रोज जाता येता शाळा पाहतो. तीन मजली इमारत. विटांच्या खोल्या नाहीत तर साक्षात विद्येचे मंदिर. त्या मंदिरात घंटा देखील आणि रोज प्रार्थना देखील होते. सहज त्या दिवशी बाहेरच्या खिडकीतून आंत डोकावले. एक साथ नमस्ते गलका ऐकू आला.... नव्हे माझा मलाच भास झाला. सभोवताली भिंतीचे कुंपण आणि सुगंधी फुलांच्या बगीच्यात ताठ मानेने उभी असलेली माझी शाळा.ज्ञानाचं बीजारोपण करणारा फळा थकला होता. आवाज करणारी खिळखिळी बाकं शांतपणे भिरभिरत माझ्याकडे पाहत विचारती झाली, ओळखलं का आम्हाला....! भूतकाळातले ते क्षण आठवले. निरागस, अल्लड, अबोल बालपण... आयुष्यातील स्वप्नवत काळ.
वळूनी मागे मी बघता
शल्य बोचते मनाला
एक वेडा वाट चालला
एक वेडा वाहात चालला
वेळ दिसे काट्यावरी
कधी ना परतणारी
वाट पाहून कोमेजून गेली
वाटेवर फुललेली फुले सारी
शिंकण्यात पण झाला गुलाम तू
धरे नित्य हाती रुमाल तू
आठवतेय का ती शाळकरी शिंक तुला ?
खळाळून बाहेर पडलेला शेमबुड पिवळा
ताप खोकला सर्दी पडसे
सर्वाचीच काढली होती तू पिसे
ठेच लागता लावे माती
हसता हसता जोडे नाती
त्या नात्यांचे भान विसरला
जसा जसा कमावता झाला
धुंडाळ नव्या वाटा पुन्हा नव्याने
त्याने पत्र लिहायला सुरुवात केली त्याला तीच नाव नव्हतं माहीत पण त्याने तिला फुलपाखरू असं नाव दिले आणि पत्राला सुरुवात केली.
मी डेलावेअर मध्ये शीफ्ट होतीये.. पण मला अजुन चांगले रेटींग असलेली शाळा मिळाली नाही ... कोणी सुचवु शकेल का प्लीज. asap
विनिता :- काय रे महेश? काय झाल!? असा उदास का झालास? आज तर आपला रीझल्ट आहे ना, मंग असा काॅलेज च्या बाहेर का बसलायस? घेतला का रीझल्ट?
महेश :-..................
विनिता :- अरे बोल ना काहीतरी... काय झाल? एखादा विषय राहिला का? राहिला असेल तर काय होईल... पुढच्या सेम ला परत एक्झाम दे, निघेल पुढच्या वेळी.
महेश :- तुला काय गं.... तु आहेस आॅल क्लियर......
बदल
रात्र सरून दिवस उजाडला. सूर्याची किरणे हळूहळू धरतीवर पडू लागली. शेतकरी बाया बापडे भाकरी कोरड्यास बांधून घेऊन शेतीच्या कामासाठी गावकुसाबाहेर रवाना झाले. गावातली नोकरदार माणसं नोकरीचं ठिकाण जवळ करू लागली. संथ गतीने जनावरांनी गोठ्यातून बाहेर येऊन चाऱ्याच्या शोधार्थ आपला रस्ता धरला. घराघरात बायांची स्वयंपाकाची लगबग सुरू होती. लहान मुलं मुली शाळेचा रस्ता कापत होती. गावात तशी सर्वांचीच धावाधाव सुरू होती. एकटा लख्या बिचारा अजूनही अंथरुणात लोळत पडला होता. त्याला ना स्वतःची काळजी ना समाजाची.
नमस्कार माबोकरांनो! किती दिवसांपासून मी आजच्या दिवसाची वाट पाहत होते, तो आजचा दिवस उजाडलाच. काहीशी हुरहुर, उत्साह मनात घेऊनच आजच्या दिवसाची तयारी मी केली. सार्या गोड कटू आठवणींचं गाठोडं घेऊन पुढे जायचंय. आयुष्याचं एक पान संपल्यातच जमा झालंय. हे पान म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात नकळत्या वयात येणारं नि नकळतच निघून जाणारं शालेय जीवन. होय, यंदा मी दहावीत आहे. शेवटचं शाळेचं वर्ष. आज आमच्या शाळेचा निरोपसमारंभ पार पडला . आज माझ्या खूशीचं कारण होतं की शाळेला आमच्या वर्गातर्फे मी शाळेवर केलेल्या कवितेची फ्रेम एक आठवण म्हणून देणार होतो. हे आम्हाला सर्प्राईज द्यायचं होतं शाळेला.
पुण्या जवळच्या होस्टेल school ची माहिती हवी आहे