फसवणूक!

Submitted by सारिका.चितळे on 10 October, 2014 - 11:55

आजच्या मटामध्ये हि बातमी वाचण्यात आली. त्यानिमित्ताने थोडेसे…

या सगळ्या मॅट्रिमोनियल साइटवर आपला/ घरच्यांच्या मोबाईल नंबर देणे आवश्यक असते. ठिक आहे, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन हेही मान्य आहे.
पण आपला हाच मोबाईल नंबर वापरून या मॅट्रिमोनियल साइटवरचे हे लोक पैसे भरण्यासाठी लोकांना सारखे फोन करून छळत रहातात. माझ्या मैत्रिणीने याला वैतागुन शेवटी मॅट्रिमोनियल साइटवरचे आपले प्रोफाइल रद्द केले होते.
वरच्या बातमीत त्या मुलाने १,२०७ मुलींशी संपर्क केला होता. १,२०७!
५-१०, १५-२०, (डोक्यावरून पाणी) ४०-५० ठिक आहे. पण १,२०७.
तो मुलगा १,२०७ मुलींशी संपर्क करेपर्यंत झोपले होते का हे मॅट्रिमोनियल साइटवाले? (अर्थात बातमीत एकच मॅट्रिमोनियल साइट आहे का याचा उल्लेख केला नाही आहे.)
लोकांकडुन पैसे कमवण्यासाठी त्यांना सारखे फोन करून छळणारे हे, एकदा त्याच्याकडुन पैसे मिळाल्यावर त्याच्याकडे इतके दुर्लक्ष कसे काय करू शकतात?
'मिळाले ना पैसे त्याच्याकडुन, मग काहिही का करेना तो, आपल्याला काय करायचे आहे त्याच्याशी?' हि प्रवृती इथे जाणवते.
एखादा मुलगा इतक्या मुलींशी संपर्क करतो तेव्हा त्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे याची थोडीशीसुध्दा जाणिव होऊ नये यांना?
बातमीत सांगितल्याप्रमाणे त्या मुलाला अटक केली आहे. पण मग त्या मॅट्रिमोनियल साइटचे काय? त्यांचे नाव का दिले नाही आहे या बातमीत?
त्यांच्यावरसुध्दा हलगर्जीपणापध्दल गुन्हा दाखल व्ह्यायला नको का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सगळ्या मॅट्रिमोनियल साइटवर आपला/ घरच्यांच्या मोबाईल नंबर देणे आवश्यक असते. ठिक आहे, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन हेही मान्य आहे.
पण आपला हाच मोबाईल नंबर वापरून या मॅट्रिमोनियल साइटवरचे हे लोक पैसे भरण्यासाठी लोकांना सारखे फोन करून छळत रहातात.>>>>>>>>>>>>>> अहो ही लोक तुम्हाला प्रथम फोन करतात आणि सान्गतात आमच्याकडे खूप स्थळ आहेत तुमच प्रोफाइल फुकट तयार करतो .....समोरचा माणूस माहिती देतो...... नन्तर याचे सारखे फोन चालू होतात पैसे कधी भरताय..........

माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच matrimony sites फोन नंबर access साठी एक cap ठेवतात. म्हणजे एका महिन्यात तुम्ही ५० फोन नंबरच पहू शकता वै. If you want to higher then you have call them to reset your account or pay higher or some sort of condition.
रच्याकाने, हा धागा उपग्रह वाहिनी-मराठी मध्ये का आहे?

बापरे .. दिड लाखांना फसवले .. त्या मुलीने एवढे पैसे उधळले कसे, ते सुद्धा ज्याच्या माहितीची शहानिशा केली नाही अश्यावर ..

बाकी मॅट्रिमोनियल साईट आणि फेसबूक सारख्या सोशल साईटमध्ये मग फरक काय उरला ..