निरोप - स्वानुभव

Submitted by द्वादशांगुला on 23 February, 2018 - 10:36

नमस्कार माबोकरांनो! किती दिवसांपासून मी आजच्या दिवसाची वाट पाहत होते, तो आजचा दिवस उजाडलाच. काहीशी हुरहुर, उत्साह मनात घेऊनच आजच्या दिवसाची तयारी मी केली. सार्या गोड कटू आठवणींचं गाठोडं घेऊन पुढे जायचंय. आयुष्याचं एक पान संपल्यातच जमा झालंय. हे पान म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात नकळत्या वयात येणारं नि नकळतच निघून जाणारं शालेय जीवन. होय, यंदा मी दहावीत आहे. शेवटचं शाळेचं वर्ष. आज आमच्या शाळेचा निरोपसमारंभ पार पडला . आज माझ्या खूशीचं कारण होतं की शाळेला आमच्या वर्गातर्फे मी शाळेवर केलेल्या कवितेची फ्रेम एक आठवण म्हणून देणार होतो. हे आम्हाला सर्प्राईज द्यायचं होतं शाळेला. कुठल्या शिक्षकांना हे माहीत नव्हतं. वर आम्ही काही भाषणही देणार होतो. मी थोड्या जड मनाने, थोड्या उत्साहात ठीक साडेतीनला शाळा गाठली.

आणि पुढे जे घडलं ते अविश्वसनीय, सुखद धक्का देणारं होतं. मी शाळेत प्रवेश केला, अन् पाहते तर काय , माझीच कविता सुवाच्च अक्षरात शाळेच्या मुखदर्शनी लावलेली होती. अन् खाली माझं नाव.....! सुखद धक्का होता तो माझ्यासाठी. जणू तरंगतच पायर्या चढून वर गेले नि आमच्या मुख्याध्यापिका भेटल्या. त्या हसत म्हणाल्या," बघ तुम्ही देणार होतात ना शाळेला सर्प्राईज, आम्हीच दिलं तुम्हाला." आयुष्यातलं मोठ्ठं सर्प्राईज आहे ते माझ्यासाठी. आयुष्यात कायम लक्षात राहिल असं.

मग भाषणाचे सोपस्कार पार पडले. खुद्द शाळेच्या संचालकांनीही माझं कौतुक केलं. करियर गाईडन्सचं लेक्चर झालं, नि हा औपचारिक सोहळा बघता बघता पार पडला. मिठाईने तोंड गोड करून शाळेला कायमचा निरोप दिला. किती पटकन संपतो ना वेळ....

पण मी हे माबोकरांना का सांगतेय, तर नकळत सापडलेल्या मायबोलीशी थोड्याच वेळात अनोखं नातं जोडलं गेलंय. लेखनातल्या चूका थोड्या थोड्या समजायला लागल्यात. चूका दुरूस्त करणारे नि मनापासून प्रतिसाद देणारे सख्ख्या नातलगांसारखे माबोकर मिळालेत. आतापर्यंत शाळेने माझ्यातल्या लेखनाच्या सुप्त गुणांना वाव दिला, नि म्हणून इथे लिहू शकले. अशा या शाळेबद्दल माबोवर लिहिलं नसतं, तर पापच लागलं असतं मला. नि माबोवर हे शेअर करावसं वाटलं, म्हणून रखडलेले हे दोन शब्द.

आता म्हणाल ही दहावीची मुलगी तोंडावर परीक्षा आलीय नि लिहीत काय बसलीय. चार तास रखडून दोन पानं अभ्यास करण्यापेक्षा मला त्यातल्या अर्ध्या तासात काहीतरी लिहून मन प्रसन्न झाल्यावर उरलेल्या साडेतीन तासांत दहा पानं अभ्यास करायला आवडतो. तरी परीक्षा पाच दिवसांवर आलीय. अभ्यास तर हवाच ना. चला , शाळेला कायमचा नि माबोला तूर्तास तरी महीनाभर निरोप. पुन्हा भेटू २२ मार्चनंतर, माझे पेपर आटोपल्यावर. सुट्टीत भरपूर लिहीन. आत्तातरी टाटा........... Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे वा....
दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा...!!!

दहावी... आईला !
शुभेच्छा... आणि कविता प्लीज Happy

सर्वांना खूप खूप धन्यवाद. Happy Happy

शुभेच्छा... मराठीत तर चांगले मार्क्स मिळतीलच यात शंका नाही ☺️>> च्रप्स, हं धन्यवाद. १ तारखेला पेपर आहे मराठीचा.

अरे व्वा! छानच आहे कविता!
तुला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!
अलिबागची थरवळ कन्याशाळा मला माहीत आहे. माझी एक मैत्रीण होती त्या शाळेत! तुझी शाळा अलिबागमध्ये आहे की अलिबाग तालुक्यात?

मस्तच ग जुईले!
तुला दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा!
तुझ्या सुट्टीतील लिखाणाच्या प्रतिक्षेत!
तोपर्यंत तुझे आत्तापर्यंत चे लेखन वाचते.

तुझ्यासारखी लहान मुलं (इथल्या बऱ्याच मेंबरांच्या मानाने तू खुप लहान आहेस) लिहिती झालेली बघून खुप छान वाटतं!

खूप छान! तुझे लेखन आणि विचार वाचून इतकी लहान आहेस माहीत नव्हतं.
परीक्षेसाठी आणि सर्व भावी माईलस्टोन साठी शुभेच्छा!

तुझे लेखन आणि विचार वाचून इतकी लहान आहेस माहीत नव्हतं.>>+१

जुई, छान आहे कविता !

रच्चाकने, आपल्या लेखनावर प्रतिसाद देत असताना 'द्वादशांगुला' लिहायला खुप वेळ लागायचा ! Proud
आता सोप्पं झालं म्हणायला हरकत नाही. Happy
लिहीत रहा. पुलेशु !

जुई, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या एव्हढी लहान मुलगी इथे लिहीते हे पाहून खूपच कौतुक वाटले. लिखाणाची ही आवड जप. कुठेही गेलीस तरी माय मराठीची कास सोडून नकोस. मराठीचा पेपर तर उत्तमच जाणार, बाकीचेही छानच जातील.
सुट्टीत मग खूप खूप वाच, लिही.

जुई, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या एव्हढी लहान मुलगी इथे लिहीते हे पाहून खूपच कौतुक वाटले. लिखाणाची ही आवड जप. कुठेही गेलीस तरी माय मराठीची कास सोडून नकोस. मराठीचा पेपर तर उत्तमच जाणार, बाकीचेही छानच जातील.
सुट्टीत मग खूप खूप वाच, लिही.>>>>+१२३४५६७८९

अनेक शुभेच्छा गं तुला. सुट्टीत परत ये. आंगो, धन्यवाद माझ्या मनातले इथे लिहील्याबद्दल.

जाई, शुभेच्छा!
जुई, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या एव्हढी लहान मुलगी इथे लिहीते हे पाहून खूपच कौतुक वाटले. लिखाणाची ही आवड जप. कुठेही गेलीस तरी माय मराठीची कास सोडून नकोस. मराठीचा पेपर तर उत्तमच जाणार, बाकीचेही छानच जातील.
सुट्टीत मग खूप खूप वाच, लिही.>>>>+१२३४५६७८९

अनेक शुभेच्छा गं तुला. सुट्टीत परत ये. आंगो, धन्यवाद माझ्या मनातले इथे लिहील्याबद्दल.>>>>>+1

तुमचे आयडीनाम वाचून प्रौढ आयडी असावा असे वाटलेलं .पण तू अंदाज चुकवलास Lol

१० वी च्या परीक्षेच्या अनेकानेक शुभेच्छा . ऑल द बेस्ट

मलाही तुझा आयडी बघून वाटले नव्हते की तू इतकी लहान असशील, मस्तच एकदम

छान लिहीतेस, अशीच लिहीत रहा.

खूप खूप शुभेच्छा Happy

दहावीच्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा!
बाकी इतकी छोटुकली माबोकर आहे हे वाचून नवल* समाधान वाटले.

Pages