Submitted by पाषाणभेद on 17 April, 2011 - 11:11
गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं
या गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं
उंच फना काढून पुंगीवर डोलतोय रं ||धृ||
मी बाई भित्री नाजूक माझी काया
डसला तर जाईल जीव माझा वाया
त्येला बघून मला भ्येव वाटतंय रं ||१||
त्याला नागपंचमीला दुध मी देते
त्याला लांबून नमस्कार करते
त्याला देवासमान मी मानते रं ||२||
त्याचा खेळ लई मजेदार असतो
पुंगी वाजवूनी नागोबा डोलतो
खेळ झाला की पैकं गोळा तू करतोय रं ||३||
बघ एक सांगते मी आता तुला
मुका प्राणी हा जर का मेला
मनेकाबाई तुला पकडतेय रं ||४||
मुक्या प्राण्याला असं छळनं नाही बरं
त्याच्यावर प्रेम करणं हेच आहे खरं
दाट झाडीत त्याला सोडतोस काय रं ||५||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०४/२०११
गुलमोहर:
शेअर करा
पाषाणभेदा - मी बाई भित्री
पाषाणभेदा -
मी बाई भित्री नाजूक माझी काया
डसला तर जाईल जीव माझा वाया
त्येला बघून मला भ्येव वाटतंय रं ||१||
मस्त डुलायला होतेय ..!!
आज दादा असते तर सिनेमात हे
आज दादा असते तर सिनेमात हे गाणं वाजलं असतं..
पाषाणभेद , दादांचे खरे
पाषाणभेद ,
दादांचे खरे वारसदार शोभताय तुम्ही
काय बकवास कविता आहे. तद्दन
काय बकवास कविता आहे.
तद्दन फालतू.
श्रुंगार काय्,द्वयर्थी काय,मनेका काय, भूतदया काय, काय वाट्टेल ते लिहिलंय.
पहिल्या कडव्यानंतर त्याला जुळेलसं काही लिहा छान द्वयर्थी गाणं तरी होईल.
हे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स सारखं झालंय. विचित्र कडबोळं.
लई भारी ! तुमच्या या कवितेने
लई भारी !

तुमच्या या कवितेने तर डोलायला लावल राव !
आपल्याला तर आवडलं बुवा.
आपल्याला तर आवडलं बुवा. काव्यज्ञानकोशाची सुरूवात आहे ही
जहबहरा !! आनंद शिंदेंना हे
जहबहरा !!
आनंद शिंदेंना हे गीत पाठवुन देवु का पुढच्या कॅसेट साठी ???
(No subject)
पाभे दिसतं तितकं सोप्प नाही
पाभे
दिसतं तितकं सोप्प नाही हे काम. तारेवरची कसरत आहे असल्या कविता. वाचताना ओठावर स्माईल यायला पाहीहजे. जरा बॅलन्स गेला कि माकड होईल माकड !!
हॅटस ऑफ !!