शिक्षक म्हणून सोसताना
मी आहे समाज शिक्षक
मला आहे राष्ट्र शिल्पकार
मी पाळतो आदर्श तत्वे
मी स्वछता अभियान घटक
मी कुटुंब नियोजन घटक
निवडणूक कामात सतत मग्न
मी आहे मुलाचा आचारी वाढपी
मी ठेवतो शासनाच्या सर्व नोंदी
चोवीस तास मी आहे सेवेकरी
मी करतो मतदारांची नोंदणी
संचालक घेतात दरवर्षी खंडणी
प्रशिक्षणाची कटकट जन्मोजन्मी
ऑनलाईन माहितीची नवीन खेळी
बदलती धोरण अन गावचं राजकारण
पेन्शन बंद धोरण अन बायकोची कटकट
काल संध्याकाळी एका अपॉइंटमेंट नंतर नवऱ्याची वाट बघावी लागणार होती. मग शेजारीच असलेल्या मेडिकल स्टोअर मध्ये गेले. इथले मेडिकल स्टोअर म्हणजे अख्खा बिग बझारच म्हटले पाहिजे. कॉस्मेटिकपासून दूध,ब्रेड अंडी आणि शिवाय औषधे असं सर्वच मिळतं. असो. त्या दुकानात गेले तर व्हॅलण्टाइन डे चे मोठाले बुके समोरच मांडलेले होते. त्याच्यापलीकडे मग ग्रीटिंग्ज वगैरे. आता या सगळ्या वस्तूत मन रमत नाही. त्या पलीकडे होती ती स्टेशनरी. आजपर्यंत डॉलर स्टोअर पासून आर्टस् स्टोअर पर्यंत सर्व ठिकाणाहून सर्व प्रकारचे पेन, पेन्सिल, रंग, कॅनवास उचलून आणल्या आहेत.
माबोची सर्च सुविधा सध्या काम करत नसल्याने आणि मुलांचे संगोपन/ माहिती हवी आहे या विषयातली असंख्य पाने चाळण्यासाठी वेळ आणि संयम नसल्याने हा नवीन धागा.
सध्या आमची गाडी आयुष्यातली जन्म, शिक्षण, नोकरी, लग्न अशी महत्वाची स्टेशन पार करून मुलांच्या शाळा या अतिमहत्त्वाच्या स्टेशन वर अडकली आहे. बाकी सर्व पालकांप्रमाणे आम्ही पण ही शाळा की ती शाळा या विषयावर तासंतास शिक्षणतज्ञ असल्यासारखे निष्फळ चर्चा करत आहोत.

सविनय नमस्कार,
मातृभाषा शिक्षणाचं जगभर निर्विवाद सिद्ध झालेलं महत्व, महाराष्ट्रातील मराठी शाळांचं संवर्धन, पालकांच्या मनातील समज-गैरसमज, शासनाची धोरणं, शिक्षकांची तळमळ आणि कोंडी, पालकांची संभ्रमावस्था, मुलांवरचा ताण, इंग्रजी भाषा व इंग्रजी माध्यम अशा अनेक विषयांना धरून, मोठ्या प्रमाणावर पालकांचं, शिक्षकांचं आणि शाळांचंही एक महासंमेलन मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेलं आहे. २३-२४ डिसेंबर २०१७ रोजी, मुंबई येथे हे ऐतिहासिक महासंमेलन होईल.
.

.
मला पुन्हा लहान व्हायचंय
पाटी पेन्सिल आणि दप्तर मिळवाचंय
गेट समोरून बोरकुटही खायचंय
आज मला पुन्हा लहान व्हायचंय
अबादुबी आणि विषामृत खेळायचंय
पुन्हा एकदा डब्बा ऐस्पैस मांडायचंय
सुरपारंब्याचे मस्त झोके घ्यायचंय
मला खरंच पुन्हा लहान व्हायचंय
काल रात्री झोपताना, पडल्यावर स्वनिकची चुळबुळ चालू होती. म्हटलं,"झोप आता सकाळी उठत नाहीस". काही वेळाने म्हणाला,"मी ते शाळेच्या लायब्ररीचं पुस्तक परत दिलं नाही तर मला दुसरं घेता येणार नाही. ". म्हटलं,"मग?". म्हणे,"मग फक्त तिथेच वाचून परत यावं लागतं. घरी आणायला मिळत नाही." त्याला विचारलं,"तू घरी आणलं होतंस का?". आम्हाला तर माहीतही नव्हतं. आम्ही दोघेही त्याला सांगू लागलो की शाळेचं पुस्तक घरी आणायचं नाही, तिथेच वाचून परत करायचं. आता त्याला कारण म्हणजे आमचे आधीचे अनुभव. मुलीने मागच्या वर्षी असंच एक पुस्तक आणलं होतं, सहा महिन्यांनी ने घरात सापडलं.