तेजोमय झाला आज पश्चिमेचा घाट
पाऊले ही चालती रायगडाची वाट
गेली सरून आज ती काळोखाची रात
या सूर्याने पावली त्या काळो़खावर मात
राज्याभिषेक आज त्या जाणत्या राजाचा
रुद्राच्या अवतार त्या शिवरायाचा
होऊन सशस्त्र,सिंहासनी बैसले शिवराज
सरले ते दिवस गुलामीचे,आता आपलाच राज
घुमतो मावळ मुलखात्,रांगडा शाहिरी फटका
गगनाला ललकारी उंच भगवा पताका
तीनशे शतकांचे आज बदलले द्रुष्य
आज घडले आहे हे अजिंक्य शिवधनुष्य....

जेष्ठातली उतरती सांज
उडू लागली धूळ त्यात
पसरली जणू आसमंतात
लग्नाची ही खबर-बात

मग केली गर्दी मेघांनी
गेले सारे आभाळ भरुनी
आच्छादन पडे, होई सावली
छे, हा तर मंडप दारी

वारा सुटला, सुटली पाने
पखरण पिवळ्या पानांची
धरती झाली पिवळी पिवळी
हळद लागली नवरीची

अंगण
छान सुबकसे जर्जर अंगण
मऊ मुलायम कुठे न खडवण
ओलावा अलवार राखते
धूळ न उसळे कधीही तेथून
छुमछुमले पैंजण कधी येथे
कंकण हिरवे चमकत होते
चिउ-काउच्या गोष्टी ऐकून
पिले उडाली सोडून घरटे
गर्द सावली उन्हे तळपली
ऋतुमानाची चाके फिरली
वादळवर्षा सुसाटवारे
सुरकुत थोडी दिसू लागली
दिसू लागता सांजसावल्या
अंगण अंतरी कातर कातर
तुळशीवृंदावन सामोरी
मंद मंद ज्योतीची थरथर
एकाकी त्या कातरवेळी
उरे साथीला सखी आगळी
एकमात्रचि ती रांगोळी
कणाकणांची केवळ जाळी
मैफ़ल
काल बिलावल गाताना मी तुला पाहिल
आणि मनाचा मालकंस झाला
मग तू भैरवी आळवेपर्यंत
डोळ्यातून मल्हार बरसतच होता....
उमेश वैद्य २०११
राहिले दूर, सख्या घर राहिले दूर ।
काळ हा रे लोटला, ठेवून आठवधूर ॥ ध्रु॥
कोणत्या वाटे निघालो? नाकळे आता,
संगती एकांत आणी विरहिणीचे सूर ॥१॥
अस्पष्टसा अन तो उद्याचा चेहरा दिसतो
काळजाला बुडविती रे काळज्यांचे पूर ॥२॥
शोधणे स्वतःस आता कठिणसे वाटे ,
दाटली गर्दीच सारी भोवती रे क्रूर ॥३॥
दोन घटका शांततेला सवडही नाही,
पाठलागाने सुखाच्या, लाभते हुरहूर ॥४॥
- चैतन्य दीक्षित.
नीज दैवाचे ग देणे,
मन टाळते शहाणे,
संथ क्षणांच्या प्रवाही,
दु:ख उमलुन येणे.
रंध्रातले गूढ गाणे,
मन रात्रीत ओवणे,
ओंजळीत जीव येता,
चुकवावी काही पाने.
- शशांक प्रतापवार
(चाल :थकले रे नन्दलाला.........चित्रपट -जगाच्या पाठीवर.)
नाच नाचूनी मी खूप दमले...
लुटले रे नन्दलाला...हो...लुटले रे नन्दलाला.....................ध्रू.
भल्या पहाटे ..कासीम आला...सिन्ध मधला..दाहीर खाल्ला
गझनी मधुनी महमुद येउनी...हिन्दु सम्पत्ती गेला घेऊनी....
भल्या पहाटे ही शोकांतीका,पार लुटले मजला...
लुटले रे नन्दलाला...हो...लुटले रे नन्दलाला.......................1.
घौरी साला,महंमद आला...प्रुथ्वीराज तू सांभा भोळा...
सोडून दिधले सत्रावेळा....चिरून टाकला तुझा गळा...
लुटले रे नन्दलाला...हो...लुटले रे नन्दलाला.....................2.
कुतुबुद्धिन तु,ईतुतमिश तू..बलबन तुचि..खिलजी ही तू...
वसंताने इतके रडविले, मला की
बरसूनी गेले, पावसाळे किती ....
फुलली फुले, इतुकी रंगीत सारी
की रंग माझ्यातले सारे, गेले विरुनी ....
फळांनी किती लवली फांदी, फांदी
की रसाळता सारी, आटुनी गेली ....
पालवी फुटे इतुकी , कोवळी कोवळी
की सृजनता सारी, शोषुनी गेली ....
मुक्तता
काही आहे करायचे काम हातावेगळे
आठवांना सोडायचे आज आहे मोकळे
पिंज-याचे काय काम रिकामा तो ही उरे
उघडतांना दार त्याचे हात का हा थरथरे
एक तरी परतूनी ते येईल आहे शक्यता
फ़िरूनी नाही कोंडायाचे त्यास लाभो मुक्तता
लागले जे रक्त त्याला कोणाचे हे ना कळे
दीनवाण्या पाखरांना मुक्ततेचे सोहळे
आठवांचे चिवचिवणे, किलबिल आता नको
उरली काही पिसे एकेक आता जाळणे
उमेश वैद्य २००९
हास्य माझ्या प्रेमाचे
तिच्या त्या चाहुलिने मी पघळायचो असा
जशी त्या चहात साखर पघळते
तिच्या त्या विचारात मी मग्न व्हायचो असा
जसा तो भ्राम्हन पोथित होतो मग्न
प्रयत्न मी फार केले जवळ तिच्या जाण्याचे
तिच्याशी बोलण्याचे तिच्यात रमण्याचे
तिच्यासमोर जाण्याची भिती अशी वाटायची
हसुनी माझे दात पीवळे तिला दिसण्याची
जेम तेम जसे तसे गाठले मी प्रेम गडाला
शेवटी मग मी गेलो प्रपोज तिजला करायला
तिनेही मला तेव्हा साथ द्यायच ठरवल
दुसर्या दिवशी लगेच मला भैया म्हणुन रोखल
अशी झाली हो दशा माझ्या अल्लड प्रेमाची