ताई, बाई, काका(जी)

Submitted by विजय देशमुख on 30 July, 2013 - 22:50

बहुतेक सर्व भारतीय गटांवर (याहू - गूगल ग्रुप, फेसबुक इत्यादी), कोणत्याही स्त्रीला ताई, बाई, दिदी, जी वगैरे विशेषण लावले जाते, जे (बहुदा) स्त्रीला आवडत नाही. (आंटी मत कहो ना.. प्रकार)

तसंच थोडासा वयाने मोठा (म्हणजे नेमकं किती, हे माहिती नाही) पुरुष असला की त्याला जी किंवा काका (मामा) म्हटल्या जाते. ज्याची चीड येत असली तरी व्यक्त केल्या जात नाही. Happy (किंवा करता येत नाही).

एका इंग्रजी स्पिकिंगच्या गटावर मी एकाला "सर" म्हणून प्रतिसाद देताच तडक त्याने उत्तर पाठवले, " मी ५५ वर्षाचा तरुण आहे. मला रँड म्हटलेलंच आवडेल, किंबहुना रँडच म्हण.... "

एकाने मला ऊ. प्र. मध्ये असताना "प्रोफेसर विजयसाहब देशमुखजी सर" असं नाव लिहून पत्रिका पाठवली होती. याला अतीविनय म्हणावं की अजून काही ?

अश्या लोकांना काय सांगावं कळतच नाही. मला तरी जी वगैरे म्हटलेलं अजिबात आवडत नाही आणि बरेचदा मी सगळ्यांना अरे-कारेच करतो. आणि मजेची गोष्ट अशी की उत्तर भारतीय मित्रांना ते आवडतं. अर्थात उत्तर भारतीय लोकं अगदी लहान मुलांनादेखील 'आप' म्हणतात, ती त्यांची पद्धत मानली तरी मराठी लोकांनी ती आचरणात आणू नये आणि आपण आपल्या पद्धतीने बोलावं. 'जी' म्हणुन आपण उगाच जी जी (हांजी हांजी या अर्थाने) करतो की काय असं वाटते.

किमान ऑनलाईन चर्चेततरी उगाच जी वगैरे लाऊ नये असं मला वाटतं. मागील काही लेखावरील प्रतिसादात मी तसं नमुद केलच आहे.

(पुर्वी आंतजालावर इतरत्र प्रसिद्ध)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताई, बाई, दिदी, जी वगैरे विशेषण लावले जाते, जे (बहुदा) स्त्रीला आवडत नाही. (आंटी मत कहो ना.. प्रकार)>>>>>>>>>.. ताई,दिदी ठिक आहे ....बाई आणि आंटी इलै.......