मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

शशक स्पर्धा-कविन-xxxx मेडिसीन

Submitted by कविन on 19 September, 2026 - 06:43

मी: “लस्ट स्टोरीज बघितली का नेटफ्लिक्स वर?”
ती: “ती बघण्याची गोष्ट आहे? श्या! इतके दिवस करण्याची समजत होते”
मी: “मग केलीस?”
ती: “चोळ तू जखमेवर मीठ. सध्या असं झालय ना, कुछ हुवा तो हुवा वरना सिर्फ हवा 
मी: ईईई वर्णन नको. उपाय कर
ती: नुसतच प्रेशर बिल्ड होतं यार …नाही सहन होत. हवा भरलेला फुगा नुसता.
मी: हाss हाss! डर मत. केमिस्ट के पास जा और xxxx लेके आ. प्रमाणात घे, रिस्क नको. सकाळी थॅंक्युचा मेसेज कर Wink
.
.

शशक स्पर्धा-कविन-विरह

Submitted by कविन on 17 September, 2026 - 05:58

कुठेतरी बॅकग्राऊंडला रेडीओ सुरु आहे. “जीवलगा कधी रे येशील तू…” 

गेला महिनाभर ती डोळ्यात प्राण आणून त्याची वाट बघतेय पण तो मात्र….

तिच्या घरातल्यांनी तर आता आशाच सोडलेय. रोज तिचे मन गुंतवायचा प्रयत्न करतायत. त्यांचे यत्न तिला कळतायत, पण तिच्या मनाला त्याचीच ओढ लागलेय हे त्यांना कसे समजावे?

आता पुढचं गाणं लागलय “साजण दारी उभा..” 

“विरह नको, ये की रे” हे म्हणताना काळीज वेदनेने पिळवटते तिचे.

ती जिंकतेच शेवटी, त्याला यावच लागतं.

“किती वाट बघायला लावलीस?” ती त्याला घट्ट मिठीत घेत म्हणते 

शशक स्पर्धा - भरत. - दिवास्वप्न

Submitted by भरत. on 16 September, 2026 - 08:31

त्याच्या शेजारच्या क्युबिकलमधल्या त्या रिटायर झाल्या. काही दिवसांनी तिथे ती आली. तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांची वेणी पाहून त्याच्या मनात जशी नागीण सळसळली. ती जवळून जाता येता "तू किसी रेल-सी गुज़रती है,मैं किसी पुल-सा थरथराता हूँ।" असं तो मनातल्या मनातच म्हणे.

काहीच दिवस झाले असतील. एक दिवस ती आली, तो बॉबकट केलेले केस उडती भुरुभुरू अशी. "वा! छान दिसताय!" असं म्हणायला तो उठून उभा राहतच होता, इतक्यात पेढा पुढे करत ती म्हणाली , "काल माझी एंगेजमेंट झाली. आणि बरं का तोसुद्धा आपल्याच ऑफिसात आहे."

विषय: 

शशक स्पर्धा

Submitted by संयोजक on 9 September, 2026 - 03:27

१. शृंगार
२. वीर
३. करुण
४. हास्य
५. रौद्र
६. भयानक
७. बीभत्स
८. अद्भुत
९. शांत

यमक, अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा, श्लेष, रूपक, व्यतिरेक , अनन्वय, अपन्हुती......

नमस्कार मायबोलीकर मंडळी!

तुम्ही म्हणत असाल , शीर्षकात तर शशक लिहिलंय. आणि व्याकरणाचा, त्यातही सौंदर्यशास्त्राचा तास का वाटतोय?

तर हो आणि नाहीही.

यंदा तुम्हांला शंभर शब्दांची अशी कथा लिहायची आहे ; जी वाचून नवरसांपैकी कोणत्याही एका रसाची अनुभूती येईल आणि या कथेत एका अलंकाराचा ठळक वापर असेल.


नियम

विषय: 

बाप्पाचा नैवेद्य

Submitted by संयोजक on 7 September, 2026 - 12:03

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।।

विषय: 

आमच्या घरचा बाप्पा

Submitted by संयोजक on 7 September, 2026 - 11:58

Screenshot_20250827_063028_Gallery.jpg

आमच्या घरचा बाप्पा

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

विषय: 

आपल्या मायबोलींचा अभिमान बाळगू – जनगणनेत मायबोलीच नोंदवू!

Submitted by HRM on 10 April, 2026 - 04:04

सध्या २०२७ च्या जनगणनेच्या निमित्ताने 'हिंदी' तसेच 'संस्कृत' भाषेंची नोंद करण्याबाबतचे काही भावनिक संदेश पसरवले जात आहेत. आपली संस्कृती, प्रार्थना आणि श्लोक यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असणे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु, जनगणनेसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत केवळ भावनिक आवाहनाला बळी पडण्यापूर्वी, आपण आपला इतिहास, आपल्या संतांची शिकवण आणि आपल्या खऱ्या मायबोलींचे - मराठी, कोंकणी, मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी भाषांचे - भविष्य काय, याचा अत्यंत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

२०२८ लॉस एंजेलस ऑलिम्पिक्स!

Submitted by मुकुंद on 7 April, 2026 - 23:11

लॉस एंजेलस ऑलिम्पिक्स जुलै २०२८ मधे आहे. म्हणजे त्याला अजुन २ वर्षांपेक्षा जास्त दिवस बाकी आहेत.

पुणे तळजाई तत्काल गटग

Submitted by भरत. on 9 March, 2026 - 11:57

sajira1.jpgsajira2.jpg

Watch this space for तळजाई तत्काल गटग वृत्तान्त

गटगला आलेल्या मायबोलीकरांसाठी सूचना

विषय: 
शब्दखुणा: 

पाककृती स्पर्धा क्रमांक १ - वरणभात सजावट - हर्पेन

Submitted by हर्पेन on 2 September, 2025 - 11:54

चिनी तत्वज्ञानानुसार यिन आणि यांग ह्या दोन विरोधी गोष्टी परस्परपुरक प्रकारे एकत्र येऊन एक संपूर्ण गोष्ट बनवतात ज्यामुळे विश्वात संतुलन आणि सुसंवाद निर्माण व्हायला मदत होते.

कर्बोदक आणि प्रथीने एकत्र येऊन बनते एक परिपूर्ण जेवण ज्यावर तूप मीठ लिंबू आणि तुळशीपत्र ह्यांनी चार चांद लावले की जे सात्विक प्रसादाचे पान तयार होते त्याने भूक खवळलीच पाहिजे आणि हे खाल्ल्यावर घरातही संतुलन आणि सुसंवाद निर्माण झालाच म्हणून समजा.

IMG-20250902-WA0116.jpg

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली