कविता

एक कविता

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

ओझी नकोनकोशी व्हायला लागली की वाटत
रानात रमलेल...रानात गमलेल एक रानफुल व्हाव!
आपल्याच हलक्या भारावर डोल डोल डोलणार!!!

घुसमट नकोनकोशी व्हायला लागली की वाटत
चहुबाजुने झाकोळलेल...वीजांनी कडाडलेल मेघ व्हाव!
फुटुन वाहून गेल की मग निळशार आकाश मिळव!

सखेसोबती नकोनकोसे व्हायला लागले की वाटत
आपल्यातच रंगलेल...आतबाहेरुन दरवळ्लेल फुल व्हाव
झडून गेल मी मग मातितच त्याच निर्माल्य व्हाव!

यशवंत

प्रकार: 

वेडे नाते

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

टेबलावर निरर्थक लिहीताना नकळत
बोटं तुझं नाव गिरवायला लागतात
कामात गुंतलेले सारेच क्षण
तुझ्या विचारांत हरवायला लागतात

स्वप्नात भेटणं जुनं झालं कधीच
आता प्रत्यक्षात पण तुझा भास होतो
केसांशी खेळणारा वार्‍याचा झोका
मानेशी रूळणारा तुझा श्वास होतो

तुझी ओढ, तुझी आस, तुझा छंद मला
तुझी नसूनही तुझी होऊन जाते मी
तुझ्यामाझ्यातले निनावीच बंध
उरी तरी जपते हे वेडे नाते मी

(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

शोध

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

इतकं कशाला झाकोळायला हवं
माझ्या नसण्याने?

मला शोध ना..
इथं, तिथं,

फुललेल्या रानफुलात,
कोमेजल्या निर्माल्यात.
दवानं भिजलेल्या रानात,
अंगार ओकणार्‍या वाळवंटात.
पक्ष्यांच्या स्वैर गाण्यात,
कुठल्याश्या चिरंतन वेदनेतही.

निळ्या मुक्त आकाशात,
अन् करड्या फांदीवरल्या
हळूच डोकावणार्‍या, बंदिस्त
चार काड्यांच्या घरट्यातही.

जन्म मृत्यूच्या उत्सवात,
आणि निराकार निर्गुणात.
वार्‍याच्या सळसळीत,
हवेच्या झुळुकीत,
जीवघेण्या वादळात,

नि:शब्द, नीरव शांततेत,
न सरत्या कोलाहलात.
हास्याच्या लकेरीत,
पापणीआडच्या पाण्यात.

पहा नीट एकदा,
कदाचित सापडेनही
तुझ्या मनाच्या एखाद्या,

विषय: 
प्रकार: 

शतक

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

आज आमच्या प्रिय मंडळाच्या 'शब्दगंध' ह्या काव्य-उपक्रमाचा १०१ वा कार्यक्रम होता. 'शतक' ह्या विषय घेऊन कविता करायची होती तेंव्हा केलेली कविता....

वय वर्ष शून्य
हाताच्या दोन्ही मुठीभरुन
आयुष्य घेऊन जन्माला आलेलं
पण ना जगण्याची भ्रांत
ना आपण आहोत त्या जगाचा पत्ता
आईच्या कुशीत
शांतपणे निजलेलं

वय वर्ष दहा
खाऊन आईच्या हातचे धपाटे
आणि आजीच्या हातचे लाडू
हळू हळू मोठ होत चाललेल

वय वर्ष वीस
'हू केअर्स!!'
'नथींग ईम्पॉसिबल!'
रात्रीचा दिवस
आणि दिवसाची रात्र करत
आपल्याच तालामधे गुरफटलेल.

वय वर्ष तीस
थोडसच पण सावधान झालेल
गोड बायकोसाठी रात्र
आणि कडूजार बॉससाठी दिवस

विषय: 
प्रकार: 

नख

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

पुन्हा शोधावी का तिला ?
किती सहज उकरायची गाडलेले कबुलीजबाब
फुल्या शिवलेले डोळे
फुल्या शिवलेले ओठ
कधी हसत कधी रडत
विचारायची नुसत्या खुणांनी
'कशी दिसते ह्या नवीन टाक्यांत?'

लांबसडक बोटे, न्याहाळायची ती
कधी शापा सारखी कधी श्वापदा सारखी
बिलगायची अशी की नक्षत्र भारले आभाळ व्हायचे शरीर
कधी हिंस्रतेने करायची शिकार
धारदार, रासवटतेने झालेला छिन्नविछिन्न देह
शिवत बसायची तासंतास
तिने पाळलेली बेवारशी विरह-गाणी
पाहायचो घुटमळताना तिच्या आसपास...

पुन्हा शोधावी का तिला ?
मला भेटून ती निराश झाली तर?
मन धजत नाही, हे रिकामेपण झाकता येत नाही
तिने दिलेल्या जखमा पुन्हा पुन्हा गोंजारताना

प्रकार: 

घुसमट

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

आत्ममग्न हुंदक्यांचे
मखमली काळे कोष
कोणाचा पाय मोकळा
कोणाच्या कपाळी दोष

भावनांची सालपटे
अविश्वासाचा आसूड
रान सुकलेही नाही
पेटली उन्मादी चूड

धुमसत्या निखार्‍यांचा
गर्भ गोठलेला पार
वाटा हजार दिशांच्या
बंद एकुलते दार

जीवघेणी तटस्थता
आत धुमसे वादळ
सुखी भविष्याची आस
रिती काळाची ओंजळ

विषय: 
प्रकार: 

मारवा

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

तुटल्या नात्याचे तुकडे
मी सांग कसे सांधावे
रेशीमधाग्यांचे बंध
अन् पुन्हा कसे बांधावे

वाटेवर नुसत्या काचा
अंधार गर्द भवताली
हरवले, मी चुकले रस्ता
जरी परत वाटले यावे

नियतीचा होता घाला
की आगळीक माझी झाली
मी जवळ तुझ्या येताना
वाढवले फक्त दुरावे

मारवा जीवाला छळतो
मन उदास अन् एकाकी
मी श्वास समर्पिन माझे
एकदाच तू परतावे!

विषय: 
प्रकार: 

विकृती

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

विकृती...

तू जगण्यातली कुरुपता
शोधत जगत असतेस
हतबल करुन टाकतेस
तुझ्या सानिध्यात येणार्‍या
प्रत्येक.. प्रत्येक जीवाला!

तुझ्या पुढे हातपाय टेकतात
सगळे प्रयत्न फोल ठरतात
नरक यातनेचे दर्शन घडवतात
सुखाचे चार क्षण हिरावले जातात!

मिळू नये तुला सोबत कुणाची
तू आधाराला निराधार करणारी!

लाभू नये तुला घरदार
तू अंगणात रक्ताचा सडा शिंपणारी!

येऊ नये तुझ्या वाट्याला नातीगोती
तू नसानसात विष घोळणारी!

फुलू नये तुझा संसार
तू कोवळ्या स्वप्नांना उध्वस्त करणारी!

पाहू नये कधी कुणी तुझी वाट
तू तिष्ठणार्‍याला जळत ठेवणारी!

लागू नये तुझी सावली कुणाला
तू जन्मभर पिच्छा पुरवणारी!!!

प्रकार: 

पानांमागून पानं

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

पानांमागून पानं
शब्दांमागून शब्द
मनामध्ये वादळ
विचार मात्र स्तब्ध

डोळ्यांमधे अडकलं
मेंदूत नाही शिरलं
वाचलेलं ज्ञान सारं
जिथल्यातिथे उरलं

मिनीटकाटा तासकाटा
पळत राहीले पुढे
पुस्तकावर नजर
आत भावनांचे तिढे

प्रश्नांचेच प्रश्न
उत्तर कुठेच नाही
पानांमागून पानं
मी केवळ उलटत राही

प्रकार: 

जरग - जनण्याची, रमण्याची, गमण्याची

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

13 Oct 2012 LAMAL
विषय: गरज

जरग - जनण्याची, रमण्याची, गमण्याची

गरगरीत वाढे न्मदाते ।
रग बहुत लागे न्मकाळे ।।
गज आदि हरि मती ।
जगण्यात सर्व मती ।।
जर शेवट केवळ च्छणे ।
रज तम सत्व फुका णले ।।

प्रकार: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता