नोकरी
या भागात १० प्रश्न समाविष्ट करण्यात आले होते. त्यातला कुठलाही प्रश्न अनिवार्य नव्हता. सध्याचा पदभार, नोकरी/ करियरविषयक मतं, Work- Life Balance, पदोन्नती, नोकरी सोडण्याची कारणे, Glass Ceiling (कामाच्या ठिकाणी लिंगभेदाचा अनुभव), नोकरी करणार्या आणि न करणार्या स्रियांबाबत मैत्रिणींचे विचार याभोवती या सदरातील प्रश्नांचा रोख ठेवला होता.
हे वाचण्यास सुरूवात करण्यापूर्वी प्राथमिक माहिती हा धागा पूर्ण वाचावा.
कृपया या भागातील टीपा काळजीपूर्वक वाचाव्या.
-
सध्याच्या पदभाराचे नाव, विभागाचे नाव
कुटुंब
या सदरातील शेवटचा प्रश्न सोडता सर्व प्रश्न अनिवार्य होते. कुटुंबातील घरकामाचे लिंगाधारित विभाजन, परंपरेनुसार घरातील जबाबदार्या, दिवसाकाठी स्वयंपाकघरात देण्यात येणारा वेळ आणि तीन पिढ्यातील फरक याभोवती या विभागातील प्रश्न गुंफले होते.
हे वाचण्यास सुरूवात करण्यापूर्वी प्राथमिक माहिती हा धागा पूर्ण वाचावा.
विवाह व लग्नसंस्था
'भारतीय स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे लग्न' हे परंपरागत गृहितक तपासून पहाण्याच्या दृष्टीने या सदरातील सर्व प्रश्न योजले होते. खरंतर या सदरातील केवळ ३ प्रश्न अनिवार्य ठेवले होते तरीही बहुतांशी विवाहित मैत्रिणी असल्याकारणाने की काय. यातील प्रत्येक प्रश्नाला भरभरुन प्रतिसाद आले.
- वैवाहिक स्थिती व लग्नाचे वय:
