मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का रे दुरावा ची स्टोरी रिअल लाइफ मध्ये पाहीली आहे. आमच्या एका वेंडर कंपनीत विजिटला जायचो. तिथला प्रोजेक्ट हेडशी माझ को-ऑर्डीशन असायचं. त्याने तिथला जॉब सोडल्यानंतर कळाल कि त्याच्या टीम मधील प्रोग्रामर त्याची बायको होती आणि हे कुणालाच माहीत नव्हतं. नंतर कंपनीत कळल्यावर तिनेही तो जॉब सोडला.

मी नऊची कुठलीच मालिका बघत नाही त्यामुळे ही सुद्धा बघणार नाही. पण मुलाला प्रोमोज बघून सिरियल बघण्याची अतीव उत्सुकता निर्माण झाल्यामुळे पहिला भाग बघितला.
अशी एक कंपनी ज्यात नोकरी मिळवायला जाताना अविवाहित असण्याची तर अट आहेच ( हे एक वेळ पटवून घेऊ.) पण नंतर आजन्म अविवाहित राहण्याचा बाँड साईन करावा लागतो हे बघून धन्य झाले ! आता दोघांना त्या कंपनीत नोकरी मिळणार आणि मग ते अविवाहित असल्याचं नाटक करणार.
चालूद्या... Proud

मला तो हिरो आवडतो 'सुयश टिळक', त्याच्यासाठी बघतेय. पण एवढी काही नाही आवडली मालिका. ते सासरे धाकट्या मुलाला बोलतात तो धड जॉब करत नाही म्हणून ते ठीक आहे पण मोठी सुन एवढी काल कांगावा करत होती तिला एकही शब्द बोलत नाहीत. हे पटले नाही.

मालिकेचे कथा बीज अगदी ठिसूळ गृहितकावर आधारित आहे. बीज कितीही ताणले तरी मालिका बघणे अशक्य. सोशिक पणाचा कळस दाखवला आहे.

<< अशी एक कंपनी ज्यात नोकरी करताना अविवाहित असण्याची तर अट आहेच ( हे एक वेळ पटवून घेऊ.) पण नंतर आजन्म अविवाहित राहण्याचा बाँड साईन करावा लागतो >>

त्यात सुबोध भावे सारखा कलाकार खत्रूड मालक म्हणून दाखवून वाया घालवला आहे. एकंदरीत मालिका नाही बघितली तरी काही बिघडणार नाही, उलट उर्जा, वेळ याची बचत होईल आणि डोकेदुखी पासून सुटका . Happy

त्यात सुबोध भावे सारखा कलाकार खत्रूड मालक म्हणून दाखवून वाया घालवला आहे. एकंदरीत मालिका नाही बघितली तरी काही बिघडणार नाही, उलट उर्जा, वेळ याची बचत होईल आणि डोकेदुखी पासून सुटका >>> अगदी अगदी.. सुरुवातीपसुन च पाणी घालायला खुप स्कोप आहे.. सो इग्नोर्स्त्र मारतेय.. सध्यातरी ...

साधारण स्टोरीपण लक्षात येतेय, तो मोठा मुलगा-सुन विचारणार नाहीत त्या बाबांना नंतर आणि हे दोघं लग्न लपवून एका ठिकाणी नोकरी करणार नाईलाजाने आणि तो सुबोध भावे बहुतेक नायिकेच्या प्रेमात पडेल.

सिरीयसली बोअर आहे. मी दहा मिनीटंही नाही बघितली. पण इथल्या दंग्याचे पोटेन्शियल खूप असल्यानेच हा धागा काढला.

सिरीयसली बोअर आहे. मी दहा मिनीटंही नाही बघितली. पण इथल्या दंग्याचे पोटेन्शियल खूप असल्यानेच हा धागा काढला. >> दंग्याची खात्री देता येत नाही, उदा. होसुमित्या -२ धागा. किती वेगात पळत होता. आता हिंग लावून पण कोणी विचारत नाही मालिकेला आणि धाग्याला.

तो बाबा इतका का बोलतो पोराला? Uhoh जरा अतीच.
आणि ती मोठी जाऊ अतिच दाखवली आहे.
सिरियलस मध्ये एक काळं ठिक्कर आणि दुसरं पांढरं शुभ्र दाखवण्याचा अट्टहास इतका का असतो? Uhoh आणि पुरूष सगळे स्थितप्रज्ञ दाखवतात. बायकाच कांगावखोर.
त्या जानूची आई तशी, तिकडे ती अर्चु, इथे ही जाऊ.

या धाग्यावर मालिकेतील प्रसंग, भावना, व्यक्तींचे वागण नि अभिव्यक्ती तार्किकदृष्ट्या अयोग्य असल्याचे ठासून सांगण्यास, तशी खंत व्यक्त करण्यास नि योग्य काय असेल ते सांगायचे स्वातंत्र्य मागण्यास सक्त मनाई आहे.....आशुडी असेही लिहा Proud

मालिकेचा पहिला भाग पाहिल्यावर अर्धा तास वाया घालवण्यात अर्थ नाही हे माझ्या लक्षात आले. पण मालिका न बघताही इथे नक्की नियमित हजेरी लाऊन जाणार.

बघितली ही मालिका ..
अति टिपिकल सुरुवात! हिरो-हिरॉईन अगदी पहिल्या एपिसोड मधे खरचं भाऊ-बहिण वाटले मला Proud
अदिती .. अतिच मॅच्युअर आहे.. स्वप्नातलं घर नि काय काय..
इतकी शिकलेली, नोकरी केलेली नि मोठया घरची आहे पण एकही लॉजिकल गोष्ट बोलत नाही!

काय वैताग मालिका आहे! प्रेक्षकांचे मेंदू गुढग्यात नाहीयेत सांगा झी वाल्यांना कोणीतरी Angry
एकुणात सध्या कुठल्याच मराठी वाहिनीवर बघणेबल मालिका उरलेली नाही Sad

हो ना .. काल सवयीप्रमाणे एलतिगोची लिंक उघडली मग ट्युब पेटली की अरे ती मालिका संपलीय
म्हणुन ही बघितली!

खरंय... अतीच टिपिकल मालिका निघाली ही तर.. अगदी पहिल्याच भागापासून.. जरासुद्धा वेगळेपणा नाही. Uhoh जान्हवीची कॉपीच वाटतेय ही नायिका.. तेच ते चाळीतलं घर, तोच तो सोशिकपणा.. एखाद्या मालिकेत यशस्वी झालेला फॉर्म्युला लगेच जसाच्या तसा उचलण्यात काय अर्थ आहे? नायिका म्हणजे "सबका पूरा ध्यान धरे और शाम ढले तक काम करे" ह्याच एका आदर्शवादावर आधारित असाव्या आणि प्रत्येक मालिकेत मंगळागौरीचे आचरट नाच, बेसूर गाणी, गणेशोत्सव, राखी पौर्णिमा, वटसावित्री, गुढीपाडवा हे आलेच पाहिजे.. त्याशिवाय मालिकेच्या टेलिकास्टला परवानगी मिळणार नाही.. असा क्रिएटिव्ह टीमला दम देत असावेत प्रोड्युसर्स... कंटाळा आला आता या सगळ्याचा..

सानी, सबका पूरा ध्यान धरे चं मूर्तिमंत उदाहरण बघायचं असेल तर अस्मिता चं शीर्षक गीत बघ. टिकली लावल्याशिवाय,हात जोडल्याशिवाय, डबा करून भरून दिल्याशिवाय तिला घराबाहेर पडताच येत नाही. गुप्तहेरांनाही असतो संसार हेच त्याचं सार! Proud

सबका पूरा ध्यान धरे और शाम ढले तक काम करे >> Lol

आशुडी Proud
अस्मिताच सुरुवातीच म्युझिक टॅडॅ टॅटॅ टॅडॅ टॅटॅ डोक्यात जातं .. रात्री झोपेतुन उठली तरी फुल्ल मेकअप!

Pages