लावणी

अध्यात्मिक लावणी!

Submitted by यक्ष on 4 August, 2021 - 06:12

तु-नळिवर 'दे रे कान्हा' हे गाणे शोधता शोधता एका ठिकाणी 'अध्यात्मिक लावणी' असा सन्दर्भ आढळला.

थोडी-बहुत कल्पना आली पण आकलन नाही झाले......

ह्याचा अध्यात्मिक अर्थ कळू शकेल काय?

धन्यवाद!

"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

Submitted by पाषाणभेद on 19 March, 2017 - 15:42

"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही

तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

तुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्‍या MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण.

झाडावर पाखरू बसलं : लावणी

Submitted by अभय आर्वीकर on 28 August, 2016 - 13:32

झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
थवे अडवाssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||१||

कलम लावली, खतपाणी दिधलं
कुंपण करुनी जिवापाड जपलं
कुणी ना आलं, पाणी घालाया

कंदिल विझवू नका (लावणी)

Submitted by संतोष वाटपाडे on 23 September, 2015 - 02:18

एकटीच अंधारात , सोडविते अंबाड्यास
गाठ ओढली जोरात , पोथ गुंतली केसात
नका घाई उगा करु , पदरास ओढू नका
अहो थांबा राया....... कंदिल विझवू नका..

दारी पडतो पाऊस , धो धो आवाज करीत
जाऊ कापडं काढाया , कशी एकटी मोरीत
फ़टीतून येते पाणी , खिडकीला खोलू नका
अहो थांबा राया....... कंदिल विझवू नका..

आले भिजून घरात , दम छाटला उरात
थेंब छतातून काही , खाली भरली परात
तोल जाईल घाईने , पाय मधे घालू नका
अहो किती घाई........कंदिल विझवू नका..

सारी रात जळतात , काळ्या कंदिलाच्या वाती
थंडी भरते अंगात , थरथर होते राती
घाम येऊ द्या जरासा , वात खाली करु नका
अहो राया तुम्ही..... कंदिल विझवू नका..

गाण्याचे शब्द

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

या ओळी कुठल्या गाण्यात आहेत कुणाला माहीत आहे का? पूर्ण गाणं मिळालं तर फारच उत्तम.
धन्यवाद.

अदबीने करते पुढती हात मी विड्याचा
पान रामटेकी आहे कात केवड्याचा

प्रकार: 
शब्दखुणा: 

विनवणी.... (कटावाची लावणी )

Submitted by स्वामीजी on 15 August, 2014 - 23:10

विनविते तुम्हा राजसा, निवान्तच बसा, विसावा घ्यावा
शिणलात म्हणुन शिणगार करत अलवार, रातिचं ऱ्हावा ।
नि:शंक झोकला देह, कवेची ठेव, समर्पण करता
करवितो कसा हा खेळ, असुनिया वेळ जायचे म्हणता ?

प्रेमात कसा अनमान, फुकाची शान, काळजी घ्यावी
थकविता किती हा देह, चेपते पाय, जराशी प्यावी ।
उतरवा मनाचा भार, उगा बेजार एकटे बनता
बहरेल दिलाची साथ, मनाची गाठ मोकळी करता ॥

कसलीच नसे मज हाव, तुम्हावर जीव म्हणुन कळवळते
पाहता कपाळी अठी, भिरभिरी दिठी, मनाशी जळते ।
जो वाघ म्हणुन पाहिला, साजणा मला आज ना दिसला
दिलदार रांगडा वीर, मनाचा धीर आज का रुसला ?

दिवसात कितीही येत, बिदागी देत ऐकती गाणी

निसर्गकन्या : लावणी

Submitted by अभय आर्वीकर on 22 July, 2014 - 12:43

निसर्गकन्या : लावणी

चांदणं गारा, श्रावण धारा, वादळवारा प्याली
मेघांची गडगड, विजांची कडकड, ऐकून ठुमकत आली
पावसात भिजली, तरी न विझली, ज्योत मनी चेतलेली
भान हरपली आणि थिरकली, वयाची वलसावली

आली निसर्गकन्या आली, ठुमकत आली, थिरकत आली .... ॥धृ०॥

हिरवळ ल्याली, पावसात न्हाली, न्हाऊन चिंबचिंब झाली
मुरडत आली, लचकत आली, लाजून पाठमोरी झाली ...... कोरस

निसवता जोंधळा जणू, दाटली तनू, चोळीला भार
उगवती वल्लरी जशी, कांती लुसलुशी, अंग सुकुमार
वनी विहरली, दिशांत फिरली, तरूवर पिंगण घाली .... ॥१॥

'लावणी' नावातच लावण्य ! -marathi lavani

Submitted by मी मी on 31 December, 2013 - 02:38
vidya balama marathi lavani

लावणी अगदी नावातच लावण्य… नृत्य, संगीत अन अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे 'लावणी'. शब्दात सौंदर्य असत कि नृत्यासाठी शब्द लिहिले जातात कुणास ठावूक पण लावणीचं रूप मनात भरल्या वाचून राहत नाही. प्रत्येक लावणीची एक कहाणी किंवा प्रत्येक कहाणीला एक लावणी लागू करता येईल इतकी ती मार्मिक असते. लावणीत शृंगार आहे, लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे, प्रीत आहे. शृंगाराच्या भावाबरोबर,भक्ती,शांत,वीर,करुण,वत्सल,हास्य,बीभत्स,असे विविध रस ही लावणीत दिसतात. कधी जवळून अनुभवलंय का लावणीच्या शब्दांना? त्यातला अर्थ ? त्या ठुम्क्यातल्या ठासून भरलेल्या संवेदना…?

विषय: 

नाचते नार तोऱ्यात -

Submitted by विदेश on 2 May, 2013 - 11:12

नाचते नार तोऱ्यात फार नखऱ्यात माळुनी गजरा
चाळ ते पायी तालात छान डौलात खिळवती नजरा

ओठिचे हास्य मधुजाल गाल ते लाल भान हुरहुरते
होउनी दंग चोळीत तंग वेडात ध्यान भिरभिरते

हातची काकणे नाद घालुनी साद दावती मेंदी
ती अदा करतसे फिदा विसरुनी क्षुधा वाढती धुंदी

चमकती नयन सोडुनी तीर हृदयात थेट ते त्यांच्या
मेखला खास झुलवून हात अदबीन हाती ये त्यांच्या

भिंगरी गरगरा फिरत राही भरभरा सावजा पाठी
रंगता महल रंगात येतसे शीळ कुठुनशी ओठी

पापी ते पोट बोटात नोट थाटात ओढ गाठीची
थिरकतो ताल दावी कमाल ती नार नजर भेटीची

.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लावणी