कविता

गर्दी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

गर्दीपासून दुर दुर किती दुर जावे?
तिथे भेटेल गुडघाभर गवत
क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवळ
आकाशाची निळाई
अवकाशाची अथांग पोकळी
पाखरांची अगम्य भाषा
रातकिड्यांची किर्र अंगाई
दुपारची निबीड छाया
सकाळची पुर्वाई
रात्रीची जाईजुई

कदाचित जीव होऊन जाईल विरक्त
तर लाभेलही मोक्ष.
पण इथे कुणाला महती त्याची!

होऊन जावे गर्दीतल्या गर्दीत अलिप्त
परंतू शांतचित्त!

- यशवंत/बी

प्रकार: 

सुरुवात

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

कुठुन कशी होते सुरुवात
अवचित नव्या वाटा गवसतात
नकळत अनोळखी दिशा
परिचयाच्या होऊन जातात
नवीन दारे उघडतात
जुनी मिटून जातात
आठवणीखेरीज दीर्घकाळ
टिकत नाही कुठलच
सुख वा दुख!

कमी अधिक फरकाने
सुरुच असतात
घडत जाणारे बदल.

जोवर हवे असतात
स्विकारले जातात
असे हे बदल
तोवर सर्वकाही
ठिक ठिक आहे...

बी

प्रकार: 

कुठेही जाता

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कुठेही जाता
आकाश तेच आहे
तोच चन्द्र, तोच सुर्य
चांदणेही तेच आहेत
पायाखाली जमीनच आहे
पाखरांचे चेहरे अपरिचित
किलबील तशीच मंजुळ आहे
अन्न वस्त्र निवारा
जगण्याच्या गरजाही त्याच आहेत
सभोवतालच्या वर्तुळाचा परिघही
जेमतेम तेवढाच आहे
फक्त एकच की
खूप काही प्रेमाने सामावलेले
स्वकष्टाने जमवलेले
कक्षेच्या बाहेर सहज निसटून गेले आहे!

- यशवंत/बी

विषय: 
प्रकार: 

कैफ

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

चंद्र उगवण्याची वेळ झाली
चांदण झिरपण्याची वेळ झाली
संध्येच्या प्याल्यात
कैफ भरण्याची वेळ झाली!

कैफ?

प्रत्येकाचा वेगळा
जो तुझ्यात भिनेल
तुझ्या रंगात मिसळेल
तुझ्या रक्तात उष्ण होऊन वाहेल
तुझ्या डोळ्यात उतरेल
तुझ्या श्वासाश्वासात दरवळेल

..मदिरा नसेल,
कुणाचा टिनपाटी नखरा नसेल,
वैराग्याचा धुर नसेल,
व्यसनाचा स्पर्शही नसेल

विषय: 
प्रकार: 

रव

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

निरव रात्रि
पावसाचा एक थेब खिडकीतून आत येतो
आणि गझल ऐकून लागलेल्या झोपेतून
अलगद जागे करतो!

कुणाच्यातरी छपरावर पावसाचे थेंब
रप रप नाचत असतात
तरीही रात्रीची ती निरव शांतता
अभंगच असते!
नव्हे अधिकच गडद होते!

... इतकी गडद की...
आपला पायरव उमटू नये
हृदयातले हेलकावे
कुठेच पोहचू नये!

बी

प्रकार: 

कक्षा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कालपरवा लाडक्या शिरिषाच्या
झुळुका घरभर खेळत होत्या
रोजच्या रख्ख उन्हाला
गुलाबी फुलांचा सहवास होता!

सुसह्य होते माझे दिवस
कुणाची तरी सावली शिरी होती
सुंगधित होत्या माझ्या रात्री
ती मौज मी लुटली होती!

माझे घर रस्त्यावर होते
सगळे काही वाहत असताना
तेवढे हे एकच झाड
निश्चल उभे डोलत होते!

आपली कक्षा रुंदावण्यासाठी
नभाची पोकळी त्याने घेतली होती
मात्र..अरुंद रस्त्याच्या मधे येऊन
रुजत जाण्यात चुकले होते!

यशवंत/बी

विषय: 
प्रकार: 

ओढ

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

तुझ्या आठवांच्या सरी कोसळाव्या
पुन्हा मी भिजावे अधाश्यापरी
मिटावी न तृष्णा तुला भेटूनीही
तुझी ओढ ऐसी जळावी उरी

विषय: 
प्रकार: 

परिपाक

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

काहींना हव्याच असतात नव्या वाटा
बुद्धीची भूक शमवण्यासाठी...
काहींना स्विकाराव्याच लागतात जुन्या वाटा
प्राप्त परिस्थितीत तारुन जाण्यासाठी...

तशी प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट
परिपाकाकडे अटळपणे जातच असते

पण

ना धड नव्यातली.. ना धड जुन्यातली
साधी निमुळती पाऊलवाटही
वाट्याला येऊ नये
आणि अपरिहार्यपणे
कधीही न उमजणार्‍या. न संपणार्‍या
वाटेखेरीज इतर काहीच उरु नये!!!!!

सर्व सर्व शुभेच्छा अशांसाठी!

-बी

प्रकार: 

बाहेर कोसळता पाऊस

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

बाहेर कोसळता पाऊस
आणि फायरप्लेस मध्ये जळणारी मंद आग
अशी ओली उबदार रात्र...
आणि तुझी साथ!

ढगांच्या आवाजाहूनही मोठी
माझ्या मनाची वाढती धडधड
तापलेले श्वास
पेटलेले स्पर्श
चहाहून जास्त वाफाळलेले तू आणि मी

पावसाच्या थेंबांसारखे
अलवार गाण्याचे सूर
तुझे माझे शब्द व्यक्त करणारे
आपल्या लयीशी होड घेणारे...

बाहेर कोसळता पाऊस
आणि आत चिंब होणारे आपण
अशी ओली उबदार रात्र
देशील?

विषय: 
प्रकार: 

व्यसन

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

व्यसन

वय कस रंगेल असत आपल्या वेगवेगळ्या टप्प्यावर!

तेंव्हा..

जांभळं चाखण्यापेक्षा
जिभ जांभळी होण्याचाच आनंद अधिक व्हायचा

मिटक्या मारत आवळा खाण्यापेक्षा
नंतर गोड लागणार्‍या पाण्याचीच मजा घोटाघोटाने वाढायची

किल्ला उभारण्यापेक्षा
चिखल मातिने हात माखून घेण्यातच उदंड सूख मिळायचे

मेंदी रंगण्यापेक्षा
ती जागून काढलेली रात्रच अधिक रंगलेली वाटायची

मायेच्या गार सावलीत बसण्यापेक्षा
उन्हातान्हात भटकून काळवंडून घेण्याचीच भुक जास्त असायची

आणि मग येत तुमच विड्याच पान
दात.. ओठ.. जिभ
आणि चक्क बायामाणसांना रंगेल करणार!
देठासहीत असलेल
ओलसर पालवात ठेवलेल

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - कविता