चष्मा

चष्मा

Submitted by मंगलाताई on 27 February, 2023 - 03:18

चष्मा
डोळे तपासून चष्मा घेतला
दूरचं बघाव तर काही दिसेना
दिसत होत्या फक्त इमारती
लोंबकळणार्या वायरी
त्यावर लटकलेले सेट अप बाक्स
एखादी टिव्ही ची डिश एवढच .
बोर झालं दूरचं बघून
मग जरा जवळचं बघाव म्हंटल
जवळून बघितलं
हिरवा रंग पाहिला तर मशिद आठवे
भगवा पाहिला तर मंदिर .
इतरही बरेच रंग बघितले आलटून पालटून .
पण
असेच काहीबाही भास
स्पष्ट काही दिसेनासा.
डॉक्टर बदलले .पुन्हा तेच .
डॉक्टर अहो मला जवळचे वेगळेच रंग दिसतात
दूरचं तर विचारूच नका
द्या पुन्हा चष्मा बदलून .

शब्दखुणा: 

माझे उपनेत्रपुराण (माझे उनेपु)

Submitted by वाट्टेल ते on 10 November, 2020 - 11:19

तुम्ही लहानपणापासून उपनेत्र म्हणजेच चष्मा लावण्याचे भाग्य लाभलेल्या वर्गापैकी असाल तर तुम्हाला ही तुमचीच कथा आहे असे वाटेल. तुम्ही तसे नसाल तर आयुष्यातील एका मोठ्या अनुभवाला पारखे झाला आहात याबद्दल शंका नाही. चष्मा असूनही, तो जाण्यासाठी हिरवळीवर चालणे, गाजराचा रस पिणेपासून Lasik वगैरे भानगडी करून शेवटी स्वतःचे style statement करण्यासाठी branded glasses लावणाऱ्या वर्गातले असाल तर उपनेत्र लावणारा वर्ग तुमच्याकडे दयार्द्र नजरेने बघत आहे असे समजा.

विषय: 
शब्दखुणा: 

चष्मा

Submitted by Asu on 16 August, 2018 - 07:29

चष्मा

चष्मा तुमचा जुनाट झाला
चष्म्याचा अता नंबर बदला

स्पष्ट ना दिसे काही अचूक
सारे काही अंधुक अंधुक

नंबर कायम रहात नसतो
काळासवे बदलत असतो

ऋतु मागुनि ऋतु बदलती
पिढ्या मागुनि पिढ्या सरती

जुने नको ते, टाकून द्यावे
नवे हवे ते, बदलून घ्यावे

जुन्यानव्याचा संगम नवा
आयुष्यात समतोल हवा

नव्या पिढीला घेऊ संगे
अवघे नाचूया एका रंगे

जेवण घरचे जरी रोज हवे
पिझ्झा बर्गरही विष नव्हे

निसर्ग वळतो, काळ ढळतो
आपण का जुन्या घुटमळतो

शब्दखुणा: 

चष्म्याच्या किमती किती खर्‍या किती खोट्या?

Submitted by यक्ष on 8 December, 2017 - 09:42

साधा वाचनाचा चष्मा. फुटला!!
(वर्षापूर्वीच जंगली महाराज रोडवरील प्रख्यात डॉ़क्टरांकडे डोळे तपासून तिथल्याच दुकानातून सुमारे ६५०/- ला (फ्रेम व काचा मिळून) चष्मा करवून घेतला होता. अगदी समाधान कारक होता.)
एका नामांकित कंपनीच्या शो रूम मध्ये १ तासाच्या माहिती कार्यक्रमानंतर व निरनिराळ्या काचांच्या मेनुकार्ड च्या चर्चा सत्रानंतर (फक्त काचा बदलासाठी - फ्रेम जुनीच ठेउन) सुमारे ३ ते ५ ह. एवढे ऑप्श्न्स आले. न घेता निघालो तेंव्हा 'फ्रेम फ्री' देउ असे आमिष दिले.

दुर्दशा चाळिशी

Submitted by दाद on 8 May, 2015 - 03:20

"... राया चला घोड्यावरती बसू.. अहो राया चला..."

सावकाश जेऊन पाठचं आवरणार्‍या आमच्या रायांच्या हातातून ठाणकन पडलेली माझी आवडती कढई अजून आठवते मला...
"अभंगवाणी लावत होतीस ना?" अस विचारत हे बाहेर आले होते. आणि आमचं भांडण बघायला तिकिट काढल्यासारखा लेकही.
"... अभंगवाणीच काढली... कव्हरमधे भलतिच सिडी ठेवलीत तुमच्यापैकी कुणीतरी. याला एक मराठी धड वाचता येत नाही... म्हणून तो किंवा तुम्ही. तुम्ही चष्मा लावला नसणार..." मी तणतणत असताना लेकानं सिडी काढून रफ़टफ़ करीत वाचल.
"आई, अखंडलावणी लिहिलय... नॉन स्टॉप लावणी".
"काहीही बरळू नकोस... आण इकडे"...

डोळ्यांच्या समस्या

Submitted by निंबुडा on 28 December, 2012 - 04:36

'आरोग्यम् धनसंपदा' ह्या ग्रूप मध्ये डोळे ह्या विषयावर परीपूर्ण चर्चा असलेला धागा न सापडल्याने हा धागा उघडत आहे.

डोळ्यांच्या समस्या व डोळ्यांचे विकार आणि त्यावरील उपाय, शल्यक्रिया, डोळ्यांचे डॉक्टर्स इ.संबंधी इथे चर्चा करू या.

डोळ्यांशी संबंधित विशिष्ट समस्यां/प्रश्नांसाठी खालील धागे 'आरोग्यम् धनसंपदा' ग्रूप मध्ये तसेच जुन्या मायबोलीवर ह्या आधी बनवले गेल्याचे दिसत आहे. लिंक इथे देत आहे.

डोळे येणे - चांगलं की वाईट ?

डोळ्यांच्या लेझर सर्जरी विषयी माहिती हवी आहे

Subscribe to RSS - चष्मा