अपूर्ण

अपूर्णत्व

Submitted by Rudraa on 27 March, 2021 - 09:06

.................अपूर्णत्व..........

कधीतरी हराव ,
कधीतरी जिंकाव....
एका क्षणासाठी का होईना,
केंव्हातरी स्वतःसाठी जगाव .......

पूर्ण होण्यामागे ,
अपूर्णही असावं.....
स्वतःच्या व्याख्येमध्ये,
जगाच अपूर्णत्व भासावं ......

ठाम उभ राहून लढाव,
लढण्यामागे थोडसं हरणं असावं.....
भाळी सुखाची रेषा असावी,
कोणाच्या दुःखाने तिलाही कधी छेद पडावी....

रडता रडता हसाव,
हसता हसता जगावं .....
हसण्याच्या वाटेलाही,
कधीतरी कोणाच्या रडण्यानं वळण मिळाव........

विषय: 
शब्दखुणा: 

असंबद्ध..

Submitted by भानुप्रिया on 18 April, 2011 - 00:43

ह्या कवितेला एक premise आहे..अर्थात, सूज्ञ वाचकांच्या तो लक्षात येइलच..
आपल्या प्रतिक्रियांची वाट बघतेय..
--
आज झोपू नकोस रात्री..
म्हणजे झोपलास तरी जागासा रहा..
रात्र आळसावली की मग
दाराची चाहूल घे जरा..
कधीतरी आडनिड्या वेळी
तुझ्या अंगणात पैंजण रुणझुणतील..
दचकू नकोस तेव्हा..
हळूच नादणारी ती पावलं माझीच असतील..
तुझ्या अंगणातली शांतशी ती तुळस
थरारेल क्षणभर..
गाढ झोपलेला पाचोळाही कूस बदलेल..
रातकिड्यांच्या किरकिरेला भेदून जाईल
माझा एक रोखलेला हुंदका..
तू इतक्यात उठू नकोस..
अजून तुझ्या बागेतल्या गुलाबाशी बोलायचंय मला..
त्या फुलांचं आणि माझं नातं असं नाहीचे..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अपूर्ण