गेल्या काही वर्षात शीर्षकात लिहिलेली समस्या प्रकर्षा ने जाणवू लागलेली आहे. विशेषतः पुण्या मुंबईबाहेर आणी आय टी व्यतिरिक्त इतर क्षेत्रात नोकरी करणार्या मुलांच्याबाबतीत तर जास्तच. शेती किंवा भिक्षुकी करणार्या मुलांच्या बाबतीत तर अजूनच जास्त. नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात सत्तर मुले आणी तीन मुली आल्या होत्या. तीनही मुलींनी मुलांचे पोषाख परिधान केले होते. मुलींनी परिधान केलेले पोषाख नको असं म्हटल्याने पोषाखाचे पर्याय कमी होत चाललेले आहेत. आधीच मुलांसाठी पर्याय अल्प असतात.
या समस्येची कारणे शोधणे फारसे अवघड नाही पण काही ठोस उपाय समाजिक पातळीवर होणे गरजेचे आहे.
नमस्कार..
मुळात प्रश्न हा पडतो की कांदा पोहेच का?
कुणीतरी कुणासाठीतरी त्यांच्या माहितीतले स्थळ सुचविले..की मग.. सहमताने ठरतो तो दिवस.....
तो दिवस म्हणजे पाहुणेमंडळी मुलीला पाहायला येणार तो दिवस......
त्या दिवसाचे तुमचेही काही अनुभव नक्कीच असतील मलाही तुमचे अनुभव वाचायला आवडतील..:) आणि
कांदापोहेच का? ह्या प्रश्नाचे उत्तर वाचायलाही आवडेल.. 
..
"आयुष्यातले... पहिलेवहिले !..
हे दोन शब्द ऐकताच किमान अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना आपले पहिले प्रेमच आठवते!
मग मी तरी त्याला अपवाद कसा ठरू !
आणि दुसऱ्याच दिवशीपासून मला ह्या वेबसाईटचा मला मुलगी शोधून देण्याचा प्रयत्न लक्षात आला. मला मुलगी कोणत्या वयोगटातील अपेक्षित आहे ह्याची माहिती मी त्यांना आधीच दिली होती. त्याप्रमाणे रोज दोन इ-मेल मला येऊ लागले. एका इ-मेल मध्ये मला आठ ते नऊ मुली दिसायच्या. ह्या मुली त्यांच्यामते मला अनुरूप ( match) होत्या. अहो, एक ठीक पण नऊ मुली मला एकाच दिवशी अनुरूप कशा असतील? पण आपण आता choose from the display ह्या इंटरनेटच्या विश्वात आलो आहोत ह्याचा मला साक्षात्कार झाला. आणि असे असून सुद्धा मी त्या नऊ च्या नऊ मुली उत्सुकतेने न्याहाळू लागलो. मुलीचे फोटो इंटरनेट वर पहायची अधिकृत संधी फुकट कोण घालवेल?
आजच्या मटामध्ये हि बातमी वाचण्यात आली. त्यानिमित्ताने थोडेसे…
या सगळ्या मॅट्रिमोनियल साइटवर आपला/ घरच्यांच्या मोबाईल नंबर देणे आवश्यक असते. ठिक आहे, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन हेही मान्य आहे.
पण आपला हाच मोबाईल नंबर वापरून या मॅट्रिमोनियल साइटवरचे हे लोक पैसे भरण्यासाठी लोकांना सारखे फोन करून छळत रहातात. माझ्या मैत्रिणीने याला वैतागुन शेवटी मॅट्रिमोनियल साइटवरचे आपले प्रोफाइल रद्द केले होते.
वरच्या बातमीत त्या मुलाने १,२०७ मुलींशी संपर्क केला होता. १,२०७!
खुषखबर! सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते.
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
माझी एक मैत्रीण आहे. सुस्वरुप आहे, एकत्र कुटूंबात वाढली आहे. एल्.एल्.बी करुन पुण्यात एका चांगल्या वकीलांकडे प्रॅक्टिस करते. शिवाय स्वतः स्वतंत्रपणेही काम करते. म्हणजे अगदी आपल्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशासारखीच. तिचे लग्न न ठरण्यात मोठा वाटा तिच्या कार्यक्षेत्राचा आहे. कारण मुलगी 'वकील' आहे म्हणताच ऐकणार्याचे तोंड एवढेसे होते. मुलाची आईच असेल तर जणू आता आपल्या घरात रोजच 'जनता की अदालत' भरणार हे भविष्य दिसून तिची घाबरगुंडी उडते. मुलगी कशी आहे, काय करते, तिच्या इतर आवडी निवडी काय आहेत हे जाणून घ्यायच्या आधीच नकार दर्शवला जातो.