मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

महाराष्ट्राचे राज्य फुल ताम्हण

Submitted by मंगलाताई on 19 July, 2020 - 11:03

download.jpg
देशी फुलझाडांच्या मालिकेतील सहावे फुल ताम्हण.
एक मे महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा करतात . विधान भवनावर रोषणाई करतात . महाराष्ट्रात सर्वत्र चैतन्यमय वातावरण आढळते अशावेळी ऐन दुपारच्या रणरणत्या उन्हात आपले स्वागत करायला रस्त्याच्या दुतर्फा ताम्हण आपली जांभळी तुरे घेऊन आपल्याला खुणावत असतो . एक मे महाराष्ट्र दिनाच्या काळात तो बहरून येतो. तो आहे आपला ताम्हण , म्हणजेच महाराष्ट्राचे राज्य फुल.

न कळलेली तू!

Submitted by ईश्वर माळी on 14 July, 2020 - 03:35

थोड़ी वेडी
थोड़ी शहाणी
थोड़ी बावळट
थोड़ी रागिट
थोड़ी हसरी
थोड़ी लाजरी
थोड़ी हट्टी
थोड़ी नासमझ
थोड़ी अल्लड़
थोड़ी प्रेमळ
वेगळे वेगळे तुझे रंग असे
कळे ना मजला त्या रंगात मी न्हाऊन निघु कसे
प्रश्नांच्या सावलीखाली दिवस जातात
गुंतागुंतीचे उत्तरे त्यात मनात घर करून बसतात
उजळून टाक अंधारलेल्या मनाला
एवढी एकच अपेक्षा या भरकटलेल्या जीवाला

उपजते आहे

Submitted by रोहितकुलकर्णी on 13 July, 2020 - 05:42

पुन्हा भेटूया पहाट म्हणते आहे
दवबिंदूंशी किंचित रडते आहे

विचार सिग्नल तोडत नव्हते काही
आठवणींशी गाडी अडते आहे

पंखांना आभाळ खुणावत होते
पायामध्ये माती रुतते आहे

मी नाळेच्या मुळास बघतो आहे
नक्की नाते कुठे जखडते आहे

खाचा पडल्या भिंतीला धरणाच्या
उद्वेगाने लाट धडकते आहे

किरकिर करते आहे दार घराचे
बीजगरीशी बहुदा लढते आहे

दे देवा दमदार जराशी दुःखे
आतडी भुकेने चळवळ करते आहे

तारेवरती पक्षी बसला आहे
फांदी व्याकुळ होऊन रडते आहे

व्रत वैकल्ये उपास दिवसा करतो
संध्याकाळी मटण शिजते आहे

जर तर

Submitted by रोहितकुलकर्णी on 7 July, 2020 - 13:51

केवढा आक्षेप घेतो तू कवितेवर
काय होते जर यमक जुळलेच नाहीतर

ज्यात आहे जीव माझा पोपटाला त्या
पिंजरा दाखव पुन्हा उडलाच नाही जर

गावचा सरपंच आहे देवमाणूस ना?
टाकतो वाळीत वस्ती कोण वेशीवर!

काल मेली जी तहानेने, तिच्या नावे
पाणपोई बांधलेली आज वाटेवर

वेगळे होते तुझ्या माझ्या मते नाते
राहिले होते तुझ्या माझ्यामध्ये अंतर

तू हवे तितके मला फटकार आयुष्या
जाड आहे चामडी संपूर्ण अंगावर

देवळाच्या पायरीवर भूक नतमस्तक
मी पुन्हा नास्तिक झालो हे बघितल्यावर

जमले नाही

Submitted by रोहितकुलकर्णी on 6 July, 2020 - 14:18

मिठासारखे पाण्यामध्ये मिसळून जाणे कधीच जमले नाही
वादळ होतो तसाच जगलो शमून जाणे कधीच जमले नाही

उधाणलेल्या लाटा जेव्हा धडकत होत्या नावेच्या पायाशी
दीपस्तंभ बनलो मी जागा सोडून जाणे कधीच जमले नाही

पुतळ्यांच्या दर्शनास जेव्हा लांबलचकशी रांग लागली होती
भाव भक्तीच्या आशेपायी झुकून जाणे कधीच जमले नाही

रस्ता नाही, प्रकाश नाही, कोणी सोबत नव्हते माझ्या जेव्हा
डोळस होतो वाटेवर अडखळून जाणे कधीच जमले नाही

अश्रूंना मी द्यूतामध्ये जिंकून गेलो, दास बनवले त्यांना
व्यथा जरी जहरी झाल्या पण, रडून जाणे कधीच जमले नाही

केवढी

Submitted by रोहितकुलकर्णी on 6 July, 2020 - 14:16

हट्टी आहे गझल केवढी
पण शेराची मजल केवढी

स्वच्छ मनाने लिहित गेलो
कविता बनली तरल केवढी

आत्मीयतेच्या आधाराची
हुबेहूब ही नकल केवढी

ओठावर स्मितहास्य तरीपण
मनात आहे गरळ केवढी

तुझ्या मुखावर इर्षेची ही
धुसफूसणारी अनल केवढी

सुचवून गेली चारच ओळी
प्रतिभशक्ती चपळ केवढी

खरेपणाची व्याख्या आहे
सोप्पी साधी सरळ केवढी

नाही!!

Submitted by रोहितकुलकर्णी on 6 July, 2020 - 14:15

अडखळण्याचा अभाव नाही
पण पडण्याचा दबाव नाही

निघून जा तू घेऊन पाऊस
भिजणे माझा स्वभाव नाही

गाऊन थकलेलो होतो मी
सुरावटींचा बनाव नाही

रुक्षपणाची शर्यत आहे
गलबललो तर टिकाव नाही

खोद मुळाशी माती अलगद
उन्मळण्याचा सराव नाही

विचार घेऊन माघारी जा
मना तुझ्याशी लगाव नाही

माझे!!

Submitted by रोहितकुलकर्णी on 6 July, 2020 - 14:14

रुचले नाही लढणे माझे?
पण पचले अवघडणे माझे?

कोसळताना वीज म्हणाली
सांभाळून घ्या पडणे माझे

रुसतो का तू चिडल्यावर मी
ऐक एकदा म्हणणे माझे

रक्ता! आवर धाव जराशी
जाईल जड धडधडणे माझे

बीजगरीला दार म्हणाले
खुपते का रे अडणे माझे!

डोंगर चढताना दमलो मी
शिणले बघ अडखळणे माझे

मिसळून जा अत्तरासवे तू
दरवळेल अन उटणे माझे

मातीच्या मडक्यात दिसू दे
पक्के आता घडणे माझे

अग्निपरीक्षा देते रामा
व्यर्थ न होवो जळणे माझे

पंचमहाभूतात हरवलो
सुंदर झाले जगणे माझे

थांबशील का माझ्यासाठी

Submitted by Amol shivaji Rasal on 29 June, 2020 - 01:12

उशीर झाला आहे फार पण थांबशील का माझ्यासाठी
पाऊलवाटा रेंघाळशील का प्रतीक्षेत तू माझ्यासाठी..?

कितीतरी तुडवलो गेलो भावनेंच्या त्या ओझ्याखाली
हात धरुनी उठवशील अन कडकशील का माझ्यासाठी..

रेल्वे सारखा धावत आहे मज माहीत नाही ब्रेक जरी
लाल ध्वजाचे रूप घेऊनी फडकशील का माझ्यासाठी..?

खट्याळ हसतेस किती बिलगतेस झाले नयन हे फितुर जरी
स्वच्छ पांढरे ह्रदय घेऊनी धडकशील का माझ्यासाठी..?

पहाटेच्या त्या स्वप्नामध्ये मृत्यूचे तांडव बघितले
मृत्यूयात्रेत येतांना रडशील का तू माझ्यासाठी ?

Pages

Subscribe to RSS - मायबोली