मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

मायबोली अँड्रॉईड अ‍ॅपची खुली चाचणी (open Beta testing)

Posted
1 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago

२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते. मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून खुल्या चाचणीसाठी (open Beta testing) खालील ठिकाणी उपलब्ध आहे.
https://play.google.com/apps/testing/com.maayboli.mbapp1

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

या नात्याला काय नाव देऊ ?

Submitted by अभिजीत... on 6 May, 2018 - 05:08

माझा मित्र कड्याचा दगड .... जेव्हा केव्हा मला उदास वाटत असेल किंवा मनावर ताण आला कि मी या कड्याच्या दगडावर तासंतास बसून राहायचो;जवळच असलेल्या डोंगराच्या पश्चिमेला हा दगड खूप मोठा आणि जुणा,तेथे बसले कि मला जणू स्वर्ग असेल तर असाच असेल असे वाटायचे;तिथे लागणार गार वारा मनाला प्रसन्न करणारा वाटतो तर तिथे बसून स्वतःचाच शोध घ्यायला लावणारी 'शांतता'; मनाला भारी वाटते.

शब्दखुणा: 

शब्द शब्द जपून ठेव...

Submitted by अश्विनी शेंडे on 22 April, 2018 - 10:10

शब्द शब्द जपून ठेव...बकुळीच्या फुलापरी...
पाडगावकरांच्या काही खास ठेवणीतल्या गाण्यातलं हे एक गाणं.... या गाण्याला बकुळीचा गंध आहे... मला स्वतःला बकुळ या फुलाबद्धल अनाम विचित्र भावना आहेत- मला त्याचा गंध आवडतो असंही नाही आणि आवडत नाही असंही नाही... त्यात मोग-याचा मादक दरवळ नाही, जाई जुईचा हसरा गंध नाही, सायलीची शांत सुगंधी झुळूक नाही.. चाफ्याचा टवटवीतपणा नाही, इतकंच काय गुलाबाचा दिखावूपणा पण नाही... पण त्यात काहीतरी विलक्षण आहे- जी ए कुलकर्णींच्या कथांसारखं, आरती प्रभूंच्या कवितांसारखं.... काहीतरी अनवट....

विषय: 
प्रांत/गाव: 

मायबोलीचे बिग बॉस

Submitted by पाथफाईंडर on 3 April, 2018 - 10:48

१५ तारखेपासून मराठी बिग बॉस चालू होते आहे.
समजा मायबोली ने बिग बॉस चालू केले तर कोणत्या आयडींना आत पाठवायचे

चला घाला राडा.

हेडमास्तर : कृपया धाग्याने पातळी सोडली तर धागा उडवावा.

विषय: 
शब्दखुणा: 

सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८ - कार्यक्रमाचे आमंत्रण

Submitted by धनश्री on 14 March, 2018 - 15:29

सिअ‍ॅटलकर - हे घ्या आमंत्रण आणि हो हा ड्रेस कोड आहे बरं का!!

सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८ - सांस्कृतिक कार्यक्रम रूपरेषा

Submitted by धनश्री on 14 March, 2018 - 11:30

सिअॅटल् महाराष्ट्र मंडळाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची ही रूपरेषा.

कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक:- वामन हरी पेठे ज्वेलर्स
माध्यम प्रायोजक:- मायबोली

दिनांकः- शनिवार, १७ मार्च २०१८

ठिकाणः- Bellevue High School
10416 SE Wolverine Way, Bellevue, WA 98004

सिअ‍ॅटल् महाराष्ट्र मंडळाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम - १७ मार्च २०१८

Submitted by धनश्री on 27 February, 2018 - 17:46

मंडळी, नमस्कार. आज २७ फेब्रुवारी. मराठी भाषा दिवस!

रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी
अशा शब्दांत मराठीची थोरवी सांगणार्‍या कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस. मराठी काव्य-नाट्य-साहित्य क्षेत्रांतील या तळपत्या सूर्याला वंदन आणि मराठी भाषा दिनाच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा!! आज एका विशेष कार्यक्रमाची तुम्हांला माहिती देणार आहे.

SMM SJ Logo.JPG

माझी मराठी

Submitted by पल्लवीजी on 27 February, 2018 - 15:18

माझी मराठी

भावार्थदीपिका माऊलीची
अभंग गाथा तुकारामाची
मनाचे श्लोक दासबोधी
भारुडे एकनाथांची.
मंगल वाणी विठुरायाची...
माझ्या मराठीला लाभली !

सह्याद्रीची निधडी छाती
काळ्या कातळाची कणखरी
अविचलता सिंधुदुर्गाची
मऊ माया लाल मातीची.
मर्दुमकी शिव-मावळ्यांची...
माझ्या मराठीला लाभली !

ह्या भाषेची थोरवी अशी
दगडी जाते गाते इथे ओवी !
रमती चिपळ्या-एकतारी किर्तनी
वीर पोवाडे शाहीरांस स्फुरती.
नाट्यसंगीत, लावणी अदाकारी...
माझ्या मराठीला लाभली !

शब्दखुणा: 

पुण्यात मायबोली गटग

Submitted by अजय on 17 January, 2018 - 09:59
तारीख/वेळ: 
20 January, 2018 - 09:00 to 11:00
ठिकाण/पत्ता: 
मल्टीस्पाईस , डीपी रोड म्हात्रे पुलाजवळ , पुणे

आम्ही काही मायबोलीकर शनिवारी (२० जानेवारी, २०१८) सकाळी ९ वाजता भेटणार आहोत. इतर कुणाला यायला जमणार असेल तर दुधात साखर. शक्य असेल तर भेटूच.

माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

मायबोलीवर नवीन सुविधेच्या चाचणी साठी मदत हवी आहे

Submitted by webmaster on 27 December, 2017 - 13:08

मायबोलीवरच्या नवीन सुविधा, मायबोलीकरांनी वेळोवेळी केलेल्या चाचणीच्या मदतीमुळेच प्रत्यक्षात आणू शकलो आहोत.

काही नवीन सुविधांच्या चाचणीसाठी मदत हवी आहे.
मदतीचा वेळ : एका भेटीत ५- १० मिनिटे
आठवडयातून किती वेळा: कमीत कमी २ वेळा, जास्तीत जास्त तुम्हाला जमेल तसे.
किती काळासाठी: चाचणी सुविधा सगळ्यांना उपलब्ध होई पर्यंत , आजपासून अंदाजे २-३ आठवडे.
कामाचे स्वरूप : सुविधा तपासून तुमचा फीडबॅक देणे

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली