मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

मभागौदि पार पडला. पुढे काय ?

Submitted by गारंबीचा शारूक on 5 March, 2022 - 02:47

महाराष्ट्र भाषा गौरव दिन आनंदात पार पडला. आनंदोत्सवाचे वातावरण होते.
किती वेगवेगळे बिषय होते. आणि या सर्व विषयांवर मायबोलीकरांनी किती अभ्यासूपणे लिहीले ! मी जास्त वाचत नाही त्यामुळे भाग घेता आला नाही. या वर्षी तर ऑडीओ व्हिडीओ व्हीएफएक्स, साऊंड इफेक्ट्स सुद्धा होते. त्यामुळे मजाच आली. माझ्यासारख्यांची तर दिवाळीच झाली.

विषय: 

मराठी भाषा गौरव दिवस २०२२ - समारोप

Submitted by संयोजक-मभादि on 3 March, 2022 - 07:15

नमस्कार मायबोलीकर मंडळी,

मराठी भाषा गौरव दिनाची सांगता झाल्याची घोषणा आता आम्ही संयोजक मंडळ करत आहोत. ज्यांची अभिवाचने अजून प्रकाशित होणे बाकी आहे, ती यथावकाश होतीलच. ह्या निमित्ताने समारोपाचे चार शब्द आम्ही लिहू इच्छितो.

दरवर्षी हा उपक्रम आपण आपल्या मायमराठीवरील प्रेम व्यक्त करायला एक निमित्त म्हणून राबवतो, असे म्हणू शकतो. आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका असणाऱ्या मराठी भाषेच्या सौंदर्यस्थळांची चर्चा घडावी, नवीन माहिती कळावी, अन पुढच्या पिढीला गोडी निर्माण व्हावी हा उद्देश याही वर्षी साध्य झाला. यासाठी नक्कीच आपण सर्व मायबोलीकर कौतुकास पात्र आहात.

मराठी भाषा दिवस : माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई - अनुराधा काळे11

Submitted by अनुराधा काळे11 on 1 March, 2022 - 01:48

माझे मराठीचे मास्तर
माझ्या मराठीच्या बाई

विषय: 
प्रांत/गाव: 

मराठी भाषा दिवस २०२२ - बालचित्रकारांसाठी उपक्रम - अक्षरचित्रे

Submitted by संयोजक-मभादि on 19 February, 2022 - 11:35

अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल |
मकार महामंडल | मस्तकाकारे ||

अशा शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या कल्पनेतलं श्रीगणेशाचं शब्दचित्र उभं केलं. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपल्या बालकलाकरांसाठी संधी आहे आपापल्या कल्पनेतलं चित्र साकार करण्याची. परंतु हे काव्यरुपी चित्र नसून प्रत्यक्ष अक्षरचित्र असणार आहे.

IMG-20220219-WA0016.jpg

मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई

Submitted by संयोजक-मभादि on 19 February, 2022 - 11:31

मराठी भाषेवरील प्रेमामुळे, आपुलकीमुळे आपण सर्व कधी ना कधी 'मायबोली' ह्या संस्थळावर आलो. इथले लेख, कथा, कादंबर्‍या, कविता, गज़ला, उपक्रम, गप्पा, ह्या सगळ्यांमध्ये कुठे तरी आपण रमलो, आणि इथलेच झालो. मराठी भाषेची आवड इथल्या प्रत्येकातच कुठे तरी दडली आहे, आणि ती वेळोवेळी कलागुणांमधून दिसून येते. मराठी जरी आपली भाषा असली, तरी तिची रोजच्या व्यवहारातल्यापेक्षा वेगळी अशी एक गोडी आपण कुठेतरी एखाद्या गाण्याच्या दोन ओळींमध्ये 'अर्थ नवा गीतास मिळावा' अशी अनुभवलेली आहे.

मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - सरस्वतीची चिरंजीव मुले

Submitted by संयोजक-मभादि on 19 February, 2022 - 11:27

मराठी भाषेत उत्तमोत्तम कवी, गायक ह्यांना तोटा नाही. आपले थोडेसे अधिकच लाड ह्या बाबतीत झाले आहेत की काय, असंही कधीकधी वाटतं. लता मंगेशकर, भीमसेन जोशी ही नावंच घ्या ना! ह्यातले अनेक लोक आता आपल्यात नाहीत. परंतु 'केशवसुत कसले मेले? केशवसुत गातचि बसले!' असं गोविंदाग्रजांनी म्हटलं, तसंच ह्या सार्‍यांचंही आहे. ह्यातल्या अनेकांची वयंही झाल्याचं आपल्याला कळत नाही, इतकं त्यांच्या शब्दांत आणि गाण्यांत चैतन्य आहे. सरस्वतीची ही मुलं खर्‍या अर्थाने चिरंजीव झाली आहेत म्हणा ना! असं असलं, तरी रूढार्थाने आपण त्यांची जयंती साजरी करू शकतो, आणि त्यांच्या कलेचा आनंद नव्याने लुटू शकतो, हे तर आहेच.

पसंद अपनी अपनी

Submitted by गारंबीचा शारूक on 27 January, 2022 - 06:45

भारत देश हा विविधतेतून बनला आहे. प्रत्येक प्रांताची, धर्माची , भाषेची आपली एक खासियत आहे.
मा़झ्या बाजूच्या डेस्कवरची माझी एक साऊथ इंडीयन कुलीग आहे. तिला रस्सम आवडते. ती रस्सम पाऊडर आणून ऑफीसमधे रस्सम बनवते. त्याचा फायदा म्हणजे मला हमखास रस्सम मिळते. पण ती माझी आमटी भातची डिश खात नाही. तोंड वाकडं करते. मी तिला म्हणालो की रस्सम तुमच्यासाठी खूप ग्रेट आहे आणि मलाही तुझ्या या आवडीबद्दल फुल्ल रिस्पेक्ट आहे तरी आमची आमसुलाची आमटी आणि नारळभात आम्हाला प्रिय आहे.

शब्दखुणा: 

'हेमाशेपो' बद्दल...

Submitted by Barcelona on 27 November, 2021 - 11:16

कधी कधी संस्थळांवर धूसफूस होते नि कुणीतरी वैतागून 'हेमाशेपो' लिहून जाते म्हणजे 'हे माझे शेवटचे पोस्ट'. अर्थात वैतागलेले परत वाद घालायला येतातच आणि येत नसतील तर न वैतागलेले आयडी राखीच्या चिकाटीने ‘मेरे शे पो वाले आयेंगे’ करत त्यांना उचकवणाऱ्या पोस्टी टाकत राहतात. पण गेल्या दोन वर्षात हेमाशेपो प्रकार कमी झाला, निदान माझा तरी....

विषय: 
शब्दखुणा: 

मायबोली वर वाद करणारे कोण आणि कारण काय असतात...

Submitted by सुर्या--- on 19 November, 2021 - 06:28

मायबोलीकरांनो सर्वांनाच एव्हाना अनुभव आलाच असेल. वाद विवाद करणारे आणि त्यासाठी निमित्त शोधणारे. चला तर तुमची हिम्मत दाखवुन इथे अश्या लोकांना उघड करा. कदाचित वेमा हा धागाच उडवेल. कारण वादग्रस्त विषयाला हात घातल्यावर बऱ्याच जणांचे धागे दणाणणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया.

विषय: 

मायबोली app स्लो चालते आहे का?

Submitted by रीया on 18 November, 2021 - 00:23

मला गेल्या 2 दिवसांपासून मायबोली app (Android device वरून) access करायला खूप वेळ लागत आहे. काल रात्री तर नवीन लेखनाचं पण उघडायला 10 मिनिटं लागली.

हा problem सगळ्यांनाच येतोय का हम स्पेशल है???

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली