किंमत

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

सुरुच असतो शोध माझा तुमचा
जागेपणी आणि निद्रिस्त असताना सुद्धा
की काहीतरी सापडेल अवचित
आणि बदलून जाईल आपले जगणे

पण असे होत नाही
जिथे स्वःतला उलगडून सांगणेच
अवघड झाले आहे
तिथे नवे काही गावण्याची
शक्यता अगदीच सुमार आहे

कुठल्या तरी एका क्षणी
कदाचित केस आणि केस पिकलेल्या
जख्ख म्हातारपणी
हे कळून चुकत की
ह्यापेक्षा खर्डेघाशी परवडली असती
उभ्या आयुष्यात खूप काही गमावल
नव काही मिळाल त्याची किंमत
मी किती मोजली.. मला माझेच ठावूक.

- बी

प्रकार: 

अगदी खरं आहे हे ------ <<<< की काहीतरी सापडेल अवचित
आणि बदलून जाईल आपले जगणे >>>>>>>.

मृगजळाच्या मागे धावण्यासारखेच आहे हे तरीही सगळे धावतातच बिचारे ........ Happy