हिंदु धर्म आणि शाप

Submitted by वेडा राघू on 30 July, 2013 - 11:27

हिंदु धर्म आणि शाप

हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. Happy शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित.

प्रचंड तिरस्कार मनात घेऊन शाप दिल्यास तो कदाचित फळाला येत असावा की काय असे वाटते. पण मग याने शाप देणार्‍याला काही त्रास नसेल का होत? प्रत्येकालाच कुणाचा ना कुणाचा शाप आहे. हिंदु धर्मात तशी एकंदरच क्षमा केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतील. मग आपण स्वतःला क्षमाशील / सहिष्णू वगैरे का समजतो ? शापाला उ:शापही असतात का? ते नेमके कुणाकडून घ्यावेत ? ज्याने शाप दिले त्याच्याचकडून ? की कोणाकडूनही?

अशा शापांच्या मनोरंजक कथा / प्रसंग / तात्पर्य एकत्र करण्यासाठी हा धागा आहे. इतर धार्मिक माहितीही चालेल.

१. सर्वात भीषण शाप. वाल्मिकीनी व्याधाला दिला. पक्ष्याला मारल्याबद्दल.

२. दशरथाला श्रावणाच्या पिताजींचा शाप.

३. कर्णाला परशुरामाचा शाप ( तुझी विद्या विफल होईल .)

४. अर्जुनाला उर्वशीचा शाप. ( तिची कामवासना पूर्ण न केल्याने तिने शाप दिला तू नपुंसक होशील. मग तो बृहन्नडा झाला.)

५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.)

६. रामाला वालीचा शाप. ( तू बाण लागून मरशील. तो कृष्णावतारात खरा ठरला.)

७. रामाला वालीची पत्नी तारा हिचा शाप. ( तुझी बायको तुला मिळेल, पण अल्पकाळात ती पुन्हा दुरावेल.)

८. गणपतीचा चंद्राला शाप. ( क्षय)

९. अर्जुनाचा समस्त स्त्रीजातीला शाप. ( तुमच्या मनात कोणतेही रहस्य लपून रहाणार नाही. )

१०. कृष्णाला गांधारीचा शाप. ( निर्वंश होशील.)

११. यादव कुळाला कुण्या ऋषीचा शाप. ( नष्ट व्हाल. ऋषीची चेष्टा केल्यामुळे.)

१२. जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल.

१३. ब्रह्मदेवाला शंकराचा शाप. तुझी कुणी पूजा करणार नाही. ( कारण काय?)

१४. अश्वत्थाम्याला कृष्णाचा / द्रौपदीचा शाप . ( डिटेल्स ?)

१५. कुणला तरी शाप . तू साप चाउन मरशील. मग बोराच्या बीतून अळी येऊन त्याचा साप होतो.

१६. अंबेचा भीष्माला शाप. अंबेला शिखंडीचा जन्म मिळाला त्यातही आणखी कुठला तरी एक शाप आहे.

१७. इंद्राला सहस्त्र भोकं पडतील असा शाप. ( अहिल्या )

अँड सो ऑन ............

शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया. Proud

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वात भीषण शाप. वाल्मिकीनी व्याधाला दिला. पक्ष्याला मारल्याबद्दल.
>>
हे पहिल्यांदाच ऐकतोय. प्रणयरत क्रौंच पक्ष्याच्या जोडप्याला व्याधाने मारले तेव्हा वाल्मिकींना काव्य स्फुरले होते. ते जगातले आद्यकाव्य असे म्हणतात.
जर तुम्हाला अजुन माहिती असेल तर सांगा.

गणपतीचा चंद्राला शाप. ( क्षय)
>>
क्षयाचा शाप चंद्राला दक्षाने दिला होता. गणपतीने चंद्र कोणी पहाणार नाही, पाहिल्यास चोरीचा आळ येईल असा शाप दिला होता.

अर्जुनाचा समस्त स्त्रीजातीला शाप.
>>
धर्माने हा शाप दिला होता. कर्णाचे जन्मरहस्य कळल्यावर.

कुणला तरी शाप . तू साप चाउन मरशील.
>>
राजा परीक्षिताला शाप दिला होता.

अश्वत्थाम्याला कृष्णाचा / द्रौपदीचा शाप .
>>
कृष्णाने दिला.

जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल.
>>
अप्सरेने नाही, सनत्कुमारांनी दिला.

शाप देण्यात फेमस अश्या दुर्वासांना कसे विसरलात<<<

ते हिंदू नव्हते अश्या उत्तरास तयार राहा!

हे पहिल्यांदाच ऐकतोय. प्रणयरत क्रौंच पक्ष्याच्या जोडप्याला व्याधाने मारले तेव्हा वाल्मिकींना काव्य स्फुरले होते. ते जगातले आद्यकाव्य असे म्हणतात.
जर तुम्हाला अजुन माहिती असेल तर सांगा.<<< Proud

दुर्वासांवरुन आठवले.

शाळेत मराठीच्या पेपरात "दुर्वास" हा शब्द समास ओळखा मध्ये आला होता.
तेव्हा मी त्याचा अर्थ "ज्याला घाण (दु:) वास येतो तो" असा लावला होता. Happy
अर्थात उत्तर चूक होते. खरा अर्थ नंतर कळला "ज्यांच्या सोबत राहणे (वास) कठीण (त्यांच्या तापट स्वभावामुळे) असे ते"
Happy

'नअ बहूव्रीहि समास' आहे तो! त्या 'नअ' मधील 'अ' मी चुकीचा लिहिला आहे याचे मला भान आहे.

'दुर आहे वास त्याचा जो असा तो' Proud

वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.)>>>>>>>>>

हे कळले नाही. रावणाची मुलगी सीता ?

जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल.>>>>>>>>>

जय कहा है भाई तू ? Happy

शाप म्हणजे काय ते प्रथम पाहू

पाश्चात्य आध्यात्मिक भाषेत त्यास CUMMULATIVE NEGATIVE PROGRAMMING असे म्हटले जाते .मेंदू च्या सुप्त जाणिवेच्या स्तरावर शाप कार्य करतो

अंतर्मन आणि त्याच्या विविध स्तरांचे /शक्तींचे अध्ययन करणार्‍या संशोधकांना असे आढळून आले की जशा hypnotism मध्ये अंतर्मनास सूचना दिल्या जावून अनेक विकार / वाईट सवयी दूर केल्या जातात , त्याच्या बरोबर उलट शाप कार्य करतो .म्हणजे काही वाट चुकलेले साधू आणि भोंदू लबाड वामाचारी तांत्रिक हे स्वता:कडील दुष्टात्मे आणि सिदधींच्या सहाय्याने भक्ष्याच्या /विरोधकाच्या मेंदूचा ताबा घेवून मारण /उच्चाटन / वशीकरण यासारखे तंत्रप्रयोग करतात. त्यालाच शाप असे गोंडस नाव दिले की झाले .

पूर्वीच्या काळी एखादा गुन्हा घडल्यास असे शाप दिले जायचे ,पण हल्ली केवळ वैयक्तिक हेवेदावे आणि स्वार्थ/स्पर्धा यासाठी असे प्रयोग केले जातात. आणि अशा तंत्र-प्रयोगांची फी देखील काही लाखाच्या घरात असते. दुर्दैवाने अनेक शाप-पीडित निष्पाप व निरागस व्यक्तींचे नुकसान अशा प्रकारे होत असते. हे थांबवण्यासाठी धार्मिक /आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरावरून जागृती होणे आवश्यक आहे. अशा भ्रष्ट लोकांचे खरे स्वरूप उघडकीस आणून त्यांचे तांत्रिकगिरीचे दुकान बंद पाडावयास हवे . आणि अशा लोकांना कडक शिक्षा व्हावयास हवी . त्या दृष्टीने महाराष्ट्र शासन व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आणलेले ''जादूटोणा विरोधी बिल '' अतिशय परिणामकारक व उपयुक्त आहे .मात्र त्या कायद्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. अन्यथा अंधश्रद्धे सोबतच खर्‍या श्रद्धेलाही धक्का बसण्याचा धोका आहे ...........................................

विजय देशमुख जी सीता ही रावणाची मुलगी होती असे काही पुराण ग्रंथात म्हटले आहे . काही कारणास्तव सीतेच्या जन्मानंतर रावणा ेने तिचा त्याग केला . एका लाकडी पेटीत तिला ठेवून टी पेटी जमिनीत पुरून टाकली , नंतर जनक राजाच्या राज्यातील शेतकर्‍यास जमीन नांगरतणा टी पेटी सापडली व सापडलेली मुलगी जनक राजाने आपल्या मुलीप्रमाणे सांभाळली ,म्हणूनच सीतेला भूमिकन्या असे म्हणतात , सीतेचा अंत देखील भूमीच्या उदरात झालेला आहे

महाराज आपले लेखन अभ्यासपूर्ण व मार्मिक असते . परंतु सध्याच्या काळात खरेच असे प्रकार अस्तीत्वात आहेत का? असल्यास कुठे ? काही डिटेल्स देवू शकाल का?

काही वाट चुकलेले साधू आणि भोंदू लबाड वामाचारी तांत्रिक हे स्वता:कडील दुष्टात्मे आणि सिदधींच्या सहाय्याने भक्ष्याच्या /विरोधकाच्या मेंदूचा ताबा घेवून मारण /उच्चाटन / वशीकरण यासारखे तंत्रप्रयोग करतात.<<<

आदरणीय स्वामीजी, ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? निरसन व्हावे अशी प्रार्थना.

चांगला विषय.
>>>> पण मग याने शाप देणार्‍याला काही त्रास नसेल का होत? <<<< होय, त्याचे पुण्य घटणे याबरोबरच, काहीवेळेस ज्याला शाप देतोय, तो गैरसमजातून देत असल्यास वा त्या व्यक्तिचे प्राक्तन/पुण्य बलिष्ठ असल्यास असा शाप उलटू शकतो. [याचे ढळढळीत उदाहरण माझेसमोर आहे, जेव्हा एका व्यक्तिने दुसर्‍या एका व्यक्तिबाबत शापसदृष वाणी उच्चारल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी मी लिम्बीला म्हणले होते या व्यक्तिने असे बोलायला नको होते, ज्या व्यक्तिकरता ज्या कारणाने ही शापवाणी उच्चारते आहे, ते कारणच खोटे/चूकीचे असल्यास हा शाप उलटा फिरू शकतो. पुढील सहा महिन्यातच, शापवाणीमधे अमके होवो तमके होवो असे उच्चारलेले, त्याच शापवाणी उच्चारलेल्या व्यक्तिला भोगायला लागले, तेव्हा लिम्बीला आधीच्या प्रसंगाची व शापवाणीबाबतच्या नि:ष्कर्षाची पुन्हा एकदा आठवण करुन दिली होती.
विनाकारण, गैरसमजातून, उठसुठ शापवाण्या उच्चारू नयेत, साधे साधे पण गैर अर्थाचे शब्दही उच्चारू नयेत जसे की जारे तडफड की, वगैरे.

>>>> त्यालाच शाप असे गोंडस नाव दिले की झाले . <<<< नाही.
या कृतिन्ना शाप असे म्हणता येत नाही, या सर्व विद्या/कृति/प्रयत्न काळ्या अघोरी विद्येमधे मोडतात व बोली भाषेत जारणमारण असेच म्हणले जाते.
शाप वा आशिर्वाद, हा देणार्‍याच्या ताकदीवर अवलम्बुन असतो, तिथे समोरील व्यक्तिच्या कोणत्याही अन्गप्रत्यन्गाचा/कमजोर दुव्याचा वापर केला जात नाही.
तुम्ही व्यक्त करताहात, त्या कृतिंमधे मात्र समोरच्या व्यक्तिच्या मनाचा थान्ग शोधुन त्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न होतो. हे जारणमारण कृत्य आहे. त्याचा अन शाप/आशिर्वादाचा काहीही संबंध नाही.

तुम्ही कुणाला शाप दिला आहे का? का?
तुम्हाला कुणी शाप दिलाय का?
कुणाच्या तरी शापाने तुमचे वेड्या राघुत रुपांतर झाले आहे का?

१. सर्वात भीषण शाप. वाल्मिकीनी व्याधाला दिला. पक्ष्याला मारल्याबद्दल. >> क्रौंच पक्षाला मारलेले पाहून, बाल्मिकिंना रामायण सुचले.. त्यांनी त्या व्याधाला शाप दिला होता का नाही ते आठवत नाही....पण पांडूने किंदम ऋषींना मारल्यामुळे त्यांनी त्याला शाप दिलेला.
१२. जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल. >> हा शाप कुणीतरी ऋषींनी दिलेला.. जय विजय हे विष्णूचे पहारेकरी होते. त्यांनी त्या ऋषींची चेष्टा केली का त्यांना आत जाउन दिले नाही. म्हणून त्यांना शाप मिळाला की ते राक्षस होतिल. नंतर उ:शाप पण दिला की हे फक्त ३ जन्म करावे लागेल.
१४. अश्वत्थाम्याला कृष्णाचा / द्रौपदीचा शाप . ( डिटेल्स ?) >> द्रोणाचार्य जेव्हा अर्जुनाला ब्रम्हास्त्र शिकवत होते, तेव्हा अश्वत्थाम्याने ते चोरुन शिकण्याचा प्रयत्न केला. पण दुर्भाग्याने त्याला फक्त ब्रम्हास्त्र कसे सोडायचे ते शिकता आले, गरज पडल्यास परत कसे बोलवायचे ते त्याला ठाऊक नव्ह्ते. असे असुनदेखिल त्याने रागाच्या भरात ब्रम्हास्त्राचा अर्जुनावर प्रयोग केला.. कृष्णाने मधे पडुन ते उत्तरेच्या ( अभिमन्यूची बायको ) गर्भावर सोडले. व अश्वत्थाम्याला शाप दिला कि तो जखम घेउन चिरंजीव होइल..
असे पण वाचले आहे की अश्वत्थाम्याने पांडवांची मुले झोपलेली असताना त्यांना मारले, म्हणून द्रौपदिने त्याला शाप दिला..
१५. कुणला तरी शाप . तू साप चाउन मरशील. मग बोराच्या बीतून अळी येऊन त्याचा साप होतो. >> परिक्षीत राजाने एकदा शिकारीहून येत असताना, एका ऋषींची ( नाव आठवत नाही) टिंगल करुन त्यांच्या गळ्यात मेलेला साप अडकवला.. थोड्या वेळाने जेव्हा त्या ऋषींचा मुलगा परत आला तेव्हा त्याने शाप दिला, कि ज्याने अस केल आहे त्याचा हाच साप चावुन मृत्यु होइल. त्या सापाचा जिवंत होउन तक्षक नावाचा नाग झाला. परिक्षिताला जेव्हा हे कळले , तेव्हा त्याने सगळया सापांना मारुन टाकले. व एका खांबावर बांधलेल्या महालात राहु लागला. तेथे कुणीतरी आणून दिलेल्या फळातून अळी बाहेर आली, तिचा मोठा होउन तक्षक झाला आणि तो राजाला चावला..
१६. अंबेचा भीष्माला शाप. अंबेला शिखंडीचा जन्म मिळाला त्यातही आणखी कुठला तरी एक शाप आहे. >> भीष्माने त्याचा सावत्र भाऊ विचित्रवीर्य याच्यासाठी काशिराजाच्या मुली अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचे त्यांच्य स्वयंवरातुन अपहरण केले. त्यातल्या अंबा हिचे कोणत्यातरी राजावर प्रेम होते , म्हणुन भीष्माने तिला त्या राजाकडे पाठवले. पण त्या राजाने, तिला भीष्माने पळवले, म्हणून तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तिने परत येउन भीष्माला लग्न करण्याची गळ घातलि, तेव्हा भीष्माने ब्रम्हचारी आहे म्हणून तिला नकार दिला.. तेव्हा तिने त्याला शाप दिला की त्याच मृत्यु एका स्रीमुळे होइल. त्यानंतर तिने आगीत उडी टाकून जीव दिला. तिचाच पुढचा जन्म म्हणजे शिंख़डी, ज्याचा मागे उभारुन अर्जुनाने त्याला मारले.

१२. जय विजय याना कुणा अप्सरेचा शाप की तुम्ही प्रत्येक जन्मात राक्षस व्हाल. >> हा शाप कुणीतरी ऋषींनी दिलेला.. जय विजय हे विष्णूचे पहारेकरी होते. त्यांनी त्या ऋषींची चेष्टा केली का त्यांना आत जाउन दिले नाही. म्हणून त्यांना शाप मिळाला की ते राक्षस होतिल. नंतर उ:शाप पण दिला की हे फक्त ३ जन्म करावे लागेल.

अरेरे... मी उगाचच 'जय'ला शोधत होतो...:)

- विजय

परिक्षिताला जेव्हा हे कळले , तेव्हा त्याने सगळया सापांना मारुन टाकले.
>>
त्याच्या मुलाने जनमेजयाने परिक्षिताच्या मृत्यूचा सुड म्हणून सर्पसत्र केले ज्यात अनेक सापांच्या यज्ञात आहुती दिल्या.

वाल्मिकीना जो श्लोक स्फुरला, तो शापच आहे. हे व्याधा तू एका कामरत पक्ष्याला मारलेस. तुला कधीही मोक्ष मिळणार नाही. हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तो शापच आहे.

शाप दिल्यावर देणार्‍याचे पुण्यबळ कमी होते का?

जेव्हा गांधारीने कृष्णाला यादवकुळाचा विनाश होईल असा शाप दिला, तेव्हा गांधारीला कृष्ण म्हणाला की "यादवकुळाचा विनाश तर अटळच आहे. त्याची योजना मला करावीच लागणार होती. तु उगाच या होणार्‍या गोष्टीबद्दल शाप देऊन आपले पुण्यबळ क्षीण केलेस". हे ऐकून गांधारी हळहळली.

विजय देशमुख जी सीता ही रावणाची मुलगी होती असे काही पुराण ग्रंथात म्हटले आहे . काही कारणास्तव सीतेच्या जन्मानंतर रावणा ेने तिचा त्याग केला

रावणाने वेदवती नावाच्या स्त्रीचा विनयभंग केला. तिने शाप दिला की तुला मुलगी होईल आणि ती तुझा नाश करे. रावण -मंदोदरीला मुलगी झाली. तेंव्हा रावणाला शाप आठवला. मग त्याने ती मुलगी पेटीत घालून एका शेतात टाकली. ती जनक राजाला मिळाली.

बर्‍याच जाणकारांनी मी दिलेल्या माहितीत करेशन्स केलेली आहेत. धन्यवाद.

अशाच प्रतिसादांची अपेक्षा आहे.

इतर धर्मात अशा शापकथा आढळतात का? मग इतर धर्म हे अधिक सहिष्णू / क्षमाशील आहेत, असे मानायचे का?

शाप वा आशिर्वाद, हा देणार्‍याच्या ताकदीवर अवलम्बुन असतो, तिथे समोरील व्यक्तिच्या कोणत्याही अन्गप्रत्यन्गाचा/कमजोर दुव्याचा वापर केला जात नाही.

लिंबू भाऊ, हीच माझी शंका आहे.

कर्मविपाक म्हणतो की माझे फळ माझ्या कर्मानुसार मला मिळाले. मग माझे कर्म चुकीचेच असेल तर समोरचा मनुष्य मला शाप देवो किंवा माफ करो, मला फळ भोगावेच लागणार ना? मग शाप देणार्‍याने शाप द्यायच्या फंदात पडावेच कशाला? मग हिंदु धर्मातील लोक ऊठ सूठ शाप का देतात?

<<<<१३. ब्रह्मदेवाला शंकराचा शाप. तुझी कुणी पूजा करणार नाही. ( कारण काय?)>>>

त्या "देवो के देव महादेव" मध्ये एक सीन पाहीला होता कि सगळ्यात आधी शंकराची उत्पत्ती झाली. ते त्यांनी खुप कालावधी पर्यंत तप केले त्या कालावधीत विष्णु आणि ब्रम्हदेवाची उत्पत्ती झाली. ब-याच कालावधी नंतर तिघांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा विष्णु आणि ब्रम्हदेवामध्ये कोण मोठे ह्यावर वाद झाला तेव्हा शंकराने सांगितले की दोघे माझ्या पिंडीच्या दोन्ही टोकापर्यंत जाउन या. एकाने वरच्या दिशेने जा एकाने खालच्या दिशेने जा . जो कुणी शेवटच्या टोकापर्यंत पहिला पोहोचेल तो श्रेष्ठ. दोघांनी सुरुवात तर केली पण पिंडीचे दोन्ही बाजुचे शेवटचे टोक कुणालाही सापडेना. ब्रम्हदेवाने अर्ध्यापर्यंत जाउन खोटं सांगितलं पण कि मी शेवटच्या टोकापर्यंत जाउन आलो. पण विष्णुने खरे सांगितले की आपण अनंत आहात आपल्याला शेवट नाहीये आणि मी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचु शकलो नाही आणि म्हणुन शंकराने ब्रह्मदेवाला "तुझी कुणी पूजा करणार नाही" असा शाप दिला.

हे व्याधा तू एका कामरत पक्ष्याला मारलेस. तुला कधीही मोक्ष मिळणार नाही. > हे बहुतेक - तुला कधीही `प्रतिष्ठा' मिळणार नाही - असे आहे.

तुला मोक्ष मिळणार नाही, तुला प्रतिष्ठा मिळणार नाही, तुला अन्न मिळणार नाही..... काहीही बोलले तरी तो शापच होईल ना?

Pages