कांदे पोहे....

Submitted by संगिनी on 17 March, 2015 - 05:04

नमस्कार..
मुळात प्रश्न हा पडतो की कांदा पोहेच का?
कुणीतरी कुणासाठीतरी त्यांच्या माहितीतले स्थळ सुचविले..की मग.. सहमताने ठरतो तो दिवस.....
तो दिवस म्हणजे पाहुणेमंडळी मुलीला पाहायला येणार तो दिवस......
त्या दिवसाचे तुमचेही काही अनुभव नक्कीच असतील मलाही तुमचे अनुभव वाचायला आवडतील..:) आणि
कांदापोहेच का? ह्या प्रश्नाचे उत्तर वाचायलाही आवडेल.. Happy

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Not necessary की आजकाल कांदे-पोहे च असतील.....आमच्या सासरी चहा सोडल्यास सगले जिन्नस चितळे बंधुंच्या सौजन्याने होते....आणि अजब कॉम्बो पण होते Lol
चिवडा, लाडु, नारळाची बर्फी, चहा आणि मग गुलाबजाम चा आग्रह ही होता....
ह्या सगळ्या वरुन मी अजुन ही बायकोला चिडवतो....

धन्यवाद, तुमच्या प्रतिसादाबद्द्ल..
मी मायबोलीवर नवीन असल्याने हा माझा पहिलाच प्रयत्न लेखनाचा..
आणी तुमचा अनुभव तर फारच मजेशीर आहे....:)

धन्यवाद, तुमच्या प्रतिसादाबद्द्ल..
मी मायबोलीवर नवीन असल्याने हा माझा पहिलाच प्रयत्न लेखनाचा..
आणी तुमचा अनुभव तर फारच मजेशीर आहे....:)

आमचा पण कांदे पोहे असा कार्यक्रम झाला नही. त्यात मी होस्टेल ला राहत होते , म्हणून आमची पहिली भेट pizza hut मध्ये झाली
आणि त्या नंतर पण सासू सासरे आणि आई वडील सगळे मिळून एका family restaurant मध्ये भेटलो . सगळ final झाल्यावर एकमेकांच्या घरी घर पाहण्याच्या निमित्ताने गेलो
अशा प्रकारे arrange marriage झाल . चहा पोहे शिवाय

आमचे लग्न झाल्यावर दोन की तिन आठवड्यांनी माझा (राहिलेला) कांदे पोहे कार्यक्रम झाला... माझाच कारण नवरा तोवर परदेशी निघुन आला होता... Lol

आमची बैकुच आम्हाला पाहायला आलती!!! आम्ही नाय गेलो ! मी कुठेतरी पोस्टेड सुट्ट्या कमी त्यात बायको राजस्थान ची म्हणले या तुम्हीच घरी!! आली मनात भरली (तेव्हा बारीक़ होती म्हणुन मावली गुलाम मनात!!!) मी पण तिच्या मनात भरलो (तिचे मन मोठे आहे हो) पोहे नव्हते, इंगेजमेंट ला गेलो सासरी तेव्हा जेवणाचा थाट होता दोन दिवस!! राजस्थानी स्पेशलिटी बाटीदाल ते कैरसांगरी ची भाजी न काय न काय!!

आम्च्या घरि गदग रव्याच्या उप्म्याचा बेत होता.
बघायला आलेला मुलगा, म्हणाला मी नाश्ताच करत नाही(कारण येताना आधी ३-४ प्लेट इडली खावुन आला होता). लवकर जायलाच तयार नाही. जेवणाची वेळ झाली. नाईलाजाने जेवता का विचारले, त्यावर तोंड भरुन होकार दिला, आणि भात -पोळ्या संपेपर्यंत जेवलासुद्धा.

हा किस्सा आधी लिहिलाय बहुतेक कुठेतरी ...
आम्ही व्हॅलन्टाईन डे च्या शुभमुहुर्तावर ( योगायोग ! ) मुलाकडे त्याचे आईबाबा, बहीण आणि तिची फॅमिली, सख्खी शेजारीण असं सगळ्यांना बघायला गेलो होतो. मुलगा अमेरिकेत होता. त्याचे बँगलोरला बॅचलर मित्रांच्या गराड्यात काढलेले दोन-तीन फोटो होते. ते दाखवायची जबाबदारी आठ वर्षांच्या भाचीवर सोपवण्यात आली. तिने फोटो दाखवायला घेतल्यावर मुलाचे वडील म्हणाले की बरोबर चेहेरा दाखव हं, नाहीतर ती दुसराच मुलगा पसंत करायची Lol

मग जरा वेळाने साग्रसंगीत डाळिंबाचे दाणे वगैरे घालून 'दडपे पोहे' आले. पोहे फारच चविष्ट होते पण माझ्या साहित्यिक मनात ( उगीच ) शंका आली की दडपे पोहे म्हणजे ह्यांनी आपल्यापासून काही दडपून ठेवलेय असा दैवी संकेत तर नाही ना ! Proud

मी घरातून निघताना आईला निक्षून बजावले होते की मी गाणं-बिणं काही म्हणणार नाही. तिनेही अगदी जोरात होकार भरला होता. प्रत्यक्षात दडपे पोहे खाल्ल्यावर मुलाच्या वडिलांनी गाणं म्हणण्याचा आग्रह केला. मी आईकडे बघितले तर तिने 'अगं, किती छान आहेत सग़ळे. म्हण की एखादं' असं म्हणून माझीच विकेट घेतली. मग गाणं काय म्हणायचं ह्याचा काहीच विचार न केल्याने मी तयार असलेलं 'फुलले रे क्षण माझे, मेंदीने शकुनाच्या' असं अर्थ अजिबातच लक्षात न घेता ठोकून दिलं तर तिथे सगळ्यांना तो दैवी संकेत वाटून त्यांचे चेहरे खुलले Lol

मग रीतसर त्याचा इमेल आयडी देण्यात आला. दोन-तीन महिन्यांनी मुलगा आल्यावर परत दडपेपोहे प्रोग्रॅम रिपीट न करता तो एकटाच आमच्या घरी आला आणि एकमेकांना बघण्याचा सोहळा आम्ही जुहू बीचवर पार पाडला. मग पसंती, साखरपुडा, लग्न वगैरे ...

हा प्रोग्रॅम सोडता अजून दोनच बघण्याचे प्रोग्रॅम झाले होते. इथे योगायोग म्हणजे दोन्हीवेळा खायला प्यायला काही ठेवलेच नव्हते. नुसतीच धावती भेट ( पहिल्याची आमच्याकडे / दुसर्‍या वेळेला आम्ही मुलाकडे ) आणि आत शिरल्याशिरल्याच कळून चुकले होते की इथे काही जमत नाही. फुकट खेप पडली Proud

दैवी सन्केत भारी आहे अगो.:हाहा:

मुग्धानन्द, सोन्याबापु, वत्सला अनूभव भारी आहेत तुमचे. सोन्याबापु मज्जा आहे तुमची, राजस्थानला सासर आहे, पाहिलत की नाही पुरे राजस्थान?

माझ्या मुलीचं लव मॅरेज. पण ती मंडळी पहिल्यांदा आमच्या़कडे आली होती तेव्हा मी पोहेच केले होते. भावी जावयांना विचारुनच बेत ठरविला होता. ( स्मित ) ओल्या नारळाच्या करंज्या आणि पोहे . मग मुलगी अगदी खाली मान घालुन पोह्यांच्या बशा घेऊन बाहेर आली आणि भावी जावयांच्या हातात बशी देताना हळूच चोरुन त्यांच्याकडे पाहिलं वैगेरे. ( स्मित ) पहाण्याच्या कार्यक्रमाला मराठी घरात तरी पोह्यांना पर्याय नाही

जास्त नाही झाले दर्शन पण कदीमदी चिडली की होते दर्शन! जेव्हा ती चिडून मराठी सोडून राजस्थानी वर उतरते!!!

कैरसांगरी ची भाजी >> कि केरसांगवी .. काय जाणे.. रच्याकने त्या जैन मारवाडी तर नाहीत ना.. हे आपल उगाचच विचारतेय सोन्याबापू .. माझे बेश्टीज आहेत न तर जरा जरा माहिती आहे म्हणून विचारल.. केरसांगवी/री ची भाजी, पुडी, चातुर्मास, खमतखामना वगैरे Happy

बाकी कांदे पोहे या कार्यक्रमाला माझा पूर्ण आणि जाहिररित्या निषेध आहे.. बॅचलर म्हणून..
उगा शोभेला ठेवलेल्या बाहूलीसारख लोकांमधे जाचं, इच्छा नसताना लाजल्यासारखं दाखवाचं, बोलताना मधे टेम्प घालायची तीव्र इच्छा असताना उगा खाली मान घालून बसायच..आईशप्पथ पाहायला आलेल्या एकेकाच्या पेकाटात लाथ घालून बाहेर काढायची इच्छा होते.. म्हणून ताईच्या पाहण्याच्या प्रोग्राम च्या वेळी २ दिवस मला शांत करण्यात जायचे Proud ..

नाही मराठीच आहे बैकु पण बॉर्न एंड ब्रॉटप इन राजस्थान त्या भाजी ला कैरसांगरी असेच म्हणतात मुळात ह्या दोन वेगळ्या भाज्या असतात कैर म्हणजे एक बारीक हिरवे फळ असते कॉन्टिनेंटल कुझिन मधे केपर्स असतात तसे (आपल्याकडे ही केरं ह्या नावाने ही हिरवी फळे मिळतात त्याचे लोनचे केले जाते) अन सांगरी म्हणजे शेंग असते बारकी शमीच्याझाडाची शेंग असते भाजी ही तुपात बनावतात भरपुर ड्राईफ्रूट्स वापरून किंवा त्याचे अचार ही बनवले जाते

>>>>>>>>>>> मुळात प्रश्न हा पडतो की कांदा पोहेच का? <<<<<<<<<<<<<

हा पडलेला प्रश्न अगदीच योग्य आहे. उगाचच म्हणजे अगदी काहीच गरज नसताना बघण्याचा कार्यक्रम आणि कांदे पोहे यांची सांगड घालण्यात आलेली आहे.

कांदे पोहे आणि बघण्याची घातली कोणी सांगड,
आयुष्यात आमच्या त्यामुळे भलतीच झाली भानगड !

त्याच झाल अस, चार एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझी प्रेयसी आणि मी त्यावेळी नुकतेच प्रेमात पडलो होतो. कॉलेज च्या १st इयर मधेच होतो. आम्ही एकाच शाळेत शिकलो होतो खरं. पण शाळेत आमच तेवढ बोलण नव्हतं. कॉमन friends होते बरेच. त्यांच्या सोबत एकदा मी तिच्या घरी गेलो होतो (आमचं जमल्या नंतर). बाकीच्यांचं तिच्या घरी आधीपासून येणं जाणं होतं, मी मात्र त्यावेळी पहिल्यांदा जात होतो.
तिच्या आईने (आणि माझ्या होणाऱ्या आईने) सहज म्हणून कांदेपोहे खायला केले. त्यांना त्यावेळी काही माहित नव्हत या पोरांमध्ये आपल्या कारटीचा boyfriend बसलाय म्हणून. आता कोणीही आल कि आपण generally पोहे करतोच ना. तसेच त्यांनी केले. त्यामुळे मलापण त्यामध्ये विशेष अस काहीच वाटलं नव्हतं.
दोघी मायलेकींनी सगळ्यांना एक एक डीशा दिल्या. आणि काकु (temporary) अजून काहीतरी आणायला म्हणून आत गेल्या. तेवढी संधी साधून आमच्या एका मित्राने उचलली जीभ आणि लावली टाळयाला. xxxx म्हणतो कसा (एकदम सिरीयस मोड मध्ये बरका), " हे..... काकूंनी आज 'कांदेपोहे'च कसकाय केले बुवा...? त्यांना माहित होत कि काय प्रतिक येणार आहे म्हणून.?"
झालं! विस्फोट झाला तिथे हास्याचा. विस्फोट म्हणजे विस्फोटच! सगळे पार ताटल्या बाजूला ठेऊन जीव काढून हसत सुटले. मला तर काय करावं तेच सुचेना. मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण ऐकतय कोण? सगळे हसतच सुटले होते. मी हताश होऊन तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकला. तिने पण माझ्याकडे पाहिलं. त्या अनपेक्षित विनोदाने ती पण हादरली होती. आम्हालापण एकमेकांकडे पाहिल्यामुळे जरा हसू आलं. पण आमच हसू वेगळ होत. जाऊद्या. हे जास्त तपशिलात नको. तर असा चेहरा झालेली ती आत जायला म्हणून पटकन मागे वळाली अन त्याचवेळी काकु (T) नेमक्या बाहेर येत होत्या. त्यांनी तिच्या गालावरची लाली टिपली असावी बहुतेक. आणि तो so called विनोद पण ऐकला असणार. कारण स्वयंपाकघर काही दुसऱ्या देशात नव्हतं. तिथेच होतं. त्या वेळी त्या काही बोलल्या नाहीत. पण नंतर 'तो नवीन मुलगा कोण होतं गं? पहिल्यांदाच आला ना आपल्याकडे? शाळेतलाच होता तर आधीच कसा नाही आला?' वगेरे वगेरे सुरु झालेल. त्या फालतू कांदेपोहे प्रकाराने अशा प्रकारे आमची भांडेफोड झाली.
अर्थात नंतर सगळ व्यवस्थितच झालं. पण त्यावेळी किती कसतरी वाटलं आम्हाला.!!

कांदेपोहे हा पदार्थ शक्यतो न बिघडणारा शिवाय पोटभरीचा आणि चवदार! सरसकट सगळ्यांकडे मान्यता पावलेला!
पोहे आवडत नाहीत असाही जनरली कोणी नसतो. म्हणून करत असावे.

कापो लगेच होतात, नाहितर सुगरण्पणा दाखवायला कुणि चिरोटे करायला घेअतले तर रुखवतातच थ्वेवावे लागतिल