कविता

कण

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

रवा-साखरेच्या एक कण

ढीगभर मुंग्यानी ओढत ओढत
वारुळात नेला
पुढे काळोखात त्याचे काय झाले माहिती नाही:

बहुतेक..सगळ्यांनी मिळून संपवला असेल
कारण परत दुसर्‍या दिवशी
आणखी एक शिस्तबद्द रांग
आणखी एका कणाला वाहून नेताना मी पाहिली.

इथे भर उजेडात माणसे स्वार्थी, धुर्त, लबाड होतात
इतरांच्या तोंडचे पळवून नेतात
केसांनी एकमेकांचे गळे कापतात
निरपराध लोकांना फसवतात
स्वत:च चंगळ करतात,
स्वत:च दंगल करतात,
स्वतःचे मंगल करतात!

इतके स्वार्थी की..
हिसकवून घेतलेल्यातला एक कणही मुंग्याना मिळणार नाही!

- बी

प्रकार: 

तुझ्यावरची कविता

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

तुझी कविता .. तुझ्यासारखीच
अगदी आठवणीनं जपून ठेवलेली.
पण कितीही शोधली
आत - बाहेर,
तरी नाहीच हाती लागत शेवटी

तुझ्यावरची कविता ...
ती ही अगदी तुझ्यासारखीच !
अखंड शोध; आत - बाहेर
नुसतेच भास; आत - बाहेर
नाहीच सापडत शब्दांत शेवटी ..

शब्दांचे मात्र बघवत नाहीत हाल;
ते अगदी माझ्या वळणावर.
आत - बाहेर घुटमळतात
घुसमटतात;
कधी हुरहुरत
कधी हुळहुळत ...

प्रकार: 

उणिव

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

कधी मी इथे असतो
तर तिथलं जग
इथली उणिव असते

तर तिथे असताना
इथल जग
तिथली उणिव असते

ही उणिव
कधी .. कधीच भरुन
निघणार नाही
इथली कमी .. तिथली कमी
जाणवत राहणारच!

पण कुठवर? आयुष्यभर?
हे नको म्हणून
एक वेगळच जग
माझ्या आत..माझ्या नकळत
उदयास आल!
फक्त ते कुणाला दिसत नाही
पण मला ते जाणवत
मी इथे.. तिथे वावरत असताना
आतल जग माझ्यासोबत
भटकत असत!!!
इथल्या.. तिथल्या दोन्ही जगातील
लोकांना मग माझ्यासहीत
माझ्या ह्या जगाचा थांग लागत नाही!!

प्रकार: 

नकळत..

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

बोलता बोलता अगदी नकळत
ती त्याच्या जवळ जाते
त्याच्या शब्दात गुरफटते
थोड्याशा स्पर्शानी मोहरुन जाते
ओठावर ओठ टेकवते
गालावरुन बोट फिरवते
त्याच्या छातीत रुतुन बसते
कानाशी कुजबुजते.. केसांमधे लपवते
तिच्या डोळ्यातील चांदणी हसते
...प्रेमात पडल्यावर
ती किती सहज वाटते!!!

- बी

प्रकार: 

कला

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

...ज्याने आपल्याला आयुष्यभर
स्वप्नं दिली,
रंग दिले,
गोड गाणी दिली,
नव्या वाटा दाखवल्या,
सुखदु:ख साजरे करायला शिकवले,
जीवन जगण्याची कला शिकवली!!!!!!!
.....त्याच्यासाठी... रडायचं कशाला?

त्याच्या आठवणींची मैफल सजवूया.
--बी
============================

टिप: ह्यावेळी आमच्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमात 'कला' हा विषय आहे. तेंव्हा ही एक कविता बळजबरीने केली. ही रचना आहे. कविता अशी नाही.

प्रकार: 

निष्पाप निरपराध

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

सुनामी येतो आणि
निष्पाप निरपराध लोकांना
आपल्या लाटेसह घेऊन जातो

भुकंप येतो आणि
निष्पाप निरपराध लोकांच्या आयुष्याची
उलथापालथ करतो

बॉम्बस्फोट होतो आणि
निष्पाप निरपराध लोकांना
आपल्या उर्जेने छिन्न-विछिन्न करतो

कुठेतरी दंगल उसळते
निष्पाप निरपराध लोकांनाचं
त्याची सर्वाधिक झळ पोहचते

नदीला पुर येतो
आणि काठावरच्या घरांचा
संसारही आपल्यासोबत वाहून नेतो!

.. निष्पाप असणे जणू पाप झाले आहे..

बी

प्रकार: 

अपराध

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

अंगणात उभे राहून
रात्रीचं आकाश नजरेत भरुन घेताना
लक्षातच येत नाही
की तळपायी चाफ्याची फुल आली आहेत
नकळत ती चेंदामेंदा होत आहेत!!!

रस्त्यावर फाटकी चादर अंथरुन
शेपू चाकवत मेथी विकणार्‍या बाईकडून
दहा रुपये कमी करुन भाज्या घेताना
काहीच कसे जाणवत नाही
की तिच्या पोराच्या शाळेची फी
हजार रुपये आहे आणि
तिच्या अंगावरचे नऊवार जीर्णशीर्ण झाले आहे!

लहान मुलांशी उंच आवाजात बोलताना
जिभेवरुन सरकन वाहून गेलेले शब्द
डोळ्यातून उतरलेला आगीचा डोंब
हळुहळु त्याच्याही नसात भिनतो
कुणी दिली ही शिकवण हे उमगलेच नाही!!!!

वर्तमान पत्रात छापून येतील
इतके मोठे नसले तरी

विषय: 
प्रकार: 

वेळोवेळी

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

वेळोवेळी मला
नव्याने समजत जातो ... आपण

तू,
तुझ्या वागण्या बोलण्यातून
शब्द - स्पर्शातून
असण्या - नसण्यातून

आणि मी,
त्यावरच्या माझ्या प्रतिक्रियांमधून

विषय: 
प्रकार: 

मे महिन्याच्या कविता

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

ह्यावेळी आम्हाला विषय आहे: कुणी काही म्हणा आणि दुसरा विषय अधिकार. ह्यावर केलेल्या कविता:

कुणी काही म्हणा
सुरवात करायची आहे.
नवीन काहीतरी करायचे
जिथे आहे तेथून सुरवात करायची आहे.
पण भिती वाटते
मग भितीपासूनच सुरु करा!
संकोच वाटतो
मग संकोच सोबत घेऊन सुरवात करा.
हात थरथर कापतात
मग शेकहॅन्ड पासून सुरवात करा
आवाज अडखळतो
मग अडखळणार्‍या आवाजापासून सुरवात करा
नैराश्य वाटते.. दु:ख जाणवते
मग ह्या दोन्हीसोबत सुरुवात करा.
सुरवात करा.. कुणी काही म्हणा
जिथे आहे तेथून सुरवात करा.

- बी

प्रकार: 

तगमग

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

खूप दिवसांपासून सुरु असलेली तगमग

शरिरातून निघून गेलेला जीव,
सुकलेल्या गवतासारखी
त्वचेची लागलेली वाट,
मावळलेला उत्साह,
हरवलेला ओलावा,
आपल्या परिघापासून
वाढतच चाललेला दुरावा
वाटत जणू सगळ सगळ संपून गेल!!!

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - कविता