शाळा

व्हॉट्सअप वरचा एक ग्रुप कॉल

Submitted by दिनेशG on 11 June, 2021 - 16:08

आज माझ्या भावा बहिणींच्या वय वर्षे सात ते दहा वयोगटातील मुलांना व्हाट्सएप व्हिडीओ कॉल वर एकत्र करून एक खेळ खेळलो. मी त्यांना वेगवेगळे टास्क द्यायचे आणि त्यांनी ते करून दाखवायचे. काही टास्क असे की जो पहिला करून दाखवेल त्याला एक पॉईंट तर काही टास्क असे की जो जो पूर्ण करून दाखवेल त्या सर्वांना एक एक पॉईंट.

घरात बसून बसून कंटाळलेल्या मुलांनी पण त्यात उत्साहाने भाग घेतला आणि माझ्यातल्या शिक्षकाला एक अनुभव मिळाला.

विषय: 
शब्दखुणा: 

विविध बोर्ड - SSC स्टेट बोर्ड / ICSE / CBSE

Submitted by हेमंतसुरेशवाघे on 3 March, 2021 - 05:04

१) मी २००८ - २००९ ला मुलीसाठी नवी मुंबईत शाळा शोधत होतो
एक ठरले होते कि मराठी माध्यमात घालायचे नाही - त्याचे प्रॉब्लेम मी आणि बायकोने पूर्ण अनुभवले होते आणि त्यामुळे हे तर नक्की होते .
आता इंग्लिश माध्यम हे बाकी ठिकाणी नवीन असले तरी मी मुंबईत ते पण पश्चिम उपनगरात राहिलो होतो आणि त्यामुळे आसपासचे सर्व इंग्लिश माध्यमात होते त्यामुळे त्याचा फायदा पाहिला होता

ऑनलाइन शाळेची फि भरण्याबद्दल

Submitted by mrunali.samad on 12 September, 2020 - 13:10

सरकारने पाचव्या ईयत्तेपर्यंत ऑनलाइन क्लासेस घेऊ नयेत, असे सांगितले असतानाही, खाजगी शाळांचे
ऑनलाइन क्लासेस सर्रास सुरू आहेत. अगदी नर्सरी चे सुध्दा.
माझा मुलगा तिसरीत आहे.
पाल्य शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरत नसतानाही शाळा पुर्ण फि भरा असं म्हणत आहे.
ऑनलाइन क्लासेस लहान मुलांसाठी वेळेचा अपव्यय आहे.इतकी लहान मुले ऑनलाइन शाळेतून खरच काही शिकताएत का?
इतकी फि भरणे गरजेचे आहे का?शाळा फि मधे कनसेशन द्यायलाही तयार नाहीए.
तुमच्या inputs आणि मतांचा आदर आहे.

विषय: 

शाळा

Submitted by दवबिंदू on 5 September, 2020 - 04:07

शाळा

देवी सरस्वतीचे...
मंदिर असते...
शाळा!

जीवनी ज्ञानार्जनाचा...
श्रीगणेशा करते...
शाळा!

नियमांची आखून चौकट...
शिस्त लावते...
शाळा!

सुभाषितांतील देऊन शिकवण...
संस्कार करते...
शाळा!

राष्ट्रगीत अन् झेंडावंदन...
देशभक्ती मनीची दृढ करते...
शाळा!

कधी कट्टी, कधी बट्टी...
सवंगड्यांचा मेळा असते...
शाळा!

करिता दंगामस्ती... खोड्या...
शिक्षा जरी करते... सुधारण्याची संधी देते....
शाळा!

गायन, नृत्य... नाटक, चित्रकला...
बीज कलेचे मनी रुजवते...
शाळा!

घरात राहून मुलांचा फिटनेस कसा वाढवावा?

Submitted by मोहिनी१२३ on 6 August, 2020 - 12:55

माझा मुलगा 8 वर्षाचा आहे. मैदानी खेळ, trekking, small runs, सोसायटीत मनसोक्त खेळणे असे त्याचे नेहमीचे उद्योग चालू असतात.
मार्चअखेर पासून बाहेरचे खेळणे एकदम बंद झाले आहे. मध्ये २-३ आठवडे खाली खेळण्याची परवानगी होती. आता परत बंद आहे.
त्याच्या दोरीच्या उड्या मारणे, दोरीला लोंबकाळणे, घरच्या घरी जमेल तितकी मस्ती, उड्या चालू असते.एप्रिल-मे महिन्यात ground चे online camps होते.जून महिन्यात एक दिवसाआड online ground सुरू झाले आहे.
पण नेहमीच्या व्यायामाच्या मानाने हे बरेच कमी आहे.अजुन असे किती दिवस चालेल कल्पना नाही.

मुलांना बीझी ठेवण्याचे लक्ष पर्याय

Submitted by अस्मिता. on 7 April, 2020 - 10:26

नमस्कार मंडळी,
ही यादी अतिच लांब असल्याने रुनी potter या आय डी ने स्वतंत्र धागा काढावा ही विनंती केली, आणखी काही जणांना पण बुकमार्क करणे सोपे होईल म्हणून वेगळा धागा काढला आहे.
सध्या या सगळ्या लिंक्स मोफत उपलब्ध आहेत, नंतर मात्र काही काहीच रहातील. पण पालकांना नंतरही उपयोग होईल.
तुम्हाला ही यापेक्षा वेगळे काही सापडले तर प्रतिसादात शेअर करा. पिलवंडांची काळजी घ्या. Hugs and kisses to your kiddos. Happy .

शब्दखुणा: 

आज शनिवार आहे शनिवार!-भाग १

Submitted by amdandekar on 1 March, 2020 - 16:48

माझ्या मताप्रमाणे शिनिवार हा वारांचा राजा आहे. याचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी मन आनंदून जातं. त्यात सुट्टीची मजा आहे, काम आणि कर्तव्य पार पाडल्याचं समाधानही आहे. आठवड्यात बऱ्याच तुंबलेल्या कामाचं ओझं हा शिनिवार एखाद्या कुटुंबवत्सल घरच्या कर्त्या पुरुषाप्रमाणे आनंदाने आपल्या खांद्यावर उचलतो आणि कर्तव्य कठोराप्रमाणे पार पाडतो. याची दुपार रेंगाळलेली असली तरीही त्यात रविवारची हुरहूर नाही, मरगळ तर नाहीच नाही, आनंद आहे फक्त आनंद. शनिवारची चाहूल लागते ती गुरुवारपासून, शुक्रवार येतो तो शनिवारचा आनंद घेऊनच. शुक्रवार अर्धा संपला की शनिवारचा उत्सव सुरु होतो.

बहिण भाऊ

Submitted by Dr Raju Kasambe on 9 February, 2020 - 07:44

बहिण भाऊ

“आम्ही तिला कशाला खेळू देऊ? तिला मुलींसोबत खेळ म्हणा”. बंटी त्याच्या बहिणीला मिंटीला आणि आईला म्हणाला.

“मिंटी तुझ्यासोबत आली तर आम्ही तुझ्यासोबत खेळणार नाही”. बंटीचे मित्र त्याला म्हणाले.

शब्दखुणा: 

झाशीची राणी आणि शाबासकी

Submitted by मोहना on 23 October, 2019 - 07:32

"या आपल्या झाशीच्या राणी." जाधवसरांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या म्हणून सगळ्या वर्गानेही वाजवल्या. गुरु सांगतील ती पूर्वदिशा त्यामुळे टाळ्या का वाजवतोय ते कळलं नाही तरी आम्ही टाळ्या वाजवत राहिलो. सरांनी खूण करून मला बोलावलं. अतीव आनंदाने मी उभी राहिले. बाकड्यामधून बाहेर आले. बाकड्यांच्या मधल्या अरुंद गल्लीतून वाट काढत किल्ला लढवल्याच्याच आवेशात सरांजवळ पोचले. मागचा फळा म्हणजे किल्ला असल्याचा भास मला होत होता.

Pages

Subscribe to RSS - शाळा