कविता

"न" चा पाढा

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

दिवाळीला नको फटाके
होळीला नको पाणी
नवीन वर्षाला नको मदिरा
आणि ईदीला नको बकरी

दांडियाला नको टिपर्‍या
संक्रातीला नको पतंग
द्सर्‍याला नको सोने
गणपतीला नको मुर्ती
आणि महाशिवरात्रीला नको दुध

पुढे म्हणाल...
.. हनीमुनला नको प्रणय!!!!!

छे!!!!

हा पाढा नन्ना चा नाही
उत्सव साजरे करायला
मना इथे नाही...
पण जपलेल्या प्रतिकांवर
श्रद्धा उरली नाही!!!!

बी

प्रकार: 

प्रहर

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

शून्य शहर.. शून्य प्रहर
शून्य मनाच्या भोवती...
... काळोखाने वेढले आहे!!

एक एक तारका निखारा आहे
रात्र काळी कभिन्न वाढतच आहे
प्रत्येक उगवत्या दिवसाचा शेवट
उध्वस्त होणार आहे!!!!

कशासाठी हे चालले आहे?
कोण मागे उरले आहे?
वर्तमानाला सन्मुख
अख्खा भुतकाळ झाला आहे!!!

बी

विषय: 
प्रकार: 

गाण्याचे शब्द

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

या ओळी कुठल्या गाण्यात आहेत कुणाला माहीत आहे का? पूर्ण गाणं मिळालं तर फारच उत्तम.
धन्यवाद.

अदबीने करते पुढती हात मी विड्याचा
पान रामटेकी आहे कात केवड्याचा

प्रकार: 
शब्दखुणा: 

कलेवर

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

रोज घेऊन फिरावं
आपलंच कलेवर, आपल्याच खांद्यावर..
नियतीच्या विस्तिर्ण फांद्या, गळफास म्हणूनही येतात कामी कुणाच्या..
आपण मात्र तिरडी बांधावी-
त्या फांद्यांमध्ये कर्माचा दोर घालून आवळत रहावं..
रोज नव्या दमानं कलेवराला काजळ-तीट करत रहावं..
स्वतःची माती होईपर्यंत............?

- चिन्नु

प्रकार: 
शब्दखुणा: 

पूर्वज

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

पाचशे वर्ष जुन्या
प्राचीन वटवृक्षाप्रमाणे असतात
आपले पुर्वज
आपले आईवडील

आपल्या नसानसात
रुजलेली असतात त्यांची पाळंमुळं
आणि लाल रक्ताच्या
पांढर्‍या आणि तांबड्या पेशीतून
वाहत असतो
त्यांनीच दिलेला प्राणवायू

ते नसूनही आपल्याच आजूबाजुला असतात
ते असतात आपल्या आत्मविश्वासात
ते असतात आपल्या तत्त्वात आणि व्यक्तिमत्त्वात
ते असतात आपल्या दैनदिन आचारविचारात

त्यांना रोज पाहता .. अनुभवता येत
आपल्या डोळयांच्या रंगात
त्वचेच्या स्पर्शात
हसण्याच्या खळखळाळात
केसांच्या सुगंधात
स्पंदणार्‍या हृदयात
आपल्या प्रत्येक सवयीत
हालचालीत तेच तर असतात!!!!!

प्रकार: 

देणे

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

सुकलेले गवत गोळा करुन
सुंदर सुंदर घरटी बांधायला
कोण बर शिकवत असेल
चिमन्या पाखरांना?

पंखात बळ येताच
आईच्या कुशीतून
बाहेर पडून
आपल जग शोधायला
कोण बर शिकवत असेल
चिमण्या पाखरांना

निळ्याभोर विस्तिर्ण आकाशात
जागेचा अडचण नसताना
शिस्तित विहार करायला
कोण बर शिकवत असेल
चिमण्या पाखरांना?

त्या त्या जन्मात
ती ती शिकवण
आपसूक मिळालेली असावी?
रक्तातच उतरलेली असावी?
वंशातून आलेली असावी?
जगायला माफक तेवढी
निसर्गद्त्त बहाल केली असावी!!!!

बी

प्रकार: 

स्वैपाकघरातील फुले

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

आठवते तुला...गुलमोहराच्या पाकळ्यांची चव
चिंचेचा फुलांचा सांडलेला बहर
हादग्याच्या फुलांवर तुटुन पडलेले रावे
काशीकोहळ्याच्या एखाद्या हळदपिवळ्या फुलाला धरलेले फळ
अंबाडीच्या फुलापासून बनवलेल्या शरबताचा गुलाबी रंग
तव्यावर अरतपरत केलेले करडे दगडफुल
केळीच्या पानावर वाढलेली केळफुलांची भाजी
कोंथींबीरीच्या फुलांना आलेले हिरवे ओले धणे
हिवाळ्यात वालाच्या वेलीवरील जांभळ्या फुलांचे पांघरुन
गगनजाईच्या फुलांच्या देठामधील चाखलेले मध
महादेवाच्या पिंडीवर गळून पडलेले तुळशीच्या मंजिरीतील निळेसावळे कण
तळहातावर घेऊन जिभेने चाखलेला गुलकंद
शेवग्याच्या फुलांचे केलेले थालिपीठ

प्रकार: 

किंमत

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

सुरुच असतो शोध माझा तुमचा
जागेपणी आणि निद्रिस्त असताना सुद्धा
की काहीतरी सापडेल अवचित
आणि बदलून जाईल आपले जगणे

पण असे होत नाही
जिथे स्वःतला उलगडून सांगणेच
अवघड झाले आहे
तिथे नवे काही गावण्याची
शक्यता अगदीच सुमार आहे

कुठल्या तरी एका क्षणी
कदाचित केस आणि केस पिकलेल्या
जख्ख म्हातारपणी
हे कळून चुकत की
ह्यापेक्षा खर्डेघाशी परवडली असती
उभ्या आयुष्यात खूप काही गमावल
नव काही मिळाल त्याची किंमत
मी किती मोजली.. मला माझेच ठावूक.

- बी

प्रकार: 

पापण्यांतला पाऊस

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

पुर्वी आपण जेव्हा जेव्हा भेटायचो,
तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा.

पाऊस मग नेहमी सोबत असायचा
कधी सर..
तर कधी झर झर...

पण यंदा...
आशेचे ढग दाटत होते,
पांगत होते,
मन ओथंबून गेलं.

तू येशील... भेटशील...

शेवटी सगळा पाऊस
पापण्यांत शिल्लक राहीला...
आणि यंदाचा पावसाळा
कोरडाच गेला.

काल पाऊस आला
नि मी दार उघडलं...
पुर्वी आपण भेटलो की पाऊस यायचा,
आता निदान पाऊस आलाय म्हणून
तरी भेटूया...

प्रकार: 
शब्दखुणा: 

पाखरवेळा

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

चिंब फुलपाखरी लेवूनी रंग
पाकळी पाकळी होतसे गंध
सोनसकाळी किरणांची पल्लखी
डोलत फिरते झुळूकी मंद

एक डहाळी, पाखरांची शाळा
दवं-भिजल्या माळा पानोपानी
इंद्रधनु अल्लद चोचीत धरूनी
सूर हाळीतो कुणी या रानी

धरून कमानी-माडांच्या झाळी
विसावती मेघधन श्वेतश्यामला
आद्य अनंत ते- रूप चिरंतन
कण कण होई विठू सावळा
....कण कण होई विठू सावळा!

प्रकार: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता