मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

माझे!!

Submitted by रोहितकुलकर्णी on 6 July, 2020 - 14:14

रुचले नाही लढणे माझे?
पण पचले अवघडणे माझे?

कोसळताना वीज म्हणाली
सांभाळून घ्या पडणे माझे

रुसतो का तू चिडल्यावर मी
ऐक एकदा म्हणणे माझे

रक्ता! आवर धाव जराशी
जाईल जड धडधडणे माझे

बीजगरीला दार म्हणाले
खुपते का रे अडणे माझे!

डोंगर चढताना दमलो मी
शिणले बघ अडखळणे माझे

मिसळून जा अत्तरासवे तू
दरवळेल अन उटणे माझे

मातीच्या मडक्यात दिसू दे
पक्के आता घडणे माझे

अग्निपरीक्षा देते रामा
व्यर्थ न होवो जळणे माझे

पंचमहाभूतात हरवलो
सुंदर झाले जगणे माझे

थांबशील का माझ्यासाठी

Submitted by Amol shivaji Rasal on 29 June, 2020 - 01:12

उशीर झाला आहे फार पण थांबशील का माझ्यासाठी
पाऊलवाटा रेंघाळशील का प्रतीक्षेत तू माझ्यासाठी..?

कितीतरी तुडवलो गेलो भावनेंच्या त्या ओझ्याखाली
हात धरुनी उठवशील अन कडकशील का माझ्यासाठी..

रेल्वे सारखा धावत आहे मज माहीत नाही ब्रेक जरी
लाल ध्वजाचे रूप घेऊनी फडकशील का माझ्यासाठी..?

खट्याळ हसतेस किती बिलगतेस झाले नयन हे फितुर जरी
स्वच्छ पांढरे ह्रदय घेऊनी धडकशील का माझ्यासाठी..?

पहाटेच्या त्या स्वप्नामध्ये मृत्यूचे तांडव बघितले
मृत्यूयात्रेत येतांना रडशील का तू माझ्यासाठी ?

स्वप्न

Submitted by sb sardar on 19 June, 2020 - 02:48

मिटता पापण्या दिसते मज स्वप्न काही. इवल्याश्या घरट्यात तू आणि मी बाकी कोणीच नाही. डोळ्यात तुझ्या ग हरवून का मी गेलो? हे स्वप्न आहे माझे हे विसरून का मी गेलो? उघड्या डोळ्यांनीहि भास तुझा जाणवला. दिसता मज तू जीव हा वेडावला.

तुझी एक बहिण आहे हे मात्र विसरू नको

Submitted by मी अनोळखी on 12 June, 2020 - 05:52

कालची रात्र सरता सरत नव्हती
कदाचित तुझ्यावर कविता बनत होती

मागच्या जन्माची पुण्याई वा असतील भाग्य थोर
माझा भाऊ म्हणून लाभला आम्हास नंदकिशोर

कधी लाभेल तुला सुखाचा सागर तर कधी दुःखाच्या लाटा
मी सदैव पाठीशी असेन घेऊन सुखी शिदोर्यांच्या वाटा

तुझं आयुष्य असुदेत सदैव फुलां प्रमाणे बहरणारं
सोबत असेन मी बनून रोपट संकटाना मात देणारं

Future च plannig करताना मागे वळून पाहू नको
हा पण तुझी एक बहिण आहे हे मात्र कधी विसरू नको

विषय: 
शब्दखुणा: 

चारोळी

Submitted by मी अनोळखी on 12 June, 2020 - 05:48

पावसानं सारं रान भिजून जावं
असच काहीतरी तुझं नि माझं व्हावं
थेंब मिसळतो जसा मातीत
तस तू ही माझ्यात मिसळून एकजीव व्हावं...

विषय: 
शब्दखुणा: 

©संततधार - भाग २

Submitted by अज्ञातवासी on 28 May, 2020 - 11:30

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

पुढील भाग भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवार, दिनांक ३१ मे रोजी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.

भाग १ - https://www.maayboli.com/node/74824

विषय: 

भयाण शृंखला

Submitted by मंगेश विर्धे on 10 May, 2020 - 07:29

धावत्या भेसूर क्षणांची हीच बात आहे
दिवस खावया उठतो अन् भुकेली चांदरात आहे

दिसतात भयभीत सगळे मूर्तीमंत ते चेहरे
अदृश्य उभा शत्रू तयांच्या उंबऱ्यात आहे

अगम्ययोगे वाढणारी तोडले कोण ही शृंखला?
अस्वस्थ पसरली चर्चा समस्त पाखरांत आहे

ताऱ्यास नव्या उद्याच्या गगनी किती धुंडाळले मी
दडून राहिले गुपीत सारे जे निशेच्या उदरात आहे

- मंगेश विर्धे

Pages

Subscribe to RSS - मायबोली