स्वैपाकघरातील फुले

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आठवते तुला...गुलमोहराच्या पाकळ्यांची चव
चिंचेचा फुलांचा सांडलेला बहर
हादग्याच्या फुलांवर तुटुन पडलेले रावे
काशीकोहळ्याच्या एखाद्या हळदपिवळ्या फुलाला धरलेले फळ
अंबाडीच्या फुलापासून बनवलेल्या शरबताचा गुलाबी रंग
तव्यावर अरतपरत केलेले करडे दगडफुल
केळीच्या पानावर वाढलेली केळफुलांची भाजी
कोंथींबीरीच्या फुलांना आलेले हिरवे ओले धणे
हिवाळ्यात वालाच्या वेलीवरील जांभळ्या फुलांचे पांघरुन
गगनजाईच्या फुलांच्या देठामधील चाखलेले मध
महादेवाच्या पिंडीवर गळून पडलेले तुळशीच्या मंजिरीतील निळेसावळे कण
तळहातावर घेऊन जिभेने चाखलेला गुलकंद
शेवग्याच्या फुलांचे केलेले थालिपीठ
आंघोळीच्या पाण्यात उकळून काढलेल्या कडूनिंबाचा मोहर
ओठांना जपत भीत भीत खाल्लेली बिब्ब्याची फुले
आणि कधी खायला मिळाली नाही अशी मोहाची फुले?

कालपरवा हे सर्व पाच पावलांवर उपलब्ध होतं
आज पंचक्रोशीत.. दशक्रोशीतही नाही!

पण नाही म्हणून कसलीच खंत नाही
आठवणीतल्या गोष्टींचा आनंद कधी कमी होत नाही!

प्रकार: 

पण नाही म्हणून कसलीच खंत नाही<<<

पावित्रा न घेतल्याचा पावित्रा वाटणारच नाही असा पावित्रा!