बॉलिवूड मधील क्रीपी स्टॉकींग कधी थांबणार ?

Submitted by धनि on 30 June, 2017 - 15:10

बॉलिवूड मध्ये सतत आपण बघत आलो आहोत की हिरो हिरॉइनीचा पाठलाग करत असतो, तिला त्रास देत असतो, "ना का मतलब हा होता है" असे म्हणतो. आधीपासून हे सुरू आहेच पण ९० च्या दशकात "खुद को क्या समझती है" , "खंबे जैसी खडी है" वगैरे गाण्यांनी या गोष्टींना अधिकच हातभार लावला. आता खरं तर हे स्टॉकींग चूकीचे आहे. असे करायला नको. नो म्हणजे नो असे काही पिक्चर्स येत होते. पिंक सारख्या चांगल्या चित्रपटातून साध्या आणि स्पष्ट भाषेत हे समजवून सांगत होते.

आता जग बदलतंय, बॉलिवूड बदलतंय असे वाटत असतानाच एकदम टॉयलेट - एक प्रेम कथा मधले हंस मत पगली गाणे पाहिले. आता तसे पाहता हा पिक्चर एका चांगल्या विषयावर आधारीत आहे. त्यामुळे माझ्या या पिक्चर कडून बर्‍याच अपेक्षा होत्या. पण तेवढ्यात हे गाणे पाहिल्याने काही अपेक्षा ठेवणेच पाप आहे की काय असे वाटायला लागले.

Creep1.JPG

या गाण्यात अक्षय कुमार भूमी पेडणेकरच्या मागे लागलेला आहे. अगदी विचीत्र पणे तिचा पाठलाग करतो. तिचे फोटो काढतो. तिच्या कॉलेजभोवती फिरतो. ती सायकल चालवत असताना गाडीवर पाठलाग करतो. असे क्रीपी स्टॉकींग करताना दाखवलेले आहे.

Creep2.JPGCreep3.JPG

बॉलिवूडच्या दिग्दर्शकांना कधी कळणार की या सगळ्या रोमँटीक गोष्टी नसून स्टॉकींग आहे. यामुळे त्या मुलीला किती मानसीक त्रास होत असेल. आणि याचे अनुकरण किती मुले करतील आता सिनेमात पाहून. हे सगळे कुठे तरी थांबायला पाहिजे. अक्षय कुमार सध्या चांगल्या विषयावरचे चित्रपट करत असताना त्याने सुद्धा असे दाखवणे बरोबर वाटत नाही.

Creep4.JPG

ही आहे पूर्ण व्हिडीओ ची लिंकः https://www.youtube.com/watch?v=h2d8cevZDIQ
(चित्रे युट्युब वरून)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू म्हणतोस तो लेटेस्ट पिक्चर पाहिलेला नाही पण हा आचरटपणा थांबवून काही बरे मेसेजेस देता येत असतील तर द्यावेत. तरुण जनता रिअल लाईफमध्ये अनुकरण करायला टपलेलीच आहे.

बॉलिवूड मधील क्रीपी स्टॉकींग कधी थांबणार ? >>>>
कधीच नाही
आणि हे काय आज च नाही दाखवत चित्रपटात
अगदी ५०-६० च्या दशकात सुद्धा नायक असाच होता, फक्त इतका निर्लज्जपणा दाखवत नसत Happy

Suitor: a man who pursues a relationship with a particular woman, with a view to marriage.
Ignore the later half of the definition for the sake of the discussion
Because guys pursue girls for other reasons more often

सोपं समीकरण आहे
सगळे एक सारखच वागत असतात, वेगळं काही करत नसतात
फक्त एक कोणीतरी त्या मुलीला आवडतो, तो नायक, बाकीचे नाही, ते खलनायक.

Hence one must take a clue and respect her opinion and let go.
Unfortunately many guys cannot come to terms with this and all the troubles begin.

आणि या वागण्याला बॉलिवूड जबाबदार आहे का?
हो ही आणि नाही ही

गाण्यांचं काय घेवून बसलास, अंजाम, डर करूनच तर स्ट्रगलरचे सुपरहीरो झाले आहेत. तू जे म्हणतो आहेस ते म्हणजे अट्टल क्रिमिनल लोकांना एथिक्सच्या क्लास ला बसवण्यासारखे आहे.
एआयबीचा विडीओ अ‍ॅप्ट आहे.

सैराट मध्ये तो परश्या आर्चीच्या गाडीचा पाठलाग करतो, तिच्या घरासमोर फिल्डींग लावून तासन् तास उभा राहतो, पोरी आंघोळी करत असताना बिनदिक्कत जाऊन विहिरीत उडी मारतो, अल्पवयीन पोरामार्फत सतत चिठ्ठ्या पाठवतो, ते क्रीपी नाही वाट्टं? Wink

अ‍ॅक्चुअली असुफ म्हणतात ते बरोबर आहे. जुन्या पिक्चरमध्येही हिरोईनच्या मागे लागून लागून त्यांना पटवणारे हिरो होतेच. त्याला स्टॉकिंग म्हणतात हे तेव्हा माहित नसावं बहुधा.
>>अंजाम, डर करूनच तर स्ट्रगलरचे सुपरहीरो झाले आहेत.>> शूssss. त्या पिक्चरच्या सायको स्टॉकर हिरोचं नावही उच्चारु नका. Wink

तेच म्हणतो आहे ना मी ९० मध्ये क्रिपीपणा वाढला पण आता जरा वेगळे दिवस आलेत असे वाटत असताना परत हे बघितल्याने बरं नाही वाटलं. क्रिपीपणा तो क्रिपीपणाच असतो मग तो परश्याने केलेला काय की शारूख नी केलेला काय की अक्षय कुमार ने केलेला.

तो आहे आणि तो चूकीचा आहे हे म्हणणे आवश्यक आहे.

नियमाला अपवाद एक भन्नाट स्टॉकिंग सीन म्हणजे समीर सुबोध टाईम टेबलला भेटतो. पाठलाग करत कुणाच्या डेटनाईटची वाट लावायची म्हणजे.. Lol पण तो सीन आवडतो...

बरोबर आहे देजा वू.
जानेमन जानेमन म्हणत मागे मागे फिरणारे पालेकर सुद्धा स्टॉकरंच.
स्टॉकिंग केल्यास क्ष कायद्यान्वये य वर्षांची शिक्षा होणार, असा सिगरेट पितांनाच्या दृष्यांना असतो तसा वैधानिक ईशारा हवाच म्हणजे कोणी त्यांच्या क्रिपी वागण्याचे बील सिनेमांच्या नावाने फाडणार नाही. Happy

दृष्यांना असतो तसा वैधानिक ईशारा हवाच >> ही चांगली आयडीया वाटते. तसेही सिगरेट दृष्यांखालचा इशारा जसा स्विकारला आहे तसा हा पण चालून जाईल प्रेक्षकांना.

धनि, धाग्याचा विषय सिनेमात दाखवले जाणारे स्टॉकिंग हे लीगल अ‍ॅक्टिविटी असल्यासारखे दाखवणे हा आहे ना?
की स्टॉकिंगची दृष्येच नको आहेत? कारण बिन्डोक लोक त्यांचे अनुकरण करतात.

मला वाटतं पहिलं कारण आहे आणि दुसरा परिणाम.

मी स्टॉकिंग ची दृष्ये नसण्याच्या बाजूने आहे. पण जर टाकायचीच असतील तर मात्र तो इशारा देणे हा एक पर्याय म्हणून करता येईल असे वाटते.

अंजाम, डर करूनच तर स्ट्रगलरचे सुपरहीरो झाले आहेत.>>
>>>>>

जर शाहरूखचे डर अंजाम हे उदाहरण असतील..
आणि पुढे एका प्रतिसादात धागाकर्त्याची याला सहमती असेल..
तर मला वाटते धागाकर्ता काय मांडायचे आहे याबाबत सुस्पष्ट नाही..

शाहरूख त्या चित्रपटात हिरो दाखवला नसून व्हिलन दाखवला होता...
म्हणजेच असे करणारे हिरो नसून व्हिलन असतात हा स्पष्ट संदेश होता.. आणि तो स्तुत्य होता..

या ऊलट कभी हा कभी ना सारख्या चित्रपटात हिरोईन आपल्यावर नाही तर दुसरयावर प्रेम करतेय हे लक्षात आल्यावर तो जे करतो आणि पिक्चरचा हिरोईन न मिळूनही हिरो बनतो तो एक आदर्श आहे..

शाहरूख हा टिका करायला खूप सॉफ्ट टारगेट आहे. किंवा शाहरूख म्हणजे टीआरपी हे समीकरण आहे. पण माफ करा सुपर्रस्टार असे थिल्लरपणाचे शॉर्टकट मारून बनता आले असते तर शक्ती कपूर किंवा इम्रान हाशमी सुपर्रस्टार झाले नसते Happy

ऋन्मेष भाऊ, मी वरती आधीच म्हटले आहे की कोणीही केलेले स्टॉकींग चुकीचेच आहे. त्यात एका हिरोचे नाव येतच नाही. सगळे एकाच माळेचे मणी.

हो पण ते डर अंजाम उदाहरण चुकलेय. चुकीची उदाहरणे सरसकट घेण्याने आपल्यालाच जो मुद्दा पोहोचवायचा आहे तो व्यवस्थित पोहोचत नाही. सरसकट सर्वांनाच आरोपीच्या पिण्जरयात उभे करण्याऐवजी जे आपल्या चित्रपटातून आणि आपल्या ऑफ स्क्रीन वर्तनातून स्त्रियांबद्दल आणि सहकलाकार अभिनेत्रींबद्दल आदर दाखवतात त्यांचे कौतुकही केले पाहिजे.

मूळात चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असते. पटकथा हिरो नाही लिहीत हे देखील ध्यानात घ्यायला हवे. आपण हिरोला पटकन आरोपीच्या पिंजरयात उभा करतो. पण कोण्या दिग्दर्शकाचे नाव कोणी घेतले नाही ईथे Happy

तू धागा वाचलास काय रे ? तिथे स्पष्टपणे असे म्हटलेले आहे "बॉलिवूडच्या दिग्दर्शकांना कधी कळणार की या सगळ्या रोमँटीक गोष्टी नसून स्टॉकींग आहे."

पण इथे मूळ लेखात कुठेच हा मुद्दा दिसत नाहीये. मला तरी ऑनस्क्रीन स्टॉकींग दाखवण्याबद्दल हा लेख लिहीलेला दिसतोय. फक्त शाहरूखचं नाव (आणि ते ही प्रतिसादांमधे) आलं म्हणून मुद्दा कशाला भरकटवायचा? मला तर तुम्ही म्हणता तशी धागाकर्त्याची सहमतीसुद्धा दिसत नाहीये कुठे. मग? उगाच?

हो शाहरूख, शक्ती कपूर एकाच माळेचे मणी. हाश्मीने कुठे स्टॉक केले म्हणे..? किस करायला कन्सेंट लागतो त्यात स्टॉकिंग कुठे आले.
जरा तुमची स्टॉकिंगची व्याख्या सांगा ऋन्मेषजी.

धागा वाचलेला. पण ते लिहिलेले लक्षात आले नाही. कारण पुरेसे हायलाईट झाले नाही. हायलाईट झाला तो अक्षयकुमार. आणि त्यानुसारच प्रतिसादात धडाधड हिरोंचीच नावे आली.

हिरो लागतोच का चित्रपटात? >>> अजिबातच नाही. पण म्हणून व्हिलनवर कोणी सगळी गाणी चित्रीत करत नाही Happy

एनीवे , शाहरूखची मी स्वतः फॅन आहे. पण मला या धाग्याचा तो विषय नसतानाही तुम्ही त्याची बाजू घेऊन उगाच इथे लढताय असं नक्कीच वाटलं.

ते हीरोची नावे त्यांच्या चुकीचा संदेश देणार्‍या सिनेमांच्या निमित्ताने आली आहेत ज्यात पालेकर, परशापासून, शाहरूख आणि अक्षय हे आले.
तुम्हाला का शाहरूख दिसला फक्त आनि त्याला तुम्ही शक्ती कपूर च्या माळेत ओवून घेतले. एवढा का राग बुवा तुमचा शाहरूख वर?

भारतातले लोक त्यांची 'उच्च' संस्कृती जेव्हा सोडून देतील तेव्हा हे बंद होईल.
पिक्चर मध्ये जे दिसतं ते समाजात असतं, समाजातील लोकांच्या मनात असतं म्हणून दिसतं. हे उलट नाही. पिक्चर मध्ये आहे म्हणून लोकं बिघडतात या मलमपट्टीवर फक्त टाळ्या मिळतात.
जो पर्यंत फेमिनिझम लोकांच्या मनात रुजत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. नुसते पिक्चर स्टॉकिंग सेन्सॉर करून किंवा भरजरी उच्च संस्कृतीचे सिनेमे बनवून काहीही होणार नाही. त्यापेक्षा हे स्टॉकिंग आहे, आणि हे आपल्या पिक्चर मध्ये आहे, आपल्या मनात, आपल्या संस्कृतीत आहे हे मान्य करून पुढे गेलो तर कधीतरी बदलेल.

किस करायला कन्सेंट लागतो >>> हा देखील वादाचा मुद्दा होऊ शकतो Happy

शाहरुख आल्यामुळे माझी रिऍक्शन >>> लो , गयी भैस पानी मे Happy Happy
प्रेरणा स्रोत : इति रूपचंद फ्रॉम मिस्टर इंडिया Happy

पिक्चर चांगले संदेश द्यायला नसतात या मताचा मी आहे.
कोणाला द्यायचे असतील तर जरूर द्यावे पण चांगला पिक्चर असायला त्याने चांगले संदेश द्यावे असं मला वाटत नाही.

रमड,
शाहरूख हा केवळ माझा आवडता कलाकारच नाही तर माझा आदर्श, माझा आयकॉन, माझा श्रद्धास्थान आहे. त्याबद्दल काही चुकीचे म्हटले गेले की मला त्यावर प्रतिवाद करावाच लागतो. जर डर अंजाम अशी चुकीची उदाहरणे देत शाहरूखने आपल्या चित्रपटातून स्टॉकिंगला प्रमोट केले असा आरोप होत असेल आणि त्या अनुषंगाने धनि देखील पटकन असे म्हणत असतील.. की क्रिपीपणा तो क्रिपीपणाच असतो मग तो शारूख नी केलेला काय की अक्षय कुमार ने केलेला... तर ते चूक आहे. धाग्याकर्त्याने स्वता याबबत क्लीअर असावे अशी अपेक्षा होती ईतकेच.

माझ्यामते मूळ मुद्दा असा असावा की असे स्टॉकिंग करणे हे चित्रपटात हिरोगिरी म्हणून दाखवणे चूक आहे. त्याचे उदात्तीकरण होत असेल तर ते चूक आहे. ते जर डर वा अंजाम सारखे निगेटीव्ह कॅरेक्टर करत असेल तर माझ्यामते उलट हा चांगलाच संदेश आहे. जिथे तुम्ही शाहरूखचे कौतुक करायला हवे तिथे तुम्ही त्याला सायको हिरो वगैरे हिणवून त्याचा अपमान करत आहात Happy

पिक्चर चांगले संदेश द्यायला नसतात या मताचा मी आहे. >> मग जर पिक्चर मधून संदेश जातच असेल तर स्टॉकिंग चांगले आहे असा संदेश त्यातून जाणे योग्य आहे असे तुला वाटते आहे का ?

माझेही म्हणणे नाही की पिक्चरांनी काही संदेश द्यायलाच हवेत असे काही नाही , पण त्यातून जातच असतील तर ते चांगले जावेत असे मला वाटते.

Pages