गोंदिया जिल्हा पक्षी वैभव -- एक नजराणा

Submitted by मंगलाताई on 13 April, 2023 - 10:55

* गोंदिया जिल्हा पक्षी वैभव -- एक नजराणा *
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
gondia-district-bird-e-book.jpg
आमचे स्नेही श्री. रवी गीते यांच्याकडून ' सारसाची सुरस कहानी ' हे कॉफी टेबल बुक मला मिळालं . त्या पुस्तकाबद्दल पान उलगडत गेल्यावर असं वाटलं की यातल्या शब्दनं शब्द वाचावा आणि यातलं चित्र डोळ्यात साठवून घ्यावं . सारसाच हे पुस्तक वाचताना मी त्यातले छायाचित्रे बघत गेले . आणि एकाहून एक अशी सुरस चित्र या पुस्तकात आढळलेत . या सारस पक्षाचे वर्णन वाचून याची कहाणी ऐकून मला खूप कुतूहल वाटू लागलं आणि मी त्यांना फोन करून कळवलं की खूप सुंदर पुस्तक मला तुमच्यामुळे मला मिळालयं . सारसाच्या या जीवन कहाणीला जवळून पाहिल्यानंतर मला त्यांच्याकडून ' गोंदिया जिल्हा पक्षी वैभव ' हे पुस्तक प्राप्त झाले . या पक्षी वैभवाबद्दल थोडे मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतेय. याला पुस्तक म्हणावं असं मला वाटत नाही कारण हा एक ग्रंथ झालेला आहे आणि याला ग्रंथ म्हणाव तर यात नुसते शब्द नाहीयेत हा एक हा प्रकल्पच आहे . आणि प्रकल्प म्हटला की काही दिवसात न उरकणार ते काम असतं , सातत्यपूर्ण चालणारं असतं , त्यात मन ओतून टाकावं लागतं , वेळ द्यावा लागतो . मनातली जिद्द कायम ठेवावी लागते आणि प्रकल्पाचा शेवट होईस्तोवर त्याच्यावर सतत काम करत राहावं लागतं . या पक्षी वैभव पुस्तकाला हाताळल्यावर सहजच आपल्या लक्षात येतं की यासाठी किती कष्ट घेतलेले आहे आणि हे तयार करणे सोपं नव्हे . हे पुस्तक म्हणजे एक चालता फिरता चित्रपट आपल्या डोळ्यासमोरून जातोय असं वाटतं . मुखपृष्ठावरचं अत्यंत सुंदर रेखांकित केलेले चित्र आहे सारस पक्षाचं आणि मुखपृष्ठाला साजेस ' गोंदिया जिल्हा पक्षी वैभव ' हे जे शीर्षक लिहिलेले आहे , यावर अतिशय सुंदर दोन पक्षी काढलेले आहेत . त्यांची रंगसंगती आणि त्याचा जो फॉन्ट आहे तो कमालीचा निवडलेला आहे . इथूनच खरंतर पुस्तकाची रचना आकर्षित झालेली आहे . मुखपृष्ठानंतरच जे पहिलं पृष्ठ उघडलं , ते अत्यंत देखणं असं साधं केलेलं आहे . त्यात लाकडी फांद्यावर पक्षी विराजमान झालेले आहेत आणि ते असे निर्धारस्थपणे बसलेले दिसत आहेत . पण या मुखपृष्टात आणि आतल्या पृष्ठात त्यांनी रंगसंगती आणि फॉन्ट इतका सुंदर वापरलेला आहे . मुखपृष्ठावर गडद रंगावर पांढऱ्या रंगाने फॉन्ट केलेला आहे आणि आतल्या पृष्ठावर पांढऱ्या पृष्ठभागावर काळा रंगाने फॉन्ट लिहिलेला आहे अप्रतिम असे दोन्ही पृष्ठ आहेत . श्रेयनामावली बघितल्याबरोबरच लक्षात येतं की या पुस्तकासाठी प्रतिष्ठितांची हजेरी लागलेली आहे .
download.jpg
गोंदिया जिल्ह्यात सुमारे 320 जातीचे पक्षी आढळून येतात आणि स्थलांतरीत पक्षी सुद्धा आढळून येतात . पक्षी हे गोंदिया जिल्ह्याचे वैभव आहे . या पुस्तकात शिक्रा , बोनेलीचा गरुड , पिंगट गरुड , तिसा , लांब पायाचा बाज , दलदली भोवत्या दलदली हरीण , मोठ्या ठिपक्यांचा गरुड , छोट्या ठिपक्यांचा गरुड , कापशी घार , पांढऱ्या पुठ्ठ्याचे गिधाड , समुद्री घार , सरडमार गरुड , घार , मोरघार ,मधुबाज , तुरेवाला सर्प गरुड , कैकर , तलवार बदक , चक्रांग बदक , चतुरंग बदक , हळदी कुंकू बदक , कालहंस , राजहंस , छोटी लालसरी , नयनसरी बदक , अडई , मलीन बदक , मोठी लालसरी ,काणूक बदक , नकटा बदक , घर पाकोळी , भुवईबदक ,भारतीय राखी धनेश , तुरेवाली वृक्ष पाकोळी , केंटिश चिखल्या , सामान्य रातवा , छोटा कंठेरी चिखल्या , सोन चिखल्या , नदी टिटवी , राखी डोक्याची टिटवी , नदी टिटवी ,टिटवी , माळटिटवी , भारतीय धाविक , छोटा आर्ली , प्राच्य आर्ली , लांब शेपटीचा कमळ पक्षी , कल्लेदार सुरय ,नदी सूरय , शेकाट्या , रंगीत पाणलावा , सामान्य तुतारी , छोटा टिलवा , टेमिंगचा टिलवा , सामान्य पाणलावा , युरेशियन कोरल , ठिपक्यांचा टीलवा , ठिपके वाली तुतारी , सामान्य हिरवा टिलवा , हिरवी तुतारी , सामान्य टिलवा , काळा करकोचा , रंगीत करकोचा , पाचू होला , पारवा , ठिपके वाला होला , छोटा तपकिरी होला , कंठवाला होला , खवलेदार होला , पिवळ्या पायाची हारोळी , सामान्य धीवर , काळा टोपीचा धीवर , पांढऱ्या छातीचा धीवर , भारतीय नीलपंख , निळ्या शेपटीचा राघू , पावश्या , बहिरी ससाणा , सामान्य खरूची , रंगीत चकोत्री , लाल रान कोंबडी , राखी रानकोंबडी , राखी तितिर , मोर ,सारस क्रौंच , सामान्य क्रौंच , कांड्या करकोचा , वारकरी , पांढर्या छातीची पाण कोंबडी , धान वटवट्या , ब्लीथचा बोरू वटवट्या , काळी पानकोंबडी , तपकिरी फटाकडी , सुभग , पायमोज वटपट्या , प्राच्य चंडोल , तांबूस शेपटीचा चंडोल , आखूड बोटांचा चंडोल , लालपंखी चंडोल , काळ्या डोक्याचा कोकिळ खाटीक , मोठा कोकीळ खाटीक , पांढऱ्या पोटाचा गोमेट , छोटा गोमेट , राखी छातीचा वटपट्या , शिंपी , साधा वटवट्या , रान वटवट्या , टकाचोर , कावळा , जाड चोचीचा फुलटोचा , पांढऱ्या पोटाचा कोतवाल , कोतवाल , भृंगराज कोतवाल , लाल डोक्याचा भारीट , काळ्या डोक्याचा भारीट , लाल मनोली , पांढऱ्या कंठाची मनोली , लाल मनोली , लाल पुठ्ठ्याची भिंगरी , माळ भिंगरी , तारवाली भिंगरी , धूसर कडा पंकोळी , तपकीरी खाटीक , लांब शेपटीचा खाटीक , उदी पाटीचा खाटीक , सामान्य सातभाई , राखी सातभाई , जंगली सातभाई , शेवाळी पाठीची तिरचिमनी , ब्लिथची तीरचिमणी , लांबचोकीची तीर चिमणी, धान तिरचिमणी , करडा धोबी , पांढरा धोबी , पिवळा धोबी , पिवळ्या डोक्याचा धोबी , टिकेलची निळी माशीमार , पांढऱ्या भुवईचा धोबी , नीलांग माशीमार , लाल छातीचा माशीमार , निळी माशीमार , तपकिरी गप्पीदास , जांभळा शिंजिर , जांभळ्या पुठ्ठ्याचा शिंजीर , हळद्या , पिवळ्या डोळ्याचा सात भाई , बुरखाधारी हळद्या , पिवळ्या कंठ्याची चिमणी , चिमणी , हिरवट वटवट्या, पिवळ्या पोटाचा वटपट्या, नवरंग , लाल बुड्या बुलबुल , जंगली मैना , साळुंकी , पांढऱ्या भुवईचा बुलबुल , पिंगट पोटाचा सातभाई , रानकाटीक ,राखी बगळा , जांभळा बगळा, ढोकरी , हिरवी ढोकरी , छोटा बगळा , काळा तापस , पिवळा तापूस , रात ढोकरी , चमचा , मोर शराटी , तपकिरी डोक्याचा कुटुरगा , मोठा रोहित , तांबट , मानमोडी , तांबूस सुतार , बुटका सुतार , मोठी टीबुकली , टिबूकली , टोई पोपट , पोपट ,तिरंदाज , छोटा पाणकावळा , मोठा पानकावळा , ठिपक्यांचा पिंगळा , जंगली पिंगळा , मासेमार घुबड , कंठेरी शिंगळा घुबड , चट्टेरी वन घुबड अशाप्रकारे एक मोठी 320 पक्ष्यांची माहिती मिळू शकेल एवढा जाडजूड ग्रंथ केवळ पक्षांवर तयार झालेला आहे . हे काम अचाट असे आहे .
Capture1.JPG
प्रत्येक पक्षाचे मराठी नाव , इंग्रजी नाव , शास्त्रीय नाव , त्याची लांबी , आकार , ओळख , अधिवास , खाद्य , त्यांचे आवाज , त्यांची घरटी कशी असतात , त्यांच्या विणीचा हंगाम कोणता , तो हंगाम भारतातल्या विविध भागात कोणता असतो ( कालावधी ) आणि त्यांची अंडी कशी असतात त्याचे वर्णन या पुस्तकात अगदी परिपूर्णतेने केलेले आहे . सगळ्या पक्षांची इथंभूत माहिती काढणे , शास्त्रीय दृष्टीने माहिती काढणे हे काम सोपे नाही . ही माहिती काढतांना सगळ्या दृष्टीने माहिती तपासून घ्यावी लागते , आणि माहिती परिपूर्ण असावी लागते . खरे तर इथेच सर्व शक्ती पणाला लागते पण हे अजब गजब काम सिद्ध करून दाखवले आहे ' पक्षी वैभव ' च्या टीमने आणि हे टीम वर्क आहे हे एकदा पुन्हा सिद्ध होतंय . तंत्रज्ञानाच्या युगात अशा पुस्तकांची निर्मिती करणे आणि तीही इतकी शास्त्रोक्त पद्धतीने खरंच हे खूप स्पृहणीय आहे . याचा विचार करावा तेवढा अधिक उत्साह येतो . आणि खरंच या टीमचं खूप खूप अभिनंदन . आमच्यासारख्या तळागाळातल्या सामान्य वाचकापर्यंत ही अभिनव कलाकृती पोहोचली , अन्यथा आम्ही या पक्षीजगता पासून वंचितच राहिलो असतो .
प्रत्येक पक्षाचे इंग्रजी सामान्य नाव , शास्त्रीय नाव , मराठी नाव त्यांचे गण , त्यांचे कूल , एकूण त्यांच्या प्रजाती , एकूण जाती या सगळ्यांची नोंद आणि वर्गवारी करण्यात आलेली आहे . या ग्रंथात गणा नुसार , कुळानुसार यांचे विविध गट केलेले आहेत . त्याशिवाय संकटग्रस्त पक्षांची यादी केलेली आहे . एकूण संभाव्य संकट ग्रस्त प्रजाती , एकूण नष्टप्राय प्रजाती यांची सुद्धा यादी केली आहे .
या ग्रंथाचे वैभव म्हणजे यातली छायाचित्रे . या चित्रांशिवाय या पुस्तकाला साज चढला नसता आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी ही सुंदर चित्रे डोळ्यासमोर आली नसती तर शास्त्रोक्त माहितीला देखील अपूर्णताच राहिली असती . ग्रंथ पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आवश्यक जी गोष्ट होती ती होती छायाचित्रे आणि यातले छायाचित्रकार आहेत , श्री . रवी गोलानी , डॉक्टर दीपकिसन बिसेन , डॉक्टर राजेंद्र जैन , श्री. छत्रपाल चौधरी , श्री . विवेक पटले आणि सौ .कल्याणी कापडी या सर्वांचे आभार मानायलाच हवेत . कारण यांच्या मोलाच्या मदतीशिवाय ग्रंथाला सौंदर्य आले नसते . मी पुर्ण पुस्तक वाचले , न्याहाळले पण मुद्रित शोधन इतके चपखल आहे की एकही चूक या पूर्ण पुस्तकात मला आढळली नाही . या सजग मुद्रित शोधणासाठी श्रीमती भाग्यश्री शाम पेटकर , लीना फलके आणि डॉक्टर शरद मेश्राम यांचे खूप अभिनंदन आणि आभार.
Capture.JPG
जिल्हाधिकारी म्हणून बदलून आलेले श्री. चिन्मय गोतमारे यांनी सूत्र सांभाळल्यावर ' गोंदिया जिल्हा पक्षी वैभव ' या पुस्तकाची मुद्रीते आणि अभ्यास तपासला आणि दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली . ते म्हणतात की, " पदभार घेतल्याबरोबरच एक नितांत सुंदर अशा निर्मितीचा भाग होता आले याचा मला निश्चितच आनंद झाला आहे " .
गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती नयना गुंडे यांनी सारस क्रोच पक्षावरती टेबल बुक केले होते ते अतिशय सुंदर होते . त्यांनी दिलेल्या प्रेरणेने आणि पाठबळामुळेच जिल्हा माहिती अधिकारी श्री . रवी गीते आणि अपर जिल्हाधिकारी श्री . राजेश खवले यांनी गोंदिया जिल्ह्यातील समृद्ध वनांमध्ये विहार करणाऱ्या पक्षी वैविध्य वर एक उत्तम ग्रंथ सिद्ध करून दाखवला .
श्री चिन्मय गोतमारे आणि श्रीमती नयना गुंडे . आभार .
यात कमाल मानावी लागेल ती आपल्याला राजेश खवले अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांची 320 पक्षांवर पुस्तक लिहिणे काही साधी गोष्ट नाहीये . इंटरनेटवर प्रत्येक पक्षाची माहिती काढणे सर्व पुस्तकं सर्व ग्रंथ तपासणे संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करणे आणि पक्षाची लांबी , त्यांचे वर्णन करणे , काय खातो , घरटे कसे बांधतो ? कोणत्या अधिवासात राहतो ? विणिचा हंगाम कोणता ? आवाज कसा काढतो ? अंडी कशा प्रकारची असतात या सगळ्यांसाठी संदर्भ हाताळणे एका हे व्यक्तीसाठी कठीण काम आहे . या संदर्भ ग्रंथांच्या शोधात खवले साहेबांनी डॉक्टर सलीम अली मारुती चितमपल्ली , किरण पुरंदरे , डॉक्टर जयंत वडतकर श्री . किरण मोरे डॉक्टर राजू कसंबे यांनी केलेले लिखाण अतिशय उपयुक्त असल्याचे सांगितले आहे . सगळ्या लिखाणाचा सारासार अभ्यास करून त्याबाबतची माहिती त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि संकलन केले परंतु हे पुस्तक केवळ माहितीचे संकलन आहे असे म्हणता येणार नाही तर या संकलनातूनच पक्ष्यांबाबतचा नेमकेपणा आपल्याला मिळालेला आहे आणि या नेमकेपणामुळेच 320 पक्षांची यादी सचित्र आपल्या डोळ्यासमोर आहे . राजेश खवले यांनी आपल्या मनोगतात पुस्तकात काही उनिवा चुका त्रुटी असल्यास त्या नजरेस आणून देण्याबद्दल आवाहन केले आहे हा नम्रपणा एवढ्या ग्रंथानंतरही कायम टिकून राहिला याचा फार आनंद होतो आहे.
विशेष आभार श्री रवी गीते , जिल्हा माहिती अधिकारी गोंदिया यांचे मानते . कारण यांच्याकडून मला हे पुस्तक प्राप्त झाले नसते तर कधीही मला याचा अनुभव आला नसता की पक्षांवर एक सुंदर ग्रंथ निर्माण होऊ शकतो . त्यांनी आपल्या प्रस्तावनेत पाखरांच्या मागावर या शीर्षकाखाली पक्षांबद्दलची त्यांचे मत व्यक्त केले आहे आणि शेवटच्या ओळीत त्यांनी सांगितले ," हे पुस्तक नक्कीच अभ्यासक , पक्षीमित्र , रसिक व पर्यटकांसाठी पथदर्शक असेलच पण पक्षी संरक्षण व संवर्धनासाठी ही या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होणार तो तसा होणार म्हणून हे परिश्रम सार्थकी लागले असे समजतो " . खरं सर तुमचे परिश्रम सार्थकी लागले आहेत आणि माझ्या संग्रहात हे पुस्तक मी ठेवणार आहे . याचा माझ्या पुढच्या पिढीला नक्कीच उपयोग होणार आहे . नागपूरला अंबाझरी येथे पक्षीनिरक्षक ग्रुप आहे या ग्रुपमध्ये मी या.पुस्तकाचा परिचय करून देणार आहे .
3afcdbfeb6ecfbdd0ba628696e3cc163.jpg
मलपृष्ठावरील छायाचित्रात अत्यंत देखणे तीन पक्षी आणि कोळी पोपटी पानं दाखवली आहेत . फार सुंदर आकर्षक रंगसंगती असलेली चित्रे आणि वापरलेला कागद याबद्दल निर्मिकांचे आभार मानायला हवे . पक्षी अभ्यास करणाऱ्या नवीन शिकणाऱ्यांसाठी हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होय . शासकीय सेवेत असताना हा ग्रंथ निर्मिती झाली फार उत्तम कार्य .
व्यक्तीने मनावर घेतले तर काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण हा ग्रंथ देऊ शकतो . एक मी इथे गोष्ट सांगते जी मी श्री . दिलीप कुलकर्णी यांच्याकडून ऐकलेली आहे . एकदा आंध्र प्रदेशात एका नदीवर बांध घालायची योजना सुरू असताना , त्या नदीच्या परिसरात असलेले सिंहपुच्छ जातीचे माकड हे नष्ट होण्याच्या मार्गावर आले होते आणि फक्त काही माकडं तिथे उरलेली होती . अशावेळी तिथे जर बांध घातला तर नक्कीच ही माकडांची जमात नष्ट होणार हे निसर्ग स्नेही पक्षीतज्ज्ञ श्री . सलीम अली यांच्या लक्षात आले आणि श्री . सलीम अलींना या सिंहपुच्छ माकडाच्या नष्ट होण्याबद्दल अधिक काळजी वाट लागली . ते यावर विचार करू लागले पण त्यांना मार्ग सुचेना . शासकीय कामाला तर ते खोडा घालू शकत नव्हते , थांबवू शकत नव्हते , अशा वेळी काय करावे त्यांनी खूप विचार केला . श्रीमती इंदिरा गांधी त्यावेळी पंतप्रधानपदावर होत्या . त्यांचे स्मरण होताच सलीम अली यांच्याशी त्यांची मैत्री असल्यामुळे त्यांनी श्रीमती इंदिरा गांधींना फोन केला . श्रीमती गांधींनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि तो बांध घालणार होते ती दिशा वळवून घेतली आणि दुसरीकडून तो बांध घालण्यात आला . जंगलातला माकडांचा तेवढा अधिवास शाबूत राखण्यात आला सुरक्षित राखून ठेवला . कुलकर्णी सर याचे उदाहरण यासाठी देतात की एखाद्या व्यक्तीने जर मनावर घेतले तर अनेक अपराध होण्यापासून , पर्यावरण ऱ्हास होण्यापासून , अनेक अधिवास नष्टप्राय होण्यापासून बचाव करू शकतो . म्हणून मला याचे स्मरण झाले की श्रीमती नयना गुंडे श्री राजेश खवले श्री रवी गीते आणि श्री चिन्मय गोतमारे यांनी मनावर घेतले नसते तर ह्या ग्रंथाची निर्मिती झालीच नसते . शतशः आभार .

EBOOK LINK: https://online.fliphtml5.com/czyjr/jkvq/

©️ मंगला लाडके
( कृपया लेख नावासहित पुढे पाठवावा )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर पुस्तक. तुम्ही दिलेल्या लिंकवरून पूर्ण पुस्तक बघितले आणि आवडले.
इतक्या कष्टाने हा लेख लिहून, पुस्तक परिचय करून दिल्याबद्दल तुमचे विशेष आभार. _/\_

आत्ता हे पुस्तक पाहीले. पक्ष्यांची काय मस्त यादी दिलेली आहे तुम्ही. आता एकेक गुगल करत जाइन.

पहाटफेरीत, हा रान वटवट्या मला न्यु जर्सीत सापडलेला. खाली रस्त्यावर झोपलेला म्हणुन हातावर घेतला तर हातातच झोपून गेला. मग एका झाडावरती ठेवला.
वटवट्या = इंग्रजीत Yellow-bellied prinia हे नाव तुमच्या लेखामुळे कळले.

https://lh3.googleusercontent.com/pw/AJFCJaXDoAx-TzeRLf3dqi8YqVeMg0dPqhFbN8LCX22bAYsGBVADK7KaGIHQSLOcHhbm2z44v0FqvAOmhWKrlZ6v33xjmBOFHy7dvqR5cQE7-VFXqY_GUnLWFtTBvyizjCNdbtz-B9PtUBeT54tO-PEKK1Q3jQ=w469-h625-s-no?authuser=0
.
https://lh3.googleusercontent.com/pw/AJFCJaXYXk3KXi17zJrDnFHR3ReaQucIi3ZlIY4-J9-SLd02qRWXnn91NzhbUPvRqAxfXwvFXsAMuRRuQtFv-cOtJtuOh98GY1zW0Gmgj6pL7V34lgBrhLuLKumEkAffCw0yk9Lsyj1JC2gcSWvdpKMz731_gQ=w469-h625-s-no?authuser=0
.
https://lh3.googleusercontent.com/pw/AJFCJaUF3ntoQTJAzldxs-9gKpMaIQzLfdjjhdsQdMBFmdWIZ1TjdcyCBgHqtzcTZU9asLO2sRaL2CwV5QIcsE9Ca9NIqBn1oU391VSlx1OWc5Tsm8MePEOVS3rE5r1Rq_yPP53pPkXx68G3lhbOK2Y0fzDFEg=w469-h625-s-no?authuser=0