मायबोली app स्लो चालते आहे का?
मला गेल्या 2 दिवसांपासून मायबोली app (Android device वरून) access करायला खूप वेळ लागत आहे. काल रात्री तर नवीन लेखनाचं पण उघडायला 10 मिनिटं लागली.
हा problem सगळ्यांनाच येतोय का हम स्पेशल है???
मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती
मला गेल्या 2 दिवसांपासून मायबोली app (Android device वरून) access करायला खूप वेळ लागत आहे. काल रात्री तर नवीन लेखनाचं पण उघडायला 10 मिनिटं लागली.
हा problem सगळ्यांनाच येतोय का हम स्पेशल है???
मी मायबोलीवर साधारण एक तप आयडी शिवाय आणि एक तप आयडी सह आहे. मायबोलीशी माझी ओळख माझ्या मेव्हण्याने करून दिली. मला मराठी वाचायला आवडतं असं कळल्यावर त्याने मला सांगितलं "अगं माझ्या मित्राने त्याच्या बायकोसाठी एक साईट सुरू केली आहे. मराठीतून गप्पा मारण्यासाठी. तू पण जा तिकडे, बाबांनाही ने".
मला भारीच कौतुक वाटलं त्याच्या मित्राचं. हल्लीच्या काळात कोण करतो इतकं स्वतःच्या बायकोसाठी!
नवा धागा काढून लिहिण्याइतका जीव या लेखनात नाही, म्हणून हे मी आधी प्रतिसाद म्हणून लिहिलं होतं या उपक्रमाच्या धाग्यावर. (इतकी वर्षं सुप्तावस्थेत असणार्या आयडीच्या लेखनावर काही प्रतिक्रिया येतील असं मला वाटलं नव्हतं. ) पण हे नव्या धाग्यात हलवावं असं तिथे अनेकांनी सुचवलं. त्यामुळे हा नवा धागा काढतेय.
***
मला माबोकर होऊन २१ वर्षे आणि ११ महिने झाले आहेत त्यामुळे 'आमच्यावेळी...' वगैरे सूर आळवत या उपक्रमात हजेरी लावायला मी जामच एलिजिबल आहे.
आज माबोला २५ वर्ष झाली आहेत, त्यानिमित्ताने आठवणींना उजाळा देण्याचा माझा हा एक प्रयत्न.
खूप वर्ष झाली नाहीत इथे येऊन पण सापडल्यापासून हे स्थळ आवडू लागले.
माझ्या आठवणीतली मायबोली या विषयावर यंदा मायबोलीच्या गणेशोत्सवानिमित्त लेख लिहायचा आहे मायबोली २५ वर्षांची झाली , तुझा लेख वाचायला आवडेल असा अगदी सुरवातीला एका माबो मित्रानं मेसेज केला, म्ह्टल अरेच्चा २५ वर्ष झाली ?
पुन्हा एका दिवसानंतर दुस-या एका माबो मित्रानं स्टेट्सला मायबोली गणेशोत्सवाची लिंक पोस्ट केली होती , पुन्हा येऊन बघून गेले, लिहाव वटायला लागलं पण मुहुर्त मिळेना , थोडासा आळस आणि उगाच काहीबाही कारण, तर ते असो, नमन झालं घडाभर तेल पण झालं
"माझ्या बकेट लिस्टचा प्रवास- निरु"
बकेट लिस्ट म्हटल्यानंतर बहुतेक लोकांच्या मनातल्या इच्छा या कळत्या वयामधल्या असतात.
कुठेतरी बकेट लिस्ट हा शब्द ऐकलेला असतो, बर्यापैकी वाढलेल्या वाचनात आलेला असतो…
कुठेतरी, कोणाच्यातरी बकेट लिस्टबद्दल माहिती आलेली असते, तर कधी चित्रपट आलेले, पाहिलेले असतात.
गणपती बाप्पा मोरया!
यावेळच्या उपक्रमातील इतरांनी लिहीलेल्या आठवणी वाचून मलाही माझी माबोवरची गेली १६ वर्षे बरीचशी आठवली.
मी मायबोलीवर आलो ते २००५ साली. इथे अमेरिकेत येउन ४-५ वर्षे झालेली होती. मराठी वाचायला मिळणे खूप अवघड होते. सकाळ, केसरी वगैरेंच्या साइट्स सुरू झाल्या होत्या पण त्यातही खूप वाचनीय फारसे नसे. इथले मित्रमंडळ बरेचसे अमराठी होते आणि जे मराठी होते त्यांच्याशीही गप्पांचे विषय सहसा वेगळे असत. मराठी वाचणे, मराठीतून आवडीच्या विषयांवर गप्पा, चर्चा या बाबतीत काहीतरी मिसिंग आहे असे सतत वाटायचे.