आजचा प्लान होता बटिंडा ते श्रीनगर!
बटिंडावरून सकाळी नाश्ता करून निघालो. (काल ती चूक केली होती.) तिथूनही दोन मार्ग जातात. एक व्हाया अमृतसर व दुसरा जालंदर. मग अमृतसरच्या गोल्डन टेंपल मंदिरात जावे की जालंदर वरून जम्मूकडे जावे ह्यावर टॉस करून निर्णय घ्यायचा ठरविले. गोल्डन टेंपलला प्रज्ञाला जायचे होते तर मी म्हणत होतो की आपण गोल्डन टेम्पल परत करू. नाहीतरी आपले एक घर दक्षिण काशी ( नांदेड) मध्ये आहेच तर तेथील गुरुद्वारा आणि हा, ह्यात काही फार फरक नाही. मग अमृतसर कॅन्सल करून मी माझ्या गाडीच्या जीपीस वर भरवसा ठेवून आजचे डेस्टीनेशन श्रीनगर, जम्मू अॅन्ड काश्मिर असे टाकले. आज केवळ ६३३ किमी जाणार होतो. तुलनेने रोजपेक्षा ३०० किमी कमी प्रवास ह्या आनंदात आम्ही होतो ! लिटल डिड आय नो, की आपण आज पटनीटॉपलाच पोहचू शकतो.
तर आम्ही जे BSNL कार्ड घेतले होते ते एव्हाना अॅक्टीव्हेट झाले होते असा SMS माझ्या एअरटेल वर आल्यामुळे आम्ही प्रज्ञाच्या फोनमधील सीम बदलून हे नवीन सीम टाकायचा विचार केला आणि तिच्या फोनमधून तिने कार्ड काढले खरे, पण दुसरे कार्ड स्लॉट मध्ये जायलाच तयार होत नव्हते. तो स्लॉटच खराब झाला होता ! म्हणजे अब कार्ड तो तीन और चलनेवाला फोन एकच. आणि तो पण फुल सीम कार्ड वाला नाही तर माझा आयफोन. म्हणजे आता सीम कार्ड साठी फोन विकत घ्यावा लागणार वा तो स्लॉट दुरूस्त करण्यासाठी २-३ तास वाट पाहावी लागणार. Time was at premium! मग काय एक ड्युअल सीमवाला
नोकियाच घेतला आणि दोन्ही सीम (रादर तिन्ही) सुरू झाले. टाईम टू एन्जॉय. मग जालंदरच्या अलिकडील एका ढाब्यावर यथेच्छ ताव हाणला.
Map my India च्या जीपिसमध्ये (निदान महिंद्रा व्हर्जन) "टेक बायपास" असा ऑप्शन नसावा बहुदा. त्या बाईने आम्हाला तीनदा गावात नेले आणि आम्ही १-१ तास गावात गरज नसताना अडकून पडलो. जालंदरमध्ये तर दोन तास अडकलो कारण एक ट्रेन तशीच थांबून राहिली.आणि आम्ही भरगावात गेट वर. मग माझ्या फोन मधील GPS च्या अंत्यत भरवश्याच्या अशा गुगल मॅप्सचा आधार घेऊन आम्ही जालंदरचे दिव्य पार केले. तिथून आम्ही पठानकोटच्या रस्त्याला लागलो तेंव्हा हुश्श वाटले.
पठानकोट १ तासावर असताना आम्हाला पहिला मिल्ट्री कॉन्व्हॉय लागला. वॉट अ साईट. ४० एक स्टॅलियन गाड्या एका रेषेत काश्मीर खोर्यात चालल्या होत्या. पठानकोटच्या अलिकडे एक टोल नाका आहे. तिथे कडक चेकिंग चालू होते.आणि आम्ही परत अडकलो. योगायोगाने आमच्या समोरचा सॅन्ट्रोवाला हा हरयानवी पोलिटिशन होता. ( तेच पांढरे कपडे, तीच दाढी, तसाच चष्मा वगैरे वगैरे) त्याला घाई होती, त्याने आणि एका मिल्ट्रीवाल्याने मग जुगाड करून जॅम मधून रस्ता काढला. आमची XUV देखील त्या पाठी निघाली ! आम्ही टोलनाका चुकवून मस्त पिक्चर मध्ये जसे शेत दाखवतात तश्या रस्त्यातून तो टोल नाका बाय पास करून जम्मूच्या रस्त्याला लागलो आणि जम्मू मध्ये प्रवेश करते झालो. बायदवे पंजाब मधील शेतं खरेच लोभस आहेत. एकदम जबरी साईट असते ती.
पठानकोटच्या एका फुल टू मॉडर्न धाब्यात आदित्य खेळताना.
आजचा खरा प्लान होता श्रीनगर गाठायचा. पण आम्ही आत्ता कुठे लखनपुरपाशी येऊन पोचलो. टोल देतो न देतो तोच अनेक काश्मिरी विक्रेत्यांनी घेरले आणि वस्तू विकावयास सुरूवात केली. सोललेल्या नारळापासून ते वॉलनट,बदाम ते चेरी ते क्रिकेटच्या बॅट्स हे सर्व लखनपुरच्या टोल नाक्याजवळ मिळते. आम्ही पण ट्रीपची भवनी म्हणून बदाम, चेरी, आक्रोड इत्यादी खरेदी केले. इथे घासाघीस केली नाही तर तुम्ही लुबाडले जाल.
टोल नाका पार करेपर्यंत चारएक वाजले. तेथून जम्मू कडे सुसाट वेगाने NH1 वरून गाडी धावत होती. श्रीनगरला जाता येईल असे आत्ताही वाटत होते कारण केवळ ३५४ किमी असा बोर्ड दिसत होता. जम्मूला चहा घेऊन पुढे गेलो. जम्मू बायपास घेतला की सुरू झाली हिमायलन चढाई! आता हा हिमायल पुढचे अनेक दिवस सोबत राहणार होता. पार किरतपुर पार करे पर्यंत! हिमायलाची अनेक रुपं ह्या प्रवासात बघायला मिळणार होती. देवदार आणि पाईन ट्री मधील हिरवा हिमालय, अमरनाथाला तयार करणारा पांढरा हिमायल आणि लडाख मधील ग्रे हिमालय, ज्यावर गवत सुद्धा दिसत नाही तो हिमालय !
जम्मू ते श्रीनगर मधील अंतर कमी करण्यासाठी आता मोठ्या वेगाने ह्या हिमालयात खोदकाम, बांधकाम चालू आहे. आम्ही पोचलो तेंव्हा रात्र होती तरीही लाईट लावून बांधकाम चालू आहे. मोठे मोठे बोगदे आणि फ्लायओव्हर बांधणे चालू आहे. हे झाले की जम्मू ते श्रीनगर अंतर केवळ अर्ध्या वेळात कापता येईल. त्याला अजून निदान ५ वर्षे लागतील असे दिसते.
जम्मू पासून काश्मीर खोर्याला दुर करते ते पटनीटॉप आणि जवाहर टनेल. पटनीटॉप 2,024 m (6,640 ft) ह्या उंची वर आहे. मी जेंव्हा गेलो तेंव्हा अमरनाथ यात्रा चालू असल्यामुळे चोवीस तास ट्रॅफिक होती. ह्या पूर्ण घाटात बंपर टू बंपर ट्रॅफिक असल्यामुळे गाडी जोरात हाकणे कठीण झाले होते. त्यातच धुक्याला सुरूवात झाली.
आणि बघता बघता ते धुके असे गडद होत चालले होते.
हळू हळू एकेक फुटांवरचे दिसणे कठीण होत गेले आणि डेड स्पिड मध्ये गाडी पुढे जायला सुरूवात झाली. एका बाजूला देवदार वृक्षांच्या दर्या तर दुसर्या बाजूला डोंगर असे आम्ही वरच वर चाललो होतो. मग सर्वानुमते आज श्रीनगर 'नको' तर केवळ पटनीटॉप गाठू अन ९ वाजे पर्यंत झोपू असा विचार आम्ही केला. तेंव्हा पटनीटॉप होते केवळ ३० किमी आणि वाजले होते साडेसात. Never underestimate mother nature! पटनीटॉपचे हॉटेल गाठायला आम्हाला रात्रीचे ११:३० झाले ! केवळ ३० किमीला फक्त ४ तास !
तिथे जाऊन आम्हाला हॉटेल शोधायचे होते. एक दोन ठिकाणी शोध घेतला तर अगदी बकवास रूम्स होत्या. मग अजून शोध घेऊ असे ठरवून मी JKTDC च्या हॉटेल मध्ये गेलो. तिथे रूम नव्हतीच. पण मध्यरात्री तिथे त्या जागी दोन मुलं भेटली, जी रात्री रिव्हर्स मध्ये गाडी घेत होती. त्यापैकी एक जण खिडकीत काचा खाली करून बसला होता व त्याचे अर्धे शरीर बाहेर होते. त्याने आम्हाला एक विनंती केली.
"भैय्या इधर रूम नही मिला तो कोई नही, सामने जगह है, पर आप एकदम आरामसे चलाना, आपके साथ फॅमिली है"
मी : हो
तो : एकदम ० की स्पिडसे चलाना.
दुसरा : अबे ० की स्पिडसे गाडी चलेगी क्या? कुछबी बकता है!
मी : ठिक है.
तो : मेरी बिनती है.
मी : ठिक है.
तो : मेरी बिनती है.
मी : ठिक है.
दुसरा: जादा पि रख्खी है
खरेतर दोघांनी पण खूप चढवली होती.
ह्या विनोदामुळे आमचे ते ४-५ तास धुक्यातून बंपर तू बंपर गाडी चालवल्याच्या ताण कुठच्या कुठे पळाला. पुढे दोन दिवस "० की स्पिड" वर माझी मुलगी तुफान हसत होती. असे करता करता आम्हालाही हॉटेल मिळाले व वी हिट द सॅक. फक्त रात्रीचा १ वाजला होता.
हा दिवस श्रीनगर न येताच गेला. दुसर्या दिवशी मस्त नाश्ता वगैरे घेऊन आम्ही १० वाजता निघालो. श्रीनगरला केवळ उतरायचे होते आणि जवाहर टनेल पार करायचा होता. पण रोड मात्र जबरीच होता.
अमरनाथ यात्रेमुळे अनेक खायचे स्टॉल रस्तात होते. आम्ही मस्त छोले-पुरी-शिरा असे जेवण एका लंगर मध्ये बनिहालला केले. आणि पुढे निघालो. बनिहालमध्येच मागच्या महिन्यात आपल्या पंतप्रधानांनी एका टनेलच उदघाटन केले तो देखील बघितला. मिल्ट्री, J&K पोलिस ह्यांसोबत प्रज्ञा व मुलांनी फोटो काढले, जवाहर टनेल पार करून आम्ही श्रीनगर खोर्यात पोचलो.
मग श्रीनगर जवळ आम्हाला, यु आर गोईंग थू ग्रीन टनेल" असा बोर्ड लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच देवदारांच्या कमानी होत्या. अतिशय सुंदर ड्राईव्ह. असे मजल दर मजल करत आम्ही श्रीनगर मुक्कामी पोचलो.
प्रज्ञाला श्रीनगर पाहायचेच होते, मला श्रीनगर सोडून कधी एकदा सोनामर्गला (लेहच्या रस्त्यावर) जातो असे झाले होते, पण ह्या लढाईत विजय अर्थात प्रज्ञाचा झाला आणि आम्ही मग आधी एक रात्र राहू असे करून तिथे दोन रात्री मुक्काम केला. पहिली संध्याकाळ अर्थातच दाल लेक मध्ये घालविली.
दाललेक मध्ये तुम्ही शिकारा राईड घेतली की लोकं कश्ती घेऊन अनेक गोष्टी विकायला येतात.( राईडची किंमत १००० रू) एकही मिनिट तुम्ही एंजॉय नाही करू शकत. तो शिकारावाला तुम्हाला त्याच्या ठरलेल्या लोकांकडे घेऊन जाणारच. पूर्ण जुने श्रीनगर ही "लेक सिटी" आहे. मग ऑफकोर्स आम्हीही खरेदीदार झालो आणि एका लेकसाईड दुकानात जाऊन काश्मिरी ड्रेसेस गिफ्ट आणि इतर अशी भरपूर खरेदी केली. तुमच्या कडे पैसे नाहीत? नो प्रॉब्लेम, ते लोक ५०० रू घेऊन व्हिपीपी ने देखील पाठवतात ! अर्थात आम्ही क्रेडीट कार्ड दिले, जे त्याकडे चालत होते. शिकार्यामध्येच (खरेदीसहीत) आम्ही ४ एक तास घालवले. आजचा दिवस असाच संपला !
दुसर्या दिवशी अर्थात मला इ स पूर्व स्थापना झालेल्या शंकराचार्यांच्या मंदिरात मला जायचे होते. प्रज्ञाने मंदीर परत चालत येण्यापेक्षा रेस्ट घेणे पसंत केले. मग मी आणि यामिनी आम्ही दोघे मंदीरात गेलो. तिथे ही गर्दी! सगळ्या अमरनाथ यात्रेकरूंना श्रीनगरला यावे लागतेच. ते सर्व इथेही गर्दी करतात. शिवाय रांग वगैरे लावण्याच्या प्रश्न नाहीच. मग मी आणि एका मुलीने ( ती ही मराठीच) ह्या सर्वांवर दादागिरी करत त्यांना एकच लाईन लावायला लावली. आमचेही दर्शन व्यवस्थित झाले. हे मंदीर आणि त्या बाजूचे टिव्ही टॉवर "मिशन काश्मीर" मध्येही पाहायला मिळेल.
इथून दिसणारे श्रीनगर.
मग दुपारी निवांत झालो आणि संध्याकाळी एका अद्वितीय राईड्साठी तयार झालो. श्रीनगर ही लेक सिटी आहे. अनेक तलाव एकमेकांना जोडलेले आहेत. शिकारा राईड तर घ्यायचीच होती पण दाल लेक मध्ये नको. एकतर हजरतबाल दर्गा लेकला जाऊन तिथे दर्शन घेणे किंवा नगीना लेक राईड असे दोन पर्याय ३ तासांच्या राईड साठी शिकारा मालकाने ठेवले. सिक्युरिटीमुळे आम्ही हजरतबल टाळला. मला जायचे होते. मग आम्ही एक सुंदर लेक नगीना लेक राईड घेतली. ही राईड लोक सांगत नाहीत कारण महाग आहे. ( २५०० रू , आदल्या दिवशीचाच शिकारावाला होता म्हणून आम्हाला १८०० ) शिवाय सर्व जण दाल लेक मध्ये समाधानी असतात. पण तुम्ही काही हटके आहे का? हे विचारल्यावर ही राईड सांगीतली जाते. दाल लेक मध्ये भारतीय तर नगीना मध्ये फॉरेनर्स अस्तात. तिथे कोणीही मध्येच काहीही विकायला येत नाही. अतिशय सुंदर राईड! ही ओल्ड सिटी मधून जात असल्यामुळे काश्मीरी पंडितांची जुनी घर पाहायला मिळतात. अर्थात ती आता तेथील लोकांनी बळकावली आहेत.
नगीना लेक एकेकाळी पूर्ण पारदर्शी होता असे शिकारा चालविणार्यांचे म्हणणे होते. हा लेक दाल पेक्षा अतिशय स्वच्छ अन सुंदर आहे.
श्रीनगर मध्ये आणखी बघण्यासारखं काय तर तेथील गार्डन्स. शालिमार, निशान, चष्मेशाही वगैरे. आम्ही शालिमारला गेलो. ही सर्व गार्डन ओव्हरहाईप्ड आहेत. तिथे जाऊन भ्रमनिरास होण्यापेक्षा न गेलेले चांगले. अर्थात शालिमार मध्ये मी फुलांचे अनेक मॅक्रो काढले पण ते मला इथे सारसबागेत देखील काढायला मिळाले असते.
तर हे दिवस तसे निवांतच गेले. दुसर्या शिकारा राईड मुळे श्रीनगरची प्रतिमा आमच्या मनात नक्कीच चांगली झाली अन्यथा दाल लेकमुले त्याला तसा तडा गेला होता. आता मला वेध लागले होते झोझिला पासचे. सोनमर्ग पार केल्यावर लगेच झोझिला लागतो. तो पास म्हणजे ड्रायव्हिंग स्किल आहेत की नाही? ह्याची परिक्षा होती. जरा लवकर उठू असा विचार करून आम्ही ह्या दिवसाला (की रात्रीला कारण ११ वाजले होते) रामराम केला ! स्वप्नातही झोझिला दिसलाच !
Mast re.. pudhachya bhaganchi
Mast re.. pudhachya bhaganchi vat baghatoy. Tu ikade aalas ki jau kuthetari..
सही रे..... फोटोतच जाणवतय
सही रे..... फोटोतच जाणवतय धुकं कसलं दाट आहे ते.. ३०किमीला ४ तास.. जबरी अनुभव घेतलेस तू.
आगे बढो...
सहीच.... स्वप्नात तु गाडी
सहीच....
स्वप्नात तु गाडी चालव्त होता की नाही.
इतकी गाडी चालव्ली तर मी स्वप्नातही गीअर, क्लच, अॅक्शलरेटर ऑपरेट करेन..
भारी, धुक्याचा फोटो टेरर आहे
भारी, धुक्याचा फोटो टेरर आहे एकदम.
तुझा लेक तुझ्यासारखाच दिसतो. मुलगी आईवर गेलेली असावी.
जवाहर टनेल नंतरचा दरिचा फोटो
जवाहर टनेल नंतरचा दरिचा फोटो जबरी आहे. नगीना लेक मस्तच.
तुझा लेक तुझ्यासारखाच दिसतो. > +१
सह्हीच...
सह्हीच...:स्मित:
पटापट लिहीतोयस त्याबद्दल
पटापट लिहीतोयस त्याबद्दल आभारी आहोत.
त्या दरीत जी नदी दिसतेय ती
त्या दरीत जी नदी दिसतेय ती चिनाब ! चालवताना असे वाटते की अरे आपण आता ग्राउंड लेवलला (नदीच्या एकदम बाजूला) आलो आणि १०-२० मिनिटात एकदम २००० फुट उंच. मग ती एकदम भयान वाटायला लागते आणि पूर्ण रस्ता असाच आहे. चिनाबच्या बाजूने. धुक्यामुळे फोटोत पूर्ण रांगा दिसत नाहीत. अशा जागेत चालवणारा आणि फोटो काढणारा एकच असला की फोटो कमी निघतात. कारण चालवताना नाही म्हणलं तरी खूप स्ट्रेस येतो आणि फोटो काढायला थांबता येत नाही कारण मग एकच लेन असल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक थांबते.
हो आदित्य माझ्यासारखाच दिसतो.
मस्त चालले आहे. झकास.
मस्त चालले आहे. झकास.
मस्तच !!
मस्तच !!
मस्त हा भाग पण.. टेम्पो आहे
मस्त हा भाग पण.. टेम्पो आहे तो पर्यंत लिहून काढ फटाफट..
खूप छान वर्णन ३ वर्षापूर्वी
खूप छान वर्णन
३ वर्षापूर्वी माझा भाऊ आणि आमचा बाईकटूरचा ग्रुप लेहलधाकला गेला होता. माझी ती बाईक टूर काही कारणास्तव चुकली होती. पण आता तुम्हचे हे वर्णन वाचून लेहलधाकला जावयाची इच्छा झाली आहे.
केदार, फोटो सुंदर. सही
केदार, फोटो सुंदर.
सही लिहितो आहेस. हे नंतरचे दोन्ही भाग आवडले.
बाय द वे, हाय कमांडकडून फक्त ऑर्डर्स घ्यायच्या सोडून लढाई?
या तुमच्या टूरचा संपूर्ण खर्च
या तुमच्या टूरचा संपूर्ण खर्च किती ?
भाग २ आणि ३ एका दमात
भाग २ आणि ३ एका दमात वाचले!
जबरदस्त!
मस्त!! आदित्य अगदी
मस्त!!
आदित्य अगदी तुझ्याचसारखा दिसतो
सही चालु आहे ट्रिप
सही चालु आहे ट्रिप
आदित्य अगदी तुझ्याचसारखा
आदित्य अगदी तुझ्याचसारखा दिसतो }}
बायका म्हणजे बायकाच. विषय काय बोलताय काय !!
मस्त आहेत. धुक्याचा फोटो जबरी
मस्त आहेत. धुक्याचा फोटो जबरी आलाय. दर दिवसाचा वृत्तांत लिहिल्याने नक्की अंदाज येतोय प्रवासाचा...
पराग, आडो हो लवकरच सर्व
पराग, आडो हो लवकरच सर्व टाकायचे आहे टेम्पो जायच्या आत. आणि विकेंडला मी परत न्युयॉर्कला जातोय त्यामुळेही.
नंदिनी हो पण हा भाग ३-४ दिवसांचा आहे.
मंजू हो.
हाय कमांडकडून फक्त ऑर्डर्स घ्यायच्या सोडून लढाई? >> लढाई कसली. आता तर शस्त्रही बोथट झाली आहेत.
जयदीप, मला खर्च खूप(च) जास्त आला कारण आम्ही काही दिवस अत्यंत महागड्या हॉटेल्स मध्ये राहिलो. पण साधारण तुम्ही बाईक वर गेलात तर बजेट व्हेकेशन ४० ते ४५००० मध्ये होईल. बर्याच साईट्स तर ३०००० मध्ये X दिल्ली लेहच्या ट्रीप आखतात. (अर्थात पर पर्सन) आमचा पर पर्सन खर्च ह्यापेक्षा जास्तच आहे.
माझे रेकमंडेशन असे राहिल की व्हेकेशन स्वतःच आखावे व स्वतःच पार पाडावे अगदी एकटे गेलात तरी! त्यामुळेच आम्ही पटनीटॉप, श्रीनगर असे एक्स्ट्रा राहिलो जे टूर ऑपरेटरसोबत शक्य झाले नसते.
सही!! मस्त अॅडव्हेंचरस ट्रीप
सही!! मस्त अॅडव्हेंचरस ट्रीप केलीत की!!
प्रत्येक भागात मॅप देताय त्यामुळे सगळी ठिकाणे डोळ्यासमोर आणायला सोपे जात आहे.
पण दिवसच्या दिवस गाडीत बसल्यावर मुलांना कधी कंटाळा आला का नाही?
छान ! असंच झिरो स्पिडमध्ये
छान ! असंच झिरो स्पिडमध्ये चालू दे .
फोटो आणि वर्णन दोन्ही भारी
फोटो आणि वर्णन दोन्ही भारी !
ती चिखल लागलेली गाडी आता अभिमानाने व्रण मिरवणार्या सैनिकासारखी शूरवीर वाटतेय
पुढचे भागही येऊ द्या भरभर.
मस्त !
मस्त !
मजा येतेय वाचायला! पटनी टॉपही
मजा येतेय वाचायला! पटनी टॉपही अतिशय नयनरम्य आहे नाही का?
अभिमानाने व्रण मिरवणार्या
अभिमानाने व्रण मिरवणार्या सैनिकासारखी शूरवीर वाटतेय >> सिरियसली. मलाही तसेच वाटले होते.
हनुमानगडच्या आधी एक छोटेसे गाव होते जिथे आम्ही चहा प्यायला थांबलो. गाडी तिथे येईपर्यंत अगदी काळी झाली होती. मग मी त्या धाब्यावर पाणी टाकून धुण्याचा प्रयत्न ही केला. बरचं निघालं आणि बराच चिखल तसाच राहिला. अक्षरशः चिखलाचे नवीन दोन लेअर तयार झाले होते. गाडी मग श्रीनगर मध्ये आणि परत लेह मध्ये वॉशिंग सेंटरला नेऊन धुवून काढली. पुढे मस्त स्वच्छ फोटो (गाडीचे) आहेत.
पण दिवसच्या दिवस गाडीत बसल्यावर मुलांना कधी कंटाळा आला का नाही? >> जास्त नाही, पण श्रीनगर कंटाळ्याची सुरूवात नक्कीच होती. कहानी मे अभी बहोत बडा ट्विस्ट बाकी है !
असंच झिरो स्पिडमध्ये चालू दे . >> लोल.
दिनेश - चला तर मग पुढच्या वर्षी!
पटनी टॉपही अतिशय नयनरम्य आहे नाही का? >>> हो नयनरम्य ! हेच एक डेस्टिनेशन होऊ शकते.
कहानी मे अभी बहोत बडा ट्विस्ट
कहानी मे अभी बहोत बडा ट्विस्ट बाकी है !>>>> :उत्सुकतेने न झोपलेली बाहुली:
खरच कौतुक आहे मुलांचं!
लेकीला हे सगळे मोठेपणी पण आठवेल. तिच्यासाठी भारी अनुभव झाला असेल हा! लेकाला थोडेफार आठवेल ट्रीपमधले.
व्वा केदार मस्त. अशी स्वतः
व्वा केदार मस्त. अशी स्वतः केलेली ट्रीप जास्त मजा देते. काश्मीर सूंदरी गोड आहे.
सॉलिड चाललीये ट्रीप दोस्ता !
सॉलिड चाललीये ट्रीप दोस्ता ! आताच तिनही भाग वाचून काढले.
मिथुनच्या आवाजात "क्या बात, क्या बात, क्या बात" करावेसे वाटले !
लेह-लडाख अल्टिमेटच आहे. प्रत्येक भारतीयाने एकदातरी करावे. मी २००९ मधे असाच पुण्याहून स्वतःचे वाहन हाकत लडाख सर केले होते, त्या आठवणी जाग्या झाल्या.
माझे वाहन जरा कमी ताकदवान होते- १५०सीसी होन्डा युनिकॉर्न.
असो.
पुढे वाचण्यास उत्सुक !
अरे वा! तिसरा भागही आला.
अरे वा! तिसरा भागही आला. मस्तच.
Pages