माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ५

Submitted by केदार on 3 August, 2013 - 05:43

आजचा मुक्काम अर्थातच लेह होता. कारगिल ते लेह २१६ किमी आहे.

Leh_map.JPG

कारगिल वरून लेहला जायला दोन रस्ते आहेत. एक धा आणि हाणू ( आपल्याकडे डहाणू आहे, निव्वळ योगायोग असावा का?) ह्या दोन गावातून जातो. इथे ड्रोपका लोकांच्या वसाहती आहे. लेह मध्ये तीन प्रकारच्या चेहरेपट्टी पहायला मिळतात. एक अर्थातच तिबेटी, दुसरी तुरतुक भागातील मुसलमानी आणि तिसरी ही ड्रोपका. हे ड्रोपका लोकं म्हणजे मुळ आर्य अशी देखील वंदता आहे. जर्मनी मधून इथे प्रेग्नंसी टूरिझम चालू असल्याच्या वंदता पण आहेत. ह्यांची चेहरेपट्टी मात्र खरच वेगळी आहे. इथे जायला अर्थातच परमिट लागते कारण ही गावं देखील बटालिक सेक्शन मध्ये येतात. पण मला धा आणि हाणू रस्त्याने न जाता दुसरा रस्ता घ्यायचा होता.
दुसरा रस्ता हा मुलबेख आणि लामायुरू ह्या गावातून जातो. हे रस्ता घेण्याचे कारण? मुलबेख मध्ये दगडात कोरलेली एक विशाल बुद्ध मूर्ती आहे. बुद्ध मूर्तींनी मला नेहमीच भुरळ घातली आहे.त्याच्या (बुद्धाच्या) चेहर्‍याकडे बघताना भान हारपल्यासारखे होते त्यामुळे मुलबेख वॉज मस्ट. आणि लामायुरू हे तेथील दगडांच्या रचने मुळे प्रसिद्ध आहे. येथील काही पर्वत हे मूनस्केप्स म्हणून ओळखले जातात. जणू काही चंद्रावरील जमीन तुम्ही पृथ्वीवर पाहू शकता. त्यामुळे हाच रस्ता निवडला होता. शिवाय हा रस्ता पूर्ण टार रोड आहे. कारगिल सोडले की फ्रेशली लेड टारमॅक तुमचे स्वागत करतो. पर्वतात असे रस्ते बांधणे एकवेळ सोपे आहे पण टिकवणे? ते पण रोजच्याच लॅन्ड स्लाईड्स मधून. हॅटस ऑफ अगेन!

आजचा रस्ता !

कारगिल -लेह रस्त्यावर (दुसर्‍या) दोन मोठे पासेस आहेत. एक म्हणजे नमिका ला (अल्टिट्युड १२१९८) आणि दुसरा म्हणजे फोतू ला. ( अल्टिट्युड १३४८७ फुट) फोतूला अर्थातच श्रीनगर - लेह रस्त्यावरील हायस्ट पाँईट आहे!

पहिला स्टॉप मुलबेख मधील मैत्रेय बुद्धाचे दर्शन!

मैत्रेय बुद्धाविषयी थोडेसे :
मैत्रेय बुद्ध हा गौतम बुद्धाचा पुढचा अवतार आहे. तो पृथ्वीवर अजून अवतरायचा आहे. बुद्धिस्ट ग्रंथ महायानानुसार जंबूद्विपावरील धम्म जेंव्हा लयाला जाईल तेंव्हा हा बौद्ध अवतार घेईल आणि धम्माची परत स्थापना करेल.

पुढील स्टॉप अर्थातच लामायुरू ! तेथील मॉनस्टरी.

आज मंदीरात कसलीतरी पूजा होती. आम्ही लामांना जास्त डिस्टर्ब न करता रजा घेतली. आणि पुढे निघालो मूनस्केप पाहण्यासाठी.

आणि हेच ते मूनस्केप्स. इथे दिन के वक्त नही रात मे देखना चाहिये ! अर्थातच आम्हाला आणखी एक रात्र लामायुरूत घालवायची नसल्यामुळे आम्ही पुढे निघालो.

इथे मला एक अशातच लग्न झालेले कपल भेटले. दोघेही आनंदात (अर्थातच !) दिसत होते. मग आम्ही थोडावेळ गप्पा मारल्या. तो लेह वरून आला बुलेटवर आला होता. ती फोटो घेण्यात मग्न होती. त्यांना लेह वरून येताना कुठेही मॅग्नेटिक हिल दिसले नाही, अशी तिने तक्रार केली. मी अजून तिथे जाणार होतो, पण तरीही उतरलो, की तुम्ही फारसे काही मिस केले नाही. ही लोकं सहा महिन्याच्या व्हेकेशन वर होती! माय गॉड! विश सेम हिअर !

आम्ही पुढे निघालो. जेवण्यासाठी रस्त्यावर एक पंजाबी ढाबा दिसला आणि आम्ही थांबावे की नाही असा विचार करत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. घेतल्याबरोबर जोरात हवा जाण्याचा आवाज येऊ लागला. पाहिले तर काय, समोरचे रस्त्याच्या कडेवर गेलेले टायर फ्लॅट! पहिले पंक्चर. पण वांदा नाही, ढाब्याच्या बाजूलाच पंक्चरचे दुकानही होते. गाडी तशीच मग ढाब्यावर घेतली, पंक्चर काढले अन जेवायला बसणार तितक्यात मी जिथे पार्क ( हो की नाही या विचारात) केली तिथेच एक आणखी टॅक्सी आली आणि तिचे देखील टायर फ्लॅट ! ओहो, तो ये स्किम थी. पंक्चर कराव और खाना भी खिलाव ! जी लोकं अर्थात सरळ निघून गेली त्यांचे टायर फ्लॅट झाले नाही. Happy असो. त्या टॅक्सीत पण पुणेकरच ! आणि ते गेली २० वर्षे हिमालयात ट्रेक करत आहेत. त्यांनाही कोणी सोबत नसते. ह्यावेळी त्यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर असा बेत आहे. मला ते धाडसी वगैरे समजून विचारतात. प्रज्ञा म्हणते, प्लिज ह्याला घेऊन जा, आणि आम्ही दोघे परत पुण्यात भेटू म्हणून आपापले पंक्चर काढून निरोप घेतो. जेवण तसे चांगलेच होते. आणि केवळ १८० रू मध्ये. पंक्चर मात्र महाग. माझेच टुल वापरून देखील ८० रू !

लामायुरू - लेह रस्त्यावर लेह साईटसिईंगचे अनेक पाँईट लागतात.
१. मॅग्नेटिक हिल.
२. सिंधू- झंस्कार संगम
३. गुरुद्वारा पथ्थर साहिब
४. अल्ची मॉन्स्टरी. - एक अत्यंत सुंदर असे बुद्धिस्ट देऊळ.

मॅग्नेटिक हिल लेह पासून २३ कि २८ किमी ( श्रीनगर रोडवर) आहे. इथे गाडी न्युट्रल मध्ये लावल्यावर गाडी पाठीमागे पाठीमागे जाते. रस्ता पूर्ण सरळ असला तरी! म्हणून ह्याला मॅग्नेटिक हिल असे नाव पडले. पण ते खरे नाही. रस्ता सरळ दिसत असला तरी थोडा(साच) उताराचा आहे. पण सो वॉट. यु निड लेह सेलिब्रेशन! सो बि इट. मॅग्नेटिक हिल!

हा हिल यायच्या आधी साधारण लेह पासून ४०-४२ किमीवर सिंधू- झंस्कार संगम होतो. सिंधू-झंस्कार संगमावर अनेक लोक कस्टमरी फोटोतर काढतातच, पण गाड्याही धुतात. Happy आम्ही अर्थातच संगम बघितला व मी मनातल्या मनात सिंधू संस्कृतीची आठवण केली. सिंधू दिसने ही भारतीयांसाठी एक वेगळीच बाब! सिंधू ! एक पवित्र नदी, जी आज भारतात नाही, पण आताश्या पाक मधूनही नाहीशी होत चालली आहे. खरेतर कैलासाला जाण्यापाठीमागचे माझे आणखी एक कारण सिंधू आहे.

पुढचा महत्वाचा पाँईट म्हणजे गुरुद्वारा पथ्थर साहिब. इथे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. पण इथे तुम्ही मस्त लंगर मध्ये जेवू शकता.

अल्चीला आम्ही गेलो नाही कारण सिंधू संगमानंतर यामिनी आणि प्रज्ञाला विरळ ऑक्सिजनमुळे खूप थकवा आला, डोके दुखायला सुरू झाले आणि यामिनीला एक उलटीही आली. केवळ २-३ तासांपूर्वी फोतू ला वर ती एकदम फ्रेश होती. पण AMS कॅन हिट एनीबडी अ‍ॅट एनीटाईम! हा AMS नसावा अशी "विश" मनातल्या मनात करून आम्ही निघालो.

आता आम्ही लेहच्या वेशीवर आलो होतो. पण आत जाण्याआधी मस्त पैकी चहा प्यावा असा विचार करुन थांबलो. चहा घेतला आणि फ्रेश मनाने आता पुढचे काम करायचे होते, ते म्हणजे चांगले हॉटेल शोधणे. आधीपासून असेच ठरले होते की श्रीनगर आणि लेह मध्ये चांगल्या हॉटेलमध्येच (रिसॉर्ट सदृष्य) राहायचे. मग माझ्या कडे असेलेल्या हॉटेलच्या ३५ पानी पिडिएफ मधून फोन लावने चालू केले. पण काही मजा नाही आली. मग एका ठिकाणी एक हॉटेल पाहिले. चांगले होते पण मजा नाही, परत मग ओल्ड रोडवर गेलो आणि आम्हाला आमच्या मनासारखे हॉटेल मिळाले. हॉटेल स्पिक एन स्पॅन अर्थातच हे बजेट हॉटेल नाही. आम्ही अर्थातच हॉटेल जेवण ब्रेकफास्ट अश्या पॅकेज सहीत घेतलं. कारण तेथील वेलकम चहा आणि हॉटेल मेड बिस्किटं आम्हाला आवडली होती. शिवाय आणखी एक छोटेस अमिश होते ते म्हणजे आज संध्याकाळी त्यांच्याकडे लडाखी सांस्कृतिक कार्यक्रम हॉटेल गेस्ट्स साठी आयोजित केला होता. माझे हेमिस फेस्टिव्हलला जाणे झाले नव्हते त्यामुळे हा कार्यक्रम तेथील संस्कृती पाहण्यासाठी एक पर्वणीच होता.

इथे आल्यावर मात्र यामिनीने थोडी झोप घेतली आणि ती परत फ्रेश झाली. गुड गॉड !

लडाखी स्त्रिया एक नृत्याविष्कार सादर करताना.

तर लडाखी पुरूष एका युद्धात गुंतले आहेत.

अदा

त्यांनी लडाख मधील वेगवेगळ्या भागातील नृत्य सादर केले. हे नृत्य हिमाचल जवळच्या स्पिती व्हॅली मधील.

तर ही पूर्ण संध्याकाळ सांस्कृतिक कार्यक्रमात गेली. टोटली वर्थ. आणि मस्त पैकी जेवनावर ताव मारून आम्ही उद्याच्या लोकल साइट सिईंगसाठी तयार झालो.

खुद्द लडाख मध्ये बघण्यासारखे तसे कमीच पाँईट्स आहेत. त्यातील तीन मी वर लिहिले. आज आम्ही शांती स्तूप, थिकसे मॉनस्टरी, लेह पॅलेस, शे पॅलेस वगैरे बघायचे ठरविले. लेह मधी सुप्रसिद्ध आणि श्रिमंत हेमिस गोम्पा हा कारूच्या जवळ म्हणजे लेह पासून ४० किमीवर आहे.

आमच्या हॉटेल मधून दिसणारा स्टोक कांगरी!

आज नाही उद्या मी स्टोक कांगरीवर ट्रेक करणार आहे !

लेह मनाली रस्त्यावर बहुतेक सर्व लोकल पाँईट्स आहे.

Leh local.JPG

वरील E,F हे शांती स्तूप आणि लेह पॅलेस आहे. पैकी लेह पॅलेसला गेला नाहीत तरी चालेल!

आणि ही आहे थिकसे!

आम्ही गेलो तेंव्हा तिथे प्रार्थना चालू होती, साहजिकच आम्ही मेडिटेशन करण्यासाठी बसलो.तेथील छोटा लामा!

तेथील चाळीस फुटी मूर्तीचा चेहरा.

ॐ मनी पद्म हूं! हा बौद्ध धर्मियांच्या एक पवित्र मंत्रापैकी एक !

आणि हा धीर गंभीर

तेथील एक फ्रेम !

पुन्हा थिकसेच

हा शे पॅलेस. जो थिकसेला जाताना लागतो.

आम्ही उलटे म्हणजे आधी थिकसेला जाऊन वापस येता येता शे, सिंधू वगैरे वरून आलो.

सिंधू !

आणि थंडगार पाण्यात खेळताना मुलं.

हा लेह पॅलेस.

आणि हा शांती स्तूप

शांती स्तूपाला तुम्ही पायी जाऊ शकता वा गाडी घेऊन. पण मी जातीचा ट्रेकर असल्यामुळे अर्थातच पायी. तिथे जायला ५०० पायर्‍या आहेत. आदित्य देखील कुठलिही मदत न घेता चढला. पण उतरताना मात्र कडेवर! इथून दिसणारे दृष्य फारच मनोहारी आहे. शांतीस्तूपाला जाऊन नाईट फोटोग्राफी काढणे मस्टच. पण ८ एक वाजले होते आणि मुलांना भूक लागली होती त्यामुळे नाईट फोटोग्राफीसाठी परत कधीतरी (उद्या परवा) येऊ असा विचार करून निघालो.

आज आणखी एक सगळ्यात महत्वाचे काम म्हणजे माझी गाडी मेकॅनिक कडे नेली. महिंद्राचे एक वर्कशॉप तिथे आहे. त्याला गाडी नेऊन दाखविली आणि मुख्य दोन कामं केली. एक एअर फिल्टर साफ करणे आणि दुसरे डिझेल फिल्टर मी गाडी घेतल्यापासून बदलले नव्हते. तसे ते खराब झाले नव्हते पण तरीही चेंज केले. सगळ्या लेव्हल्स परच चेक केल्या आणि मुख्य म्हणजे तेथील मॅकेनिकला माझ्यासोबत एक चक्कर (टेस्ट ड्राईव्ह) घेण्यास भाग पाडले, कारण मला पॉवर लॉस जाणवत होता आणि क्लच गेला की काय? अशी भितीही वाटत होती. पण त्याने सांगितले की पॉवर लॉस इथे कॉमन आहे आणि माझा क्लच एकदम बेष्ट आहे. झालं तर मग. एक मोठे ओझे उतरले. गाडी इथे परत एकदा धुवून घेतली आणि चकाचक केली.

कहानी मे टिव्स्ट!

ह्या सर्व गडबडीत काल आणि आज दोन्ही दिवशी प्रज्ञाच्या घरून फोन तर आले त्यात असे कळाले होते की तिच्या बाबांना थोडे बरं वाटत नाहीये. ते ७२ वर्षांचे आहेत पण योगा मुळे ७२ चे अजिबात वाटत नाहीत. तसा एकदम फिट माणूस. पण आता तिला चैन पडेना. प्रज्ञाला लगेच्या लगेच तिच्या बाबाला भेटायचे होते आणि आम्ही औरंगबादेपासून केवळ २५०० किमी दुर होतो ! मग प्लान ए, बी, सी असे डोक्यात घोळू लागले. प्रज्ञा आणि आदित्यने जावे, आम्ही सर्वांनी जावे आणि मी परत गाडी घ्यायला वापस यावे, मी आणि यामिनीने प्लान कंटिन्यु करावा इत्यादी इत्यादी. शिवाय कालपासूनच प्रज्ञाचे मन थोडे त्या फोनमुळे ट्रीपवरून तसे उडाले होते.आणि मग ह्यातून आम्ही मधला मार्ग स्विकारला. उद्या सकाळी प्रज्ञा आणि मुलं लेहवरून उड्डान करतील आणि मी माझी ट्रीप तशीच सुरू ठेवेन. सोलो ! आणि उद्या संध्याकाळी प्रज्ञा मला अपडेट करेल की नक्की काय झाले? त्यावरून मी लेहवरून निघायचे की ट्रीप पूर्ण करायची हे ठरवेन.

हॉटेल वर जाऊन लगेच उद्याच्या पहिल्या विमानाची तिकिटं बुक केली. आणि जेवून झोपलो. तिच्या वडिलांना काहीही झाले नाही हे मला मेव्हन्याने सांगीतले होतेच त्यामुळे मी बिनधास्त होतो. पण तरीही प्रज्ञाला भेटायचे होतेच. सो बि इट! शेवटी व्हेकेशन टेन्स राहून करता येते नाही. त्या ही क्षणी आम्हाला माहिती होते की ही विन विन सिच्युएशन आहे.

उद्या पासून एकटा असणार होतो. फॅमिली शिवाय. फक्त मी, चीता आणि हिमालय. मंध्यतरी मी माझे उद्यापासून लागणारे इनर लाईन परमिट काढून घेतले.

भाग एक
भाग दोन
भाग तीन
भाग चार
भाग पाच
भाग सहा
भाग सात
भाग आठ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटतेय वाचताना. लेहचे दिवस आठवले परत. Happy
आम्ही पण लेह - लामा युरु बाइकट्रीप केली होती. रस्ता चुकलो. हायवे सोडून चुकीच्या रस्त्याने गेलो, जो अंडर कन्स्ट्रक्शन होता. अगदी अविस्मरणीय ट्रीप झाली ती. Happy

थिकसे, हेमीस, शे पॅलेस सगळीकडे बाइकट्रीप केली होती.

सर्व लेख माला आणि फोटो अ प्रतिम आहे. चिमणूचे खेळतानाचे फोटो फार गोड आले आहेत.

Taking them on this trip is a wonderful thing you have done as a father. They will always remember these moments.

अर्रे, ह्या ट्विस्टची अपेक्षा केली नव्हती. गाडीशी किंवा निसर्गाच्या लहरीशी संबंधित काहीतरी असणार असे वाटले होते. पुढची ट्रिप एकट्याने केली की काय ? कुटुंबासोबत असण्याची मजा वेगळीच पण हिमालयात 'मैं और मेरी तनहाई' अनुभवणे हा सुद्धा एक भारी अनुभव असणार ह्यात शंका नाही.

फोटो आणि वर्णन नेहेमीप्रमाणेच छान Happy

मस्त चालू आहे सीरीज.

सिंधुदर्शन एकदम धन्य करणारे आहे...

अ‍ॅडमिन, ही लेखमालिका करा ना प्लीज. Happy

अप्रतिम फोटो. लामायुरी मोनॅस्टरीचे फोटो तर विलक्षण देखणे वाटले.

>>तो ये स्किम थी. पंक्चर कराव और खाना भी खिलाव ! Lol

वाचायला सुरूवात केली आणी ड्रोपका जमातीबद्दल उत्सुकता वाटली म्हणून गुगल केलं तर अचाटच माहीती मीळाली :

http://www.ufoevidence.org/documents/doc164.htm

http://en.wikipedia.org/wiki/Sungods_in_Exile

http://en.wikipedia.org/wiki/Dropa_stones

ईंटरेस्टींग!!!!

आता लेख पुढे वाचते......

जर्मनी मधून इथे प्रेग्नंसी टूरिझम चालू असल्याच्या वंदता पण आहेत. >> म्हणजे काय? आणी का?

सिंधुदर्शन एकदम धन्य करणारे आहे... >>> नंदीनीस अनुमोदन.

बहुतेक आर्य लोकांचे जीन्स पुढच्या पिढीला मिळावेत म्हणुन जर्मन्स येत असावेत . पण गुगुलूवर ह्याविषयी फारशी माहीती मिळाली नाही.

> म्हणजे काय? आणी का? >> श्री ने लिहिल्यासरखेच. पण मी वर लिहिल्यासारखे ही वंदता आहे म्हणजे अफवाही असू शकते. पण काही लोकांना तेथील लोकल्सनी सांगीतले ( धा आणि हाणू मधील) म्हणून ते सर्व लडाखी प्रेमी मध्ये पसरले आहे. कदाचित एखाद दोनच केसेस घडल्या असाव्या आणि त्याला "प्रेग्नंसी टूरिझम" हे नावही इंटरनेट मुळे मिळाले असावे.

पुढची ट्रीप अर्थात मी केलीच. पण त्या बद्दल पुढच्या भागात लिहितो. Happy

गाडीशी किंवा निसर्गाच्या लहरीशी संबंधित काहीतरी असणार असे वाटले >> निसर्गाची लहर तर आहे. पण ती ट्विस्ट नव्हती कारण तेथील निसर्ग अत्यंत लहरी आहे आणि टुरिस्ट कसे अडकून पडले ते मी लिहिणार आहेच. शिवाय मला अनेक डेंजरस (अगदी गाड्या वाहून नेतील अश्या) वॉटर क्रॉसिंग क्रॉस कराव्या लागल्या. त्या बद्दलही येईलच पुढील सर्व भागात. Happy

सही फोटो आणि वर्णन..
'अर्थातच' शब्द कितीदा वापरलास रे ह्या भागात.. Happy

Pages