुजा नाद नाही
कल्पी जोशी
०१/०७/२०११
जंगलातला वणवा ,वणव्यात हिरवळ
मनातली हिरवळ सुकवतय कोण
चुलीतले सरपण सरपणाचा जाळ
मनातले काहूर पेटवतय कोण
वरणात डाळ की डाळीत पाणी
पोटातली भुक भागवतय कोण
लक्तर अंगावर ,लक्तरातली लाज
लाजेला बेशरम करतय कोण
कोरडा पाऊस ओरडा "पाऊस"
आसवांना गालाशी खिळवतय कोण
गडगंज पैसा ,पैशाचा पाऊस
ख-या पावसात भिजतय कोण
कल्पी joshee
एक नातं सलत होतं
एक नातं उलत होत
केशरीच्या देठासोबत
हळुहळु डोलत होतं
स्पर्ष खोल उरत होते
नाजुक भाव तरळत होते
जर तर च्या भाषेत
म्रुदुगंध खुलत होते
हुरळुन जायचे फ़ुल
रूजताना गार वा-यात
डोलताना हिरवी तनु
झुकायचे भर रानात
सुसाट सुटले फ़ुल
पाकळी पाकळी विलगली
गंध दरवळ घेउन
मातीमध्ये कोमेजली
कहानीला पेव आले
पाकळीला नाही भावले
उन्हामध्ये कोमेजुन
चुर चुर झाले
वारा धावला दुरवर
नजर त्याची कुठवर
आकाशाच्या पदरी
चांदण्याची वरवर
कल्पी जोशी
अडले पाऊल ऊंब-यातले
दोन डोरली मनी काळे
हात गळ्याशी येता येता
आठवती मज झुलती वाळॆ
उभी बाभळी त्या रानातील
ताठर कणा ,भक्कम पाठ
मला सांगते जगुन घेना
अजुन होउदे मन ताठ
मी शरमले मी वरमले
बाभळीस मी गुरु मानीले
हातातील ते औषध फ़ेकुन
घाव सोसण्या उभी राहीले
जगुन घेते जगुन बघते
आता मी पण बाभुळ होते
जखमा व्रण विसरुन सारे
पुन्हा सोसण्या सोशिक होते
कल्पी जोशी
१७/०४/२०११
मी जाताना उरेल काही
काही अधिक ,काही उणे
नकोस धुवु धुणे वेडे
दु:खाचे ते रडरड गाणे
तप्त निखारे डोक्यावरती
घेउन जेव्हा मी चाललो
राख त्याची तु अंगावरती
घे असे ,मी नाही बोललो
बागेमधली फ़ुले सुगंधी
फ़ुलली झुलली या फ़ांदीवरती
येउ दे ना हास्य "लकेरी"
गोड लोभस चेह-यावरती
जरी चाललो मी येथुनी
श्वास तुझाच मी बनलो आहे
बंध रेशमी युगायुगाचे
तुझ्याय रुजले , विणले आहे
कल्पी जोशी
कितीही भरले तरी रिकामे
जीवनाचे रिते किती रकाने
उसने आणोन हास्य नभीचे
चांदण्याचे मनी सडे शिंपले
उदास वाटले जरी उसासे
कधी उलटे तर सुलटे फ़ासे
वादळ आले जरी घोंगावत
पाय रोवुनी तरी उभे घराणे
लाटामागुन जरी लाटा येती
पायाखालुन मग रेती नेती
दडलेले हिरे माणिक मोती
अशाच वेळी तर वर येती
हीच परिक्षा असते वेळोवेळी
सारेच देती ईथे आळीपाळी
कल्पी जोशी
०६/०४/२०११