कविता

नेमेचि येतो...!

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

कालपासून धो धो पडणार्‍या पावसात
नव्याने वाहून जाईल सुचलेलं शहाणपण

सुरू होईल पुन्हा पाण्याचा बेलगाम वापर
निर्धास्त होतील आपली कोडगी मनं
वर्षा संचयनाचे बेत राहतील कागदावरच
आणि बांधकामांना ऊत येईल राजरोसपणे

सोयीस्करपणे विसरली जाईल पाणीटंचाई
आपापल्या कामाला लागतील सगळे
'नेमेचि येतो' म्हणून मनाची समजूत काढत
अजून एका वर्षाची सोय झाली या आनंदात
पुन्हा सुरूवात होईल नव्या दुष्टचक्राची

कालपासून धो धो पडणार्‍या पावसात
नव्याने वाहून जाईल सुचलेलं शहाणपण!

विषय: 
प्रकार: 

श्यामलमाया

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

रुजून येती खोल मनातून
थेंबांची ही अगणित झाडे
झरझर झरती मेघ अनावर
विचार होती पाऊसवेडे

खेळ सावळा असा रंगला
भिजून गेली हरेक काया
चैतन्याने सजली सॄष्टी
भारून टाके श्यामलमाया!

विषय: 
प्रकार: 

शोभिवंत सर ओघळतो.. (कविता आणि भाषांतराचा प्रयोग-२)

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

नवी कविता आणि तिचं भाषांतर..

वार्‍याचे बघ धैर्य सखे, तो करितो लाघवगान!
प्रणयोत्सुक आकाशसुंदरी, अन्‌ होते बेभान!
शोभिवंत सर ओघळतो गं, घेता चुंबनतान.
लाल हरित मखमालीवरती मोती विराजमान.

-संघमित्रा

See the courage of wind,
he openly sings a love song.
The amorous babe called sky,
blushes and sings along.
The precious necklace breaks,
in a passionate, hasty kiss.
On the red-green velvet of leaves,
the pearls thus land in bliss..

-Sanghamitraa

विषय: 
प्रकार: 

पाऊसव्यथा

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

भेगाळल्या डोळ्यांमधे
आता उरेना टिपूस
आटून गेली आसवे
कधी पडेल पाऊस?

नभ ना आता काजळे
फिकुटली शेतेभातें
धरतीचे आभाळाशी
जणु उरले ना नाते

तोंडचे पळाले पाणी
कोरडले नदी नाले
जीवनाचे थेंब सारे
असे का परके झाले?

विषय: 
प्रकार: 

उन्हांच्या प्रदेशात.. (कविता आणि भाषांतराचा प्रयोग)

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

उन्हांच्या प्रदेशात लाचार वाटा
कशा शोधती सावल्यांचे थवे..
जुने आठवावे तयांचेच रूप,
जुन्या काहिलीला मुलामे नवे!

उन्हांच्या प्रदेशातले शुष्क निर्झर
कुण्या काळची गाळती आसवे..
प्रवाहात ज्यांच्या खळाळून हसले,
मला बाल्य माझे पुन्हा आठवे.

The helpless roads in the sunshine land,
Search for the flocks of shadows..
Better to recall their old facets,
And brighten the bare, old plateaus..

विषय: 
प्रकार: 

समुद्र - १ : किनारा

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

अरे हो हो..
ही आपली सामायिक वहिवाटीची जागा आहे
हे मान्य..
तू इथंच आत-बाहेर असतोस
हे मान्य..
मी इतक्या लांबून कधी कधीच इथं येते
हे ही मान्य..
पण म्हणून मी इथं विसावलेली असताना
तू असं अवचित इथंच झेपावावंस..
तेही तुझ्या भरतीच्या वेळा, आवेग आणि प्रवाह बदलून?
चुकीचं नाही का हे?
नाही ना..
बरं.. हेही मान्यच.. Happy

विषय: 
प्रकार: 

देव

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

एकदा स्वप्नात देव आला
जागेपणी आमची भेट होण्याची तशी शक्यता नाहीच
खरं तर मी अोळखलंच नाही,
तेव्हा त्यानीच आपली अोळख करुन दिली
थोडं अवघडुन मी म्हटलं, सॉरी हं, मी अोळखलं नाही
आपली कधी भेटही नाही झाली आणि परिचयही नाही
तो नुसताच हसला
घरी आलेल्या पाहुण्याला म्हणावं तसं म्हटलं,
बसा की, मी पाणी घेऊन येते
पाणी घेऊन गेले तर तो इकडे-तिकडे बघत होता - उभ्याउभ्याच
विचारलं, काय झालं?
म्हणाला, भेट झाली नाही, परिचय नाही म्हणालीस,
पण स्वयंपाकघरातच छोटंसं देवघर केलंयस,
गणपती-देवीच्या मूर्ती-वॉल हॅंगिंग-घड्याळंही दिसताहेत.

एक क्षण मी गडबडलेच,
मग सावरुन म्हटलं

विषय: 
प्रकार: 

वर्तुळ

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

माझ्याभोवती माझ्या
नैसर्गिक मर्यादांचे
कुंपण वेढलेले आहे
त्यापलिकडे
मला माझे आकाश
विंधायचे आहे
नवे चंद्र शोधायचे आहेत!

माझ्या
सिमित स्वकेंद्रीय वर्तुळात
गुरफटून
माझा अभिमन्यू झाला आहे
ठरलेल्या चाकोरीच्या
आत आत घुटमळणारा
श्वास नकोसा झाला आहे!!!!

माझ्या अस्थिर जिवाची
अविरत अथक धडपड
सुरु असतानाच
'हे विश्वची माझे घर'
असे मला आकळते
आणि ओंजळभर चंद्र
वार्‍यावर भिरकावून
फक्त एक
स्थिर बिंदु
होऊन जावेसे वाटते आहे...

- बी

प्रकार: 

चांदणस्पर्श

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

चांदणे मृदुल कायेवरूनी ओघळते
अस्वस्थ होऊनी धरा कुशीवर वळते
चंद्राच्या स्पर्शांमधेच सरते रात
मग उरी परंतु अजून ती का जळते?

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

तावदान

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

पुढेमागे होणारं खिडकीचं तावदान
एक वावटळ घरात घुसणारी
नि:शब्द बडबडीला आलेला ऊत
मधमाश्यांची गुणगुण, वैताग स्साला!
मोहाचं मोहोळ, डंखाचं सुख
कलंडू पाहतोय काचेचा ग्लास
भिरीभिरी वारं, भिरभिरत्या डोळ्यांत
तावदान अजूनही वाजतंच आहे!

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता