चालू घडामोडी

वाहतूक दिवे आणि पुणे ! का ?

Submitted by किंकर on 5 August, 2015 - 09:41

वाहतूक दिवे आणि पुणे. ! का ? (उद्गार चिन्ह का प्रश्न चिन्ह )
आज डेली टेलिग्राफ मध्ये एक बातमी आली आहे . स्वयंचलित दिवे कार्य पद्धत कार्यान्वित होवून १०१ वर्षे पूर्ण झाली म्हणून गुगल डूडल ने आज त्याची दखल घेतली आहे . खरतर इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना.

दिनांक ५ ऑगस्ट १९१४ या दिवशी क्लीव्हलंड ओहियो येथे पहिला स्वयंचलित वाहतूक नियंत्रण दिवा कार्यान्वित झाला .

शब्दखुणा: 

फसवणूक!

Submitted by सारिका.चितळे on 10 October, 2014 - 11:55

आजच्या मटामध्ये हि बातमी वाचण्यात आली. त्यानिमित्ताने थोडेसे…

या सगळ्या मॅट्रिमोनियल साइटवर आपला/ घरच्यांच्या मोबाईल नंबर देणे आवश्यक असते. ठिक आहे, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन हेही मान्य आहे.
पण आपला हाच मोबाईल नंबर वापरून या मॅट्रिमोनियल साइटवरचे हे लोक पैसे भरण्यासाठी लोकांना सारखे फोन करून छळत रहातात. माझ्या मैत्रिणीने याला वैतागुन शेवटी मॅट्रिमोनियल साइटवरचे आपले प्रोफाइल रद्द केले होते.
वरच्या बातमीत त्या मुलाने १,२०७ मुलींशी संपर्क केला होता. १,२०७!

शब्दखुणा: 

तेहलका

Submitted by सूनटून्या on 21 November, 2013 - 04:09

तेहलका

बलात्काराचा प्रयत्न हा कंपनीचा अंतर्गत विषय असू शकतो?? याला म्हणतात खरा तेहलका…।

तरुण तेजपालला इतर गुन्हेगाराप्रमाणे न्यायालयासमोर का उभा करू नये.

संपादक स्वतः एक महिला असून ही सर्व गोष्टी इतक्या सहजपणे कशी घेवू शकते.

शब्दखुणा: 

स्त्री-भ्रूण हत्याच बरी!

Submitted by भानुप्रिया on 29 December, 2012 - 05:59

चला, दिल्ली सामुहिक बलात्काराची बळी ठरलेली ती मुलगी अखेर गेली.

सुटलीच, नाही का?

ती ही सुटली अन आता तिचा मृत्यूच झालेला असल्यामुळे कदाचित हा विषय मागे पडून तिचे दोषी असलेले ते काहीजण सुद्धा सुटतील. किंवा होईल त्यांना शिक्षा, ३-७ वर्षांच्या सक्त-मजुरीची. मग ते पुन्हा बाहेर येतील आणि कदाचित एखाद्या अशाच संध्याकाळी आपल्या लिंग-पिसाट वृत्तीसमोर शरणागती पत्करून आणखीन एका "अमानत" वर/मध्ये 'मोकळे' होतील.

मग आपण परत निषेध व्यक्त करू, निदर्शनं करू, सरकारला शिव्या घालू, सरकार हिजडं आहे अशी आपली मौलिक प्रतिक्रिया सुद्धा देऊ. मग काय, बहुधा, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

Subscribe to RSS - चालू घडामोडी