कविता

मागे वळून पाहते तेव्हा

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

मागे वळून पाहते तेव्हा
दिसतो लांबलचक एकाकी रस्ता
समोर पसरलेल्या रस्त्यासारखाच

मागे वळून पाहते तेव्हा
मोजून घेते मनातले घाव पुन्हा
खपल्या निघता निघत नाहीत

मागे वळून पाहते तेव्हा
हातून सुटलेले हात दिसतात
अन् सलतो न दिसणारा काळ

मागे वळून पाहते तेव्हा
अंधारभरल्या सावल्या छळतात
पुढचंही दिसत नसतं नेमकं

मागे वळून पाहते तेव्हा
माझीच राख मला खिजवत राहते...
मागे वळायला 'तू' राहीली आहेसच कुठे?

विषय: 
प्रकार: 

झाकोळ

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

कुंदकुंदशी दुपार
वार्‍याचा चेहरा पडलेला
निसरड्या वाटा
फुलांच्या रसानी टचटचलेल्या..

...धीर धर...

लख्ख लख्ख ऊन पडेल
गवताचे पोपटी पात वारा कापेल
वाटेवर गारशी सावली खेळेल
निळ्या निळ्या आकाशासारख
मनावरच मळभ दूर पळेल!

.. हा तर क्षणभराचा झाकोळ!

- बी

प्रकार: 

लहर

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

लहर
थोड्या उमललेल्या, थोड्या कोमेजलेल्या,
वास्तव्याच्या धगीने कोळपून गेलेल्या,
थोड्या ओल्या.. थोड्या ठिक्क-कोरड्या,
हरवलेल्या, विसरलेल्या, गमावलेल्या
वार्‍यावर सोडून दिलेल्या, अर्धवट पाहिलेल्या,
'इदम न मम' म्हणत अखेरीस टाकून दिलेल्या
सर्व सर्व स्वप्नांना..पुन्हा एकदा जाग आली!

फिरुन परत एकदा वसंत यावा
फांदी फांदी मोहरावी, फुल फुल दरवळावे
पान पान झळकावे, पक्षी पक्षी झाड व्हावे
तशी परत एकदा जगण्याची एक लहर आली...

...पुन्हा एकदा स्वप्नांना जाग आली

बी

प्रकार: 

रात्र पाऊस पाऊस

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

अश्या कोंदटल्या राती
टपकत्या मेघांसवे
मन मोकळे करावे
घ्यावी वाटून आसवे

ओला बधीर गारवा
घ्यावा वेढून जरासा
गोठाव्यात संवेदना
थोडा मिळावा दिलासा

झिरपत्या पाण्यासंगे
मातीमध्ये मिसळावे
सल खोल उरातले
कधी कुणा ना कळावे

(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://roopavali.blogspot.com)

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

आवर्तन

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

आवर्तन उठते पुन्हा एक परिचितसे
मी तिथेच येते फिरून घेऊन वळसे

इच्छांच्या डोही तरंग अस्फुट उठले
मी मिठीत आसक्तीच्या डोळे मिटले

एका चक्रातून दुजात जाण्यासाठी
धावते सतत वेड्या स्वप्नांच्या पाठी

कर्दमात गेला पाय रूते खोलात
तरी या वाटेची ओढ कशी अज्ञात!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मूठ

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

तुला काय?
तू पाठ फिरवून जाशीलही..
मग मी मला कसं आणि कुठंवर गोळा करू?
तुटल्या जीवाचे तार तार झाले..
भिनलेत सूर, कसे वजा करू?
सख्य नुरले वेड्या आसवांशी..
कसे आरश्याशी दगा करू?
खोल मूठ एकदाच ह्या जीवाची
कुठंवर श्वासांची निगा करू?
अस्तित्वाचा झगडा जिण्याशी
बोल मना तुला काय सजा करू?

प्रकार: 

जुन घर

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

भल्या मोठ्या जुन्या घरात आपण एकटच असाव
आणि रिकाम्या वेळी आठवणींनी सोबतीला याव..

ह्या इथे स्वैपाकघरात आई जेवन बनवायची
त्या तिथे मधल्या घरात बाबा आराम करायचे
परसात आजी नेहमी बागेत रमलेली असायची
कढीपत्त्याच्या वासाने लगेच भुक लागायची!

गॅलरीत मुलांचा अभ्यास कमी दंगाच जास्त असायचा
विविध भारतीवरचा कार्यक्रम सर्वात हीट असायचा!
तीन वाजता दुपारी सर्वांसाठी चहा व्हायचा
पारलेजीचा पुडा कधीतरीच घरात यायचा!

अंगणात जाई जुईची कमान फुललेली असायची
ताईने काढलेल्या रांगोळीवर मांजर येऊन बसायची
कडूनिंबाच्या झाडावर संध्याकाळी पोपट जमायचे
निबर निंबोळ्या खेळायला खाली पाडून जायचे!

प्रकार: 

चहा

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

सकाळच्या पहिल्या चहासारखं तुझं हसू
मनाला ताजवा देणारं

तू अवतीभोवती असण्याचा दरवळ
चहातल्या वेलदोड्यासारखाच निव्वळ

तुझी हवीहवीशी ऊब
घोटाघोटाने वाढणारी

पण या चहात मात्र... तुझ्या इतका गोडवा नाही!

अजूनही आहे एक फरक...

तुझ्यातला कैफ, तुझ्यातली नशा
या चहात नाही!!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

ट्रेन

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

ट्रेनच्या आत माणसामाणसांमधे शक्य तेवढ अंतर राखाव
ट्रेनच्या काचेतून दुरवर पसरलेल जग डोळ्यात साठवून घ्याव!

ट्रेनच्या आत ओझरत्या स्पर्शालाही चटकन सॉरी म्हणाव
ट्रेनच्या काचेतून बाहेर कोसळणार्‍या पावसात चिंब भिजून याव!

ट्रेनच्या आत 'कथा-कादंबरीच्या' प्रवासाने हृदय जड व्हाव
ट्रेनच्या काचेतून दिसणारी पडझड पाहून आपल्यापुरत सावरुन जाव

ट्रेनच्या आत मधाळशा दाक्षिणात्य डोळ्यात एकटक बघतच रहाव
ट्रेनच्या काचेतून 'नाहीच कुणी अपुले रे.. ' म्हणत डिसग्रेसफुल वाटाव!

प्रकार: 

गौरीच्या कवितेचा अनुवाद

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

Gauri.jpg

वसुंधरा

मीही एक वसुंधरा
आर्त आणि मेघश्यामल
माझ्या मिलनाला येतो
पहिला पाऊस...
मंजुळ.. अव्याहत
...थबथबणारा... कोसळणारा

सुगंध त्याचा सामावून जातो
माझ्या रक्तात..
गडद ठसा उमटतो
खोलवर माझ्या मनात...
....
मोहरलेल्या माझ्या अंगांगावर
पिवळ्या फुलांचे रान उठते
त्याच्या अगदी...पहिल्याच स्पर्शाने!!!!
अनुवाद (यशवंत काकड)

मुळ कविता अशी आहे:

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - कविता