पाखरवेळा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

चिंब फुलपाखरी लेवूनी रंग
पाकळी पाकळी होतसे गंध
सोनसकाळी किरणांची पल्लखी
डोलत फिरते झुळूकी मंद

एक डहाळी, पाखरांची शाळा
दवं-भिजल्या माळा पानोपानी
इंद्रधनु अल्लद चोचीत धरूनी
सूर हाळीतो कुणी या रानी

धरून कमानी-माडांच्या झाळी
विसावती मेघधन श्वेतश्यामला
आद्य अनंत ते- रूप चिरंतन
कण कण होई विठू सावळा
....कण कण होई विठू सावळा!

प्रकार: 
शब्दखुणा: 

हे... मस्तच.
मस्तच आहे कवितेचा मूड. विशेष आवडलं ते ह्या शब्दचित्राला दिलेला अप्रतिम अर्थं.... कण कण होई विठू सावळा!

चिन्नु... अगं कवितेतली लय सापडत नाहीये मला (म्हणजे मलाच)... Sad
आणि पल्लखी ह्या शब्दाचा अर्थंही सांग. नाहीतर काठाकाठाने फिरल्यासारखं वाटतय.

शलकाताई Happy

पल्लकी हा तेलुगु शब्द आहे. पल्लखी म्हणजे पालखी.
अगं माझ्या अंगणात सुंदर पक्षी येतात सकाळ संध्याकाळ. त्यांच्याबरोबर रमून जायला होतं. तासनतास त्यांची शाळा बघत त्यांच्या मागे फिरत असते मी. त्यातून मला जे वाटलं/सापडलं ते हे Happy

हे गावलेलं असच उडून-बिडून जायचं, या भितीने सहज लिहून काढलं. याला कुठली फुटपट्टी लावायला वेळ नाही मिळाला. असं व्यक्त व्हायला मिळणे हे फक्त मायबोलीचं देणं Happy

आहा.. सुरेख. थॅन्क्स, चिन्नु.
अगदी गंमत म्हणून ही कविता म्हणून रेकॉर्ड कर आणि इथे दे. काहीतरी छान लय आहे शब्दांना पण एकुणात कवितेची लय मला सापडत नाहीये.

खूप छान!

दंव भिजल्या माळा>>
आणि इंद्रधनू चोचीत धरुनी>>
या कल्पना सुरेख!

थँक्स दिनेशदा Happy
थँक यू अंजली. या माळा प्रत्यक्षात दिसतांना मस्त वाटतं खरच.
शलाकाताई, अगदी नक्की रेकॉर्ड करून पाठवेन तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. Happy

चिन्नु, यु आर बॅक ! खूप दिवसांनी लिहिलीस आणि आता तक्रारीला जागाच नाही. तुझ्या कवितेची वाट पाहणं अगदी सार्थकी लागलं

थँक यू सो मच प्रिंसेस.
हो, मागच्या दिवाळीनंतर झोपलेच होत्ये Happy कवितेची वाट वगेरे पाहतेस म्हणजे खूपच झालं गं. still, thanks! you guys made my day!