मला वाटते

Submitted by ऋतुजा घाटगे on 17 April, 2011 - 09:54

मला वाटते मी व्हावे, सागराची एक लाट
जी तुझ्या पदस्पर्शाने पावन व्हावी.

मला वाटते मी व्हावे, चंद्राची एक शलाका
जी तुझ्यापर्यंत खुशाल पोहचू शकेल.

मला वाटते मी व्हावे, एक रेशमी वस्त्र
ज्याच्या पायघड्या तुझ्या पायाशी घातल्या जाव्यात.

मला वाटते मी व्हावे, शेकोटीतला एक नि़खारा
ज्याने तुझ्या गारठलेल्या हातांना ऊब द्यावी.

मला वाटते मी व्हावे, एक चंदनी खोड
ज्याने स्वतः झिजून तुला सुगंध द्यावा.

मला वाटते मी व्हावे, वार्‍याची एक अवखळ झुळूक
जिने तुझ्या केसांशी मुक्तपणे खेळावे.

मला वाटते मी व्हावे, एक पेटती मशाल
जिने अंधारात तुला मार्ग दाखवावा.

मला वाटते मी व्हावे, एक खारट आसू
जो तुझ्यासाठी कुणीतरी गाळला असावा.

मला वाटते मी व्हावे, एक नाजुकसे फुल
ज्याला तुझ्या ह्रदयापाशी जागा मिळावी!

गुलमोहर: